X
X

Fact Check: 2017 च्या यूपी निवडणुकीचे कॅलेंडर अलीकडील निवडणुकांशी जोडून व्हायरल

विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. हे वृत्त प्रकाशित होईपर्यंत निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकांची घोषणा केलेली नव्हती.

  • By: Pragya Shukla
  • Published: Jan 5, 2022 at 11:41 PM
  • Updated: Feb 1, 2022 at 10:55 AM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): आजतकची एक ब्रेकिंग प्लेट सोशल मीडियावर शेअर केली जात असून आगामी यूपी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याचा दावा त्यात केला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात निवडणुका होणार असून. पहिला टप्पा 11 फेब्रुवारी, दुसरा टप्पा 15 फेब्रुवारी, तिसरा टप्पा 19 फेब्रुवारी, चौथा टप्पा 23 फेब्रुवारी, पाचवा टप्पा 27 फेब्रुवारी, सहावा टप्पा 4 मार्च आणि सातवा टप्पा 8 मार्च आहे. तर 11 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. विश्वास न्यूजने केलेल्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. हे वृत्त प्रकाशित होईपर्यंत निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकांची घोषणा केलेली नव्हती.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Awadhesh Kumar Nishad ने व्हायरल स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले की: यूपी चुनाव 2022 जय वीआईपी

तपास:
व्हायरल पोस्टचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही प्रथम अनेक कीवर्डद्वारे गूगल वर शोधले, परंतु आम्हाला असे कोणतेही विश्वसनीय माध्यम सापडले नाही. 2 जानेवारी 2022 रोजी प्रकाशित झालेल्या नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, भारतीय निवडणूक आयोगाने 2022 च्या यूपी निवडणुकीची तयारी तीव्र केली आहे. तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. असे मानले जात आहे की निवडणूक आयोग 10 ते 15 जानेवारी दरम्यान उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या तारखा जाहीर करू शकतो.

तपास पुढे नेत, आम्ही यूपी निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट तपासण्यास सुरुवात केली, परंतु आम्हाला वेबसाइटवर अशी कोणतीही घोषणा दिसली नाही. तपासादरम्यान, आम्हाला 4 जानेवारी 2017 रोजी Aaj Tak च्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हायरल पोस्टशी संबंधित व्हिडिओ सापडला. व्हायरल पोस्टचे फुटेज व्हिडिओच्या पहिल्या 4 सेकंदात पाहिले जाऊ शकते. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या 2017 च्या यूपी निवडणुकीच्या तारखा आहेत, ज्या नुकत्याच झालेल्या निवडणुका म्हणून शेअर केल्या जात आहेत.

अधिक माहितीसाठी आम्ही यूपी निवडणूक आयोगाचे अधिकारी अनुज चांडक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. ही फेक न्यूज आहे, अजून तारखा जाहीर झालेल्या नाहीत. तारखा केव्हा जाहीर केल्या जातील, सर्वांना कळेल आणि ते आमच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल.

तपासाअंती, आम्ही फेसबुक यूजर Awadhesh Kumar Nishad ह्यांचे सोशल स्कॅनिंग केले ज्याने ही पोस्ट शेअर केली. स्कॅनिंगवरून, आम्हाला समजले की वापरकर्ता एका विशिष्ट विचारसरणीने प्रभावित आहे. उजरचे फेसबुकवर 5000 मित्र आहेत. यूजर चे खाते डिसेंबर 2018 पासून सक्रिय आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. हे वृत्त प्रकाशित होईपर्यंत निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकांची घोषणा केलेली नव्हती.

  • Claim Review : उत्तर प्रदेश निवडणुकांच्या तारखा
  • Claimed By : Awadhesh Kumar Nishad
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later