Fact Check: रुस चे रॉकेट चोरल्याचा नावावर व्हायरल होत आहे एडिटेड चित्र
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. रॉकेट चे जुने चित्र एडिट करून आता व्हायरल करण्यात येत आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Mar 28, 2022 at 02:16 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): रुस आणि युक्रेन मध्ये झालेल्या युद्धामध्ये एक चित्र व्हायरल होत आहे. ह्यात एका रॉकेट ला ट्रॅक्टर द्वारे ओढून नेताना बघितले जाऊ शकते. सोशल मीडिया वर यूजर्स हे चित्र व्हायरल करून दावा करत आहेत कि युक्रेन च्या एका शेतकऱ्याने सोयुज रॉकेट चोरले आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. त्यात हि पोस्ट खोटी असल्याचे समजले. जे चित्र व्हायरल होत आहे ते देखील एडिटेड आहे. कजाकिस्तान चे एक जुने चित्र एडिट करून काही लोकं युक्रेन चे असल्याचे सांगून खोटा दावा व्हायरल करत आहेत.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Sao Mon ने 12 मार्च रोजी एक फेसबुक पोस्ट चा स्क्रीनशॉट आपल्या अकाउंट वर पोस्ट केले. ह्यात Wes Brednhof नावाच्या पोस्ट चा उल्लेख केला गेला होता. ह्यात रॉकेट ला ट्रॅक्टर ओढून नेट असल्याचा दिसते. इंग्रजीत दावा करण्यात येत आहे: ‘Just saw this breaking news item about a ukrainian farmer stealing a Russian soyuz rocket. They ain’t ever gettin’ it back. Love those guys.’
ह्या पोस्ट चा मराठी अनुवाद: आता एक ब्रेकिंग न्यूज बघितली, त्यात युक्रेन चा एक शेतकरी रूसी सोयुज राकेट चोरून नेत असल्याचे सांगितले आहे.
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. सोशल मीडिया वर विविध यूजर्स हाच दावा शेअर करत आहेत.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल चित्राच्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी गूगल रिव्हर्स टूलचे वापर केले. व्हायरल चित्र अपलोड करून सर्च केले असल्यास आम्हाला हे चित्र स्पेसडॉटकॉम नावाच्या वेबसाईट वर सापडले. ह्यात सांगितले गेले होते कि हे चित्र 9 अक्टूबर 2018 चे आहे. ह्या चित्रात आम्हाला कुठेच ट्रैक्टर दिसत नाही आहे. पूर्ण बातमी इथे बघा.
व्हायरल चित्र आम्हाला गेटी इमेजस च्या वेबसाईट वर देखील मिळाली. त्यात सांगितले गेले होते कि हे चित्र 9 अक्टूबर 2018 रोजी सोयुज रॉकेट ला ट्रेन च्या माध्यमाने लॉन्च पैड पर्यंत नेले होते. पूर्ण बातमी इथे वाचा.
हे चित्र अलामी डॉट कॉम वर देखील बघू शकता.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट च्या तपासासाठी इमेल द्वारे युक्रेन च्या फॅक्ट चेकिंग टीम ला संपर्क केला आहे. तिथून उत्तर आल्यावर लगेच फॅक्ट चेक अपडेट करण्यात येईल.
विश्वास न्यूज ने शेवटी खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात कळले कि फेसबुक यूजर Sao Mon चे तीन हजार फ्रेंड्स आहेत. यूजर थायलंड बँकॉक चा रहिवासी आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. रॉकेट चे जुने चित्र एडिट करून आता व्हायरल करण्यात येत आहे.
- Claim Review : Just saw this breaking news item about a ukrainian farmer stealing a Russian soyuz rocket. They ain’t ever gettin’ it back. Love those guys.
- Claimed By : Sao Mon
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.