Fact Check: बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असणारा पोस्टर एडिटेड आहे, एडिटिंग च्या मदतीने रंग बदलण्यात आला आहे
शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रासोबत व्हायरल होत असलेले पोस्टर खोटे आहे. एडिटिंग टूल च्या मदतीने मूळ पोस्टर चा रंग बदलून त्यांच्या गळ्यात असलेल्या उपरण्याचा रंग बदलून हिरवा रंग करून चुकीच्या दाव्यांसह व्हायरल करण्यात येत आहे.
- By: Abhishek Parashar
- Published: Jan 23, 2021 at 11:04 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्टर व्हायरल होत आहे, ज्यात टिपू सुलतान च्या छायाचित्रासोबत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र वापरले गेले आहे. व्हायरल होत असलेल्या पोस्टर चा रंग हिरवा होता ज्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या गळ्यात असलेले उपरणे देखील हिरव्या रंगाचे दिसते.
पोस्टर च्या रंगला घेऊन हिंदुत्वाची राजनीती करणाऱ्या भगवा राजनेतिक दलाच्या विचारधारेत आलेल्या बदल, असा दावा करून पोस्ट व्हायरल केली जात आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा पूर्णपणे खोटे असल्याचे समजले. व्हायरल होत असलेला पोस्टर एडिटेड आहे आणि पार्टी च्या दुष्प्रचाराच्या हेतूने एडिट करून त्यात हिरवा रंग देण्यात आला आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Gyan Yadav’ ने पोस्टर शेअर केले (आर्काइव्ह व्हर्जन) आणि लिहले, “मराठा मानुष, कट्टर भगवा वाद, छत्रपति शिवाजी महाराज के नाम से राजनीति करने वाले एक क्षेत्रीय राजनैतिक दल का वर्तमान कायाकल्प…😎🤔।”
इतर सोशल मीडिया यूजर्स ने देखील या छायाचित्राला खरे मानून शेअर केले आहे आणि अश्याच दाव्यांसह शेअर केले आहे.
तपास:
व्हायरल पोस्टर वर शेअर करणाऱ्या नेत्याचे नाव लिहले गेले आहे. आम्ही त्या पोस्टर वर दिल्या गेलेल्या नंबर वर सलमान हाश्मी यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले, “व्हायरल होत असलेली पोस्ट एडिटेड आहे. महाराष्ट्र सरकार वर टीका करण्यासाठी विचारपूर्वक या पोस्टर चा रंग बदलण्यात आला आहे, म्हणजे हिंदू-मुसलमान च्या राजनीतीवर लोकांमध्ये मतभेद निर्माण होतील.”
हाश्मी यांनी सांगितले कि मूळ पोस्टर मध्ये शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या गळ्यात केशरी रंगाचे अंगवस्त्र दिसते ज्याला व्हायरल पोस्ट मध्ये एडिटींग टूल च्या मदतीने बदलून हिरव्या रंगाचे केले आहे. तसेच मूळ पोस्टर भगव्या रंगाचे बनवले गेले आहे आणि एडिटिंग करून त्याला हिरव्या रंगाचे करण्यात आले आज. हाश्मी यांनी विश्वास न्यूज सोबत मूळ पोस्टर चे छायाचित्र शेअर केले, ज्याने त्यांनी केलेल्या दाव्याची पुष्टी होते.
या बद्दल पोलिसांमध्ये तक्रार केल्याचे विचारले असता त्यांनी सांगितले, “मी या दुष्प्रचाराविरोधात लिखित तक्रार केली आहे.” त्यांनी सांगितले कि २० जानेवारी रोजी लिखित तक्रार देऊन त्यांनी कानूनी कारवाई ची मागणी केली आहे. हाश्मी ने विश्वास न्यूज सोबत तक्रार केल्याची प्रत शेअर केली, जी तुम्ही खाली बघू शकता.
सोशल मीडिया वर आम्हाला सलमान हाश्मी चा ट्विटर प्रोफाइल मिळाला, ज्यात त्यांनी स्वतःला शिव सेने चा नेता असल्याचे सांगितले आहे. हाश्मी यांनी याच संदर्भात एक व्हिडिओ देखील जारी केला आहे.
त्यांच्या प्रोफाइल वर त्यांनी शेअर केलेले बरेच पोस्टर आम्हाला मिळाले. आम्हाला असा एक पण पोस्टर नई मिळाला ज्याचा रंग हिरवा असेल.
व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर ने आपल्या प्रोफाइल वर स्वतःला उत्तर प्रदेश च्या जौनपूर चा रहिवासी असल्याचे सांगितलें आहे. सप्टेंबर २०११ पासून हि प्रोफाइल फेसबुक वर सक्रिय आहे.
निष्कर्ष: शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रासोबत व्हायरल होत असलेले पोस्टर खोटे आहे. एडिटिंग टूल च्या मदतीने मूळ पोस्टर चा रंग बदलून त्यांच्या गळ्यात असलेल्या उपरण्याचा रंग बदलून हिरवा रंग करून चुकीच्या दाव्यांसह व्हायरल करण्यात येत आहे.
- Claim Review : मराठा मानुष, कट्टर भगवा वाद, छत्रपति शिवाजी महाराज के नाम से राजनीति करने वाले एक क्षेत्रीय राजनैतिक दल का वर्तमान कायाकल्प
- Claimed By : Gyan Yadav
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.