Fact Check: अमित शाह च्या बंगाल दौऱ्याच्या छायाचित्रासोबत झाली खोड-तोड, व्हायरल पोस्ट खोटी आहे
विश्वास न्यूज च्या तपासात अमित शाह यांचे व्हायरल छायाचित्र एडिटेड असल्याचे कळले. ओरिजिनल छायाचित्रासोबत खोड-तोड करून बिरयानी आणि मासोळी जोडले गेले आहे. आमच्या तपासात पोस्ट खोटी असल्याचे कळले.
- By: Ashish Maharishi
- Published: Dec 23, 2020 at 10:50 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): पश्चिम बंगाल विधानसभा चुनावाचे वारे वाहत असताना, गृहमंत्री अमित शाह यांचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्याच्या सोबत खोड तोड करून त्याला व्हायरल करण्यात येत आहे. खोट्या छायाचित्रासोबत दावा करण्यात येत आहे कि बंगाल यात्रेच्या च्या वेळी मासोळी-बिरयानी खाल्ली.
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. आम्हाला असे समजले कि अमित शाह चे खरे छायाचित्र एडिट करून व्हायरल करण्यात येत आहे. खऱ्या छायाचित्रात असे काहीच दिसत नाही, जे व्हायरल छायाचित्रात दिसत आहे. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर मेहुल मारू ने १९ डिसेंबर रोजी एक छायाचित्र अपलोड केले आणि लिहले कि बंगाल ची हि निवडणुकांची मासोळी-बिरयानी आहे का? देशात स्वतःच्या मागण्यांसाठी शेतकरी थंडीत रस्त्यावर उतरले आहे, मजदूर, व्यापारी, युवा बेहाल आहे आणि गृहमंत्री मोटाभाऊ मस्त आहेत.
पोस्ट ला खरे मानून दुसरे यूजर्स देखील याला शेअर करत आहेत. फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी अमित शाह यांच्या सोशल मीडिया अकाउंट ला स्कॅन केले. आम्हाला १९ डिसेंबर रोजी केलेले एक ट्विट मिळाले. ट्विट मध्ये बरेच छायाचित्र होते. यात व्हायरल छायाचित्राचा देखील समावेश होता. बंगाली मध्ये केलेल्या या ट्विट मध्ये म्हंटले होते कि मेदिनीपुर च्या बेलिजुरी गावातील एका शेतकऱ्याच्या घरी जेवण केले. हा ट्विट तुम्ही इथे बघू शकता.
गूगल सर्च मध्ये आम्हाला कळले कि १९-२० डिसेंबर रोजी अमित शाह हे बंगाल च्या दौऱ्यावर होते. जागरण डॉट कॉम वरच्या एका बातमीत सांगितले गेले होते कि अमित शाह हे पहिल्याच दिवशी मोदिनीपूर ला पोहोचले होते. ते भाजपा उपाध्यक्ष मुकुल रॉय, राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय आणि राज्य भाजपा प्रमुख दिलीप घोष यांच्या सोबत मोदिनीपूर च्या बेलिजुरी गावातील शेतकरी सनातन सिंह यांच्या घरी पोहोचले आणि स्थानीय लोकांसोबत दुपारी जेवण केले.
तपासाच्या वेळी आम्हाला यूट्यूब वर अमित शाह च्या जेवणाचा एक व्हिडिओ मिळाला. डीडी न्यूज चा हा व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता. इथे कुठेच मासोळी आणि बिरयानी दिसत नाही. व्हिडिओ मध्ये अमित शाह सोबत कैलाश विजयवर्गीय आणि दिलीप घोष देखील दिसतात.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने दैनिक जागरण च्या बंगाल च्या ब्युरो चीफ जे के वाजपेयी यांच्यासोबत संपर्क केला त्यांनी सांगितले कि हे छायाचित्र एडिटेड आहे.
आम्ही ज्या फेसबुक यूजर ने खोटी पोस्ट शेअर केली त्याचा बॅकग्राऊंड चेक केले. त्यात आम्हाला कळले कि फेसबुक यूजर मेहुल मारू हे छत्तीसगढ च्या राजनांदगाव चे रहिवासी आहे. या अकाउंट ला जुलै २००८ मध्ये बनवले गेले होते, त्यांना १० हजार पेक्षा जास्ती लोकं फोल्लो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात अमित शाह यांचे व्हायरल छायाचित्र एडिटेड असल्याचे कळले. ओरिजिनल छायाचित्रासोबत खोड-तोड करून बिरयानी आणि मासोळी जोडले गेले आहे. आमच्या तपासात पोस्ट खोटी असल्याचे कळले.
- Claim Review : बंगाल ची हि निवडणुकांची मासोळी-बिरयानी आहे का? देशात स्वतःच्या मागण्यांसाठी शेतकरी थंडीत रस्त्यावर उतरले आहे, मजदूर, व्यापारी, युवा बेहाल आहे आणि गृहमंत्री मोटाभाऊ मस्त आहेत.
- Claimed By : फेसबुक यूजर मेहुल मारू
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.