Fact check: डॉ विकास आमटे ह्यांच्या नावावर कॅन्सर संबंधी व्हायरल मेसेज खोटा
विश्वास न्यूज च्या तपासात डॉ विकास आमटे ह्यांच्या नावावर व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. विकास आमटे ह्यांनी लिंबाने कॅन्सर ठीक होतो असा कुठलाच संदेश लिहलेला नाही.
- By: Ankita Deshkar
- Published: Apr 18, 2022 at 04:45 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक दावा व्हाट्सअँप वर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत असल्याचे समजले. हा मेसेज आम्हाला आमच्या विश्वास न्यूज च्या व्हाट्सअँप टीप लाईन नंबर वर देखील यूजर्स ने शेअर केला होता. ह्या मेसेज मध्ये असा दावा करण्यात येत होता कि डॉ विकास आमटे ह्यांनी लिंबापासून कॅन्सर चा बचाव काही घरघुती पद्धतींनी कसा करता येईल ह्या वर भाष्य केल्याचे त्यात सांगितले होते. विश्वास न्यूज च्या तपासात, हा दावा खोटा असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
व्हाट्सअँप यूजर्स खालील मराठी दावा आपल्या व्हाट्सअँप ग्रुप्स वर शेअर करत असल्याचे विश्वास न्यूज च्या लक्षात आले. मेसेज खालील प्रमाणे आहे.
डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सर वर सांगितलेला अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय, प्रत्येकाने अवश्य वाचावा असा लेख!!
🍋🍋🍋 लिंबाचे 🍋🍋🍋🙏
🌹अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम🌹
😊स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा..
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..
भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी, नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..
🌹सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..
सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??
🌹लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..
🌹लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते..
लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..
🌹मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??
कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..
तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत..
विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो???
लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे..
लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :
जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..
लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..
आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही..
🙏म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा..
तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल..
🙏डॉ. विकास बाबा आमटे🙏
आनंदवन
🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋
कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचऊया. करुन पहायला काहीच हरकत नाही
तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात सध्या किवर्ड सर्च पासून केली.
आम्हाला The National Academics of Sciences Engineering Medicine च्या वेबसाईट वर एक रिपोर्ट सापडली, ज्यात स्पष्ट लिहले होते, Lemons cannot cure cancer. हि रिपोर्ट इथे वाचा.
आम्हाला इंटरनेट वर असा एक पण रिसर्च किंवा आर्टिकल नाही सापडला ज्यात व्हायरल दावा खरा असल्याचे सिद्ध होईल. कुठेच लिंबाने कॅन्सर ठीक होते असे लिहले नव्हते.
अजून स्पष्ट रित्या समजून घ्यायला आम्ही एक आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर डॉ मनीषा कोठेकर ह्यांना संपर्क केला. त्यांनी विश्वास न्यूज ला सांगितले, “आयुर्वेद मध्ये असा कुठला पण अभ्यास नाही आहे ज्यात स्पष्ट लिहले असेल कि लिंबाने कॅन्सर ठीक होतो. कॅन्सर बऱ्याच प्रकारचे आहे आणि आयुर्वेदात लिंबाचा ते ठीक करण्यास उल्लेख नाही.”
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने थेट डॉ विकास आमटे ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले, “बऱ्याच वर्षांपासून माझ्या नावावर हा दावा व्हायरल होत आहे. हा संदेश मी लिहलेला नाही. मी एक ऍलोपॅथी डॉ आहे आयुर्वेदिक नाही.”
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात डॉ विकास आमटे ह्यांच्या नावावर व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. विकास आमटे ह्यांनी लिंबाने कॅन्सर ठीक होतो असा कुठलाच संदेश लिहलेला नाही.
- Claim Review : डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सर वर सांगितलेला अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय
- Claimed By : WhatsApp user
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.