Fact-Check: १४० पासून सुरु होणारे कॉल्स घेऊ नका असे सांगणारे व्हिडिओ एक प्रोमोशनल ऍक्टिव्हिटी आहे

१४० पासून सुरु होणारे कोणतेही कॉल्स उचलू नका असा व्हिडिओ आणि मेसेज Sony Liv या TV चॅनेल ची प्रोमोशनल ऍक्टिव्हिटी आहे.

नवी दिल्ली, विश्वास न्यूज: विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि व्हाट्सअँप वर व्हिडिओ सोबत एक मेसेजही शेअर केला जात आहे, व्हिडिओमध्ये एक पोलिस आपल्या पेट्रोलिंग व्हॅनद्वारे बोलताना दिसत आहे, जेथे तो लोकांना 140 पासून सुरू होणाऱ्या नंबर वरून कोणताही कॉल न उचलण्यास सांगत आहे. विश्वास न्यूजच्या तपासात असे कळले कि मुंबई पोलिसांनी अश्या व्हिडिओचा प्रसार केला नाही, हे मेसेज ‘Sony Liv’ या चॅनेल ची प्रोमोशनल (प्रचार) ऍक्टिव्हिटी होती.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर, दीपक वैश यांनी फेसबुकच्या मीरा-भाईंदर ठाणे ग्रुपवर हे पोस्ट केलेः
आताच मुंबई पोलिस मेन कंट्रोलचा संदेश प्राप्त झाला आहे की 140 ने सुरुवात होणारे नंबरचे कॉल स्विकारु नयेत. सर्व ग्रुप वर ही माहिती पुढे पाठवा पब्लिक ग्रुप असेल तरी चालेल.

हि पोस्ट या लिंक वर बघा.

तपास:

10 जुलैच्या रात्रीपासून असे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात दहशत निर्माण करीत आहेत. असे लक्षात आले की लोक सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर हे मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

विश्वास न्युज ला देखील असे बरेच व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर शेअर होताना आढळले.

तपासाच्या सुरुवातीला आम्ही मुंबई पोलिसांशी निगडित सगळे ऑफिशिअल अकाउंट्स बघायचे ठरवले.

आम्हाला महाराष्ट्र सायबर चं ट्विटर अकॉउंट सगळ्यात आधी चेक करायचे ठरवले. त्यावर आम्हाला हे मजकूर सापडले.
महाराष्ट्र सायबर सेल प्रमाणे त्यांनी १४० नंबर वरून येणारे कॉल्स उचलण्यास मनाई केली आहे. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे हे टेलिमार्केटिंग कॉल्स आहेत, ज्यात कॉलर तुमची दिशाभूल करून तुमचे बँक डिटेल्स विचारतो.

पण या व्हिडिओ मागे अजून बरच सत्य आहे.

महाराष्ट्र सायबर सेल च्याच अकॉउंट वर आम्हाला खालील मेसेज आढळला,
त्यात असे म्हंटले गेले आहे,
“आमच्या असे निदर्शनास आले कि Sony Liv हे चॅनेल आपल्या नवीन सिरीयल साठी लोकांना कॉल करून त्रासदायक ऑडिओ क्लिप चालवत आहे. तुम्हाला असे कॉल आल्यास घाबरून जाऊ नका आणि या कॉल्स ला टाळा. आम्ही चॅनल ला हि प्रोमोशनल ऍक्टिव्हिटी त्वरित बंद करण्याचे निर्देश दिले आहे.”

तसेच आम्हाला अजून एक ट्विट जो ११ जुलै ला सकाळी करण्यात आला होता तो देखील सायबर सेल च्या ट्विटर अकाउंट वॉर आढळला.

लोकांनी त्यांना Sony Liv कडून आलेल्या कॉल्स ची रेकॉर्डिंग ट्विटरवर शेअर केली आहे.
लोकांना आलेले कॉल्स हे +91 140 897 0061 या नंबर वरून आहे.

ऑडिओ क्लिप मध्ये ‘ऋषी’ नामक एक व्यक्ती बोलत असल्याचे सांगून त्याने एक खून होताना बघितल्याचे कॉल उचलणाऱ्या व्यक्ती ला सांगतो. हे सगळं Sony Liv या चॅनेल च्या एका कार्यक्रमासाठी करण्यात आले आहे.

Sony Liv ट्विटर अकाउंट बघितल्यास असे दिसले कि चॅनेल नि आपल्या या कृत्यासाठी माफी मागितली आहे.

विश्वास न्यूज ला याच संदर्भात एक मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाउंट वॉर केलेला एक ट्विट देखील सापडला,
ज्यात त्यांनी म्हंटले, ‘कुठलीही पब्लिसिटी चांगली पब्लिसिटी असते असे नाही. कोणतीही पब्लिसिटी ज्यात लोकांमध्ये दहशत निर्माण होत असेल त्याबद्दल कठोर कारवाई केली जाईल. आम्हाला अशा आहे कि आता असे कॉल्स लोकांना त्रास देत नसतील.”

विश्वास न्युज ने मुंबई पोलीस चे डीसीपी शाहजी उमाप यांच्या सोबत संपर्क साधला, त्यांनी सांगितले कि पोलिसांनी १४० नंबर पासून सुरु होणारे कॉल्स घेऊ नका, या संदर्भात कुठलेही व्हिडिओ प्रसारित केले नाही. त्यांनी असे देखील सांगितले कि Sony Liv च्या प्रोमोशनल ऍक्टिव्हिटी ची मुंबई पोलिसांनी आणि सायबर सेल नि दखल घेतली आहे आणि त्यांना तसे करण्यास मनाई केली आहे.

आम्ही व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्ती चा सोशल बॅकग्राऊंड चेक केला, त्यात असे कळले कि दीपक वैश हे मीरा रोड, मुंबई चे रहिवासी आहे आणि त्यांनी असे बरेच व्हिडिओ आणि मेसेज आपल्या प्रोफाइल वर शेअर केले आहे.

निष्कर्ष: १४० पासून सुरु होणारे कोणतेही कॉल्स उचलू नका असा व्हिडिओ आणि मेसेज Sony Liv या TV चॅनेल ची प्रोमोशनल ऍक्टिव्हिटी आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट