Fact Check: दिलीप कुमार ने वक्फ बोर्ड च्या नावावर कोणतीच प्रॉपर्टी नाही केली, व्हायरल दावा खोटा आहे
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. विश्वास न्यूज ला कळले कि स्वर्गीय बॉलीवूड अभिनेते, दिलीप कुमार यांनी वक्फ बोर्ड ला ९८ कोटी रुपयांची प्रॉपर्टी दान केली नाही.
- By: Umam Noor
- Published: Jul 12, 2021 at 02:18 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले, या घटनेनंतर सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि अभिनेता दिलीप कुमार अका युसूफ खान यांच्या निधनापूर्वी त्यांनी ९८ कोटी ची प्रॉपर्टी वक्फ बोर्ड ला दान केली. विश्वास न्यूज च्या तपासात हा व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. स्वर्गीय अभिनेते दिलीप कुमार यांचे स्पोक्सपर्सोन फैसल फारूकी आणि वक्फ बोर्ड महाराष्ट्राचे सीईओ अनिस शेख यांनी व्हायरल दावा खोटा असल्याचे सांगितले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, ‘Sanjay Kumar Chugh’ यांनि पोस्ट मध्ये लिहले: यूसुफ खान उर्फ दिलीप कुमार निकल लिए,जीते जी हिंदू बनकर हिंदुओं का खाया और मरते समय 98 करोड़ की प्रॉपर्टी वक्फ बोर्ड को दान कर गए ! सब जिहादी है !
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
7 जुलाई 2021 रोजी दिलीप कुमार यांचे मुंबई च्या हिंदुजा दवाखान्यात निधन झाले आणि त्यानंतर त्यांच्यासोबत हा मजकूर सोशल मीडिया वर व्हायरल व्हायला लागला. आम्ही सगळ्यात आधी व्हायरल दाव्यावर न्यूज सर्च करण्यास सुरुवात केली. सर्च मध्ये आम्हाला कुठलीच अशी बातमी सापडली नाही ज्यात दिले असेल कि दिलीप कुमार यांनी मृत्यूच्या आधी आपल्या प्रॉपर्टी मधील ९८ कोटी रुपये वक्फ बोर्ड च्या नावाने दान केले.
यांचे मुंबई च्या हिंदुजा दवाखान्यात निधन झाले आणि त्यानंतर त्यांच्यासोबत हा मजकूर सोशल मीडिया वर व्हायरल व्हायला लागला. आम्ही सगळ्यात आधी व्हायरल दाव्यावर न्यूज सर्च करण्यास सुरुवात केली. सर्च मध्ये आम्हाला कुठलीच अशी बातमी सापडली नाही ज्यात दिले असेल कि दिलीप कुमार यांनी मृत्यूच्या आधी आपल्या प्रॉपर्टी मधील ९८ कोटी रुपये वक्फ बोर्ड च्या नावाने दान केले.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही दिलीप कुमार यांचे स्पोक्सपर्सन फैसल फ़ारूक़ी यांना संपर्क केला, आणि त्यांना व्हायरल पोस्ट मधली माहिती विचारली. त्यांनी आमच्यासोबत एसेम होक्स स्लेयर चे ट्विट शेअर केले ज्यात लिहले होते कि व्हायरल पोस्ट खरी नाही.
अधिक माहिती संबंधी विश्वास न्यूज ने वक्फ बोर्ड महाराष्ट्र चे सीईओ अनिस शेख यांना देखील संपर्क केला. त्यांनी पण स्पष्ट की कि दिलीप कुमार यांनी वक्फ बोर्ड ला कुठलीच प्रॉपर्टी दान केली नाही. अशी कुठलीच माहिती वक्फ बोर्ड कडे नाही.
आता आम्ही खोटा दावा शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर Sanjay Kumar Chugh यांचे सोशल मीडिया स्कॅनिंग केले. हा यूजर पानिपत चा रहिवासी असून एका विशिष्ठ पार्टी चा मेंबर आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. विश्वास न्यूज ला कळले कि स्वर्गीय बॉलीवूड अभिनेते, दिलीप कुमार यांनी वक्फ बोर्ड ला ९८ कोटी रुपयांची प्रॉपर्टी दान केली नाही.
- Claim Review : Dilip Kumar donated property worth Rs 98 Cr to WAQF board
- Claimed By : Sanjay Kumar Chugh
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.