Fact Check: CNN चा एडिटेड स्क्रीनशॉट सोशल मीडिया वर खोट्या दाव्यासह व्हायरल

विश्वास न्यूजच्या तपासात सीएनएनच्या स्क्रिनशॉटबाबतचा व्हायरल दावा खोटा निघाला. सीएनएनचा स्क्रीनशॉट एडिट करून व्हायरल केला जात आहे. ही बातमी सीएनएनने प्रसिद्ध केलेली नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सीएनएन च्या बातमीचा एक स्क्रीसंहोतं शेअर करण्यात येत आहे. दावा करण्यात येत आहे कि सीएनएनने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, रशियन सैन्याने एका गोदामाला आग लावली ज्यामध्ये लहान मुले आणि महिला होत्या. विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हायरल दावा खोटा निघाला. सीएनएनचा स्क्रीनशॉट एडिट करून व्हायरल केला जात आहे. ही बातमी सीएनएनने प्रसिद्ध केलेली नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर सैम आर्मस्ट्रांग ने व्हायरल दावा शेअर केला आणि लिहले: When did you realize that the MSM is an arm of the establishment and cannot be trusted to tell the truth on anything of import?
हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

https://twitter.com/navyhato/status/1522421815716421632

तपास:
व्हायरल स्क्रीनशॉटचे सत्य जाणून घेण्यासाठी, आम्ही अनेक कीवर्डद्वारे Google वर शोधले, परंतु आम्हाला व्हायरल दाव्याशी संबंधित कोणतीही रिपोर्ट सापडली नाही. त्यानंतर आम्ही CNN च्या वेबसाइट आणि सोशल मीडिया खात्यांमधून गेलो, परंतु व्हायरल स्क्रीनशॉटशी संबंधित कोणतीही बातमी सापडली नाही.

पुढे जाऊन आम्ही गुगल रिव्हर्स इमेज द्वारे फोटो शोधला. यादरम्यान, आम्हाला गेटी इमेजेसवर व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये चित्र सापडले. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे छायाचित्र 1993 मध्ये अमेरिकेतील टेक्सास शहरात घेण्यात आले होते. जेव्हा अल्कोहोल ब्युरोने ब्रँच डेव्हिडियन्सच्या माउंट कार्मेल कंपाऊंडवर छापा टाकला.

अधिक माहितीसाठी, आम्ही स्क्रीनशॉट जवळून पाहिला त्यात कळले कि तो केटी बो लिलिस, नताशा बर्ट्रांड आणि बार्बरा स्टार यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर आम्ही ट्विटरद्वारे केटी बो लिलिसशी संपर्क साधला आणि व्हायरल स्क्रीनशॉट तिच्यासोबत शेअर केला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. त्यांनी अशी कोणतीही बातमी प्रसिद्ध केलेली नाही. हा स्क्रीनशॉट एडिटेड आहे.

विश्वास न्यूजने तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, व्हायरल पोस्ट शेअर केलेल्या प्रोफाइलची पार्श्वभूमी तपासली. आम्हाला कळले की फेसबुकवर वापरकर्त्याचे 351 मित्र आहेत. सॅम आर्मस्ट्राँग हा न्यूयॉर्कचा आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात सीएनएनच्या स्क्रिनशॉटबाबतचा व्हायरल दावा खोटा निघाला. सीएनएनचा स्क्रीनशॉट एडिट करून व्हायरल केला जात आहे. ही बातमी सीएनएनने प्रसिद्ध केलेली नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट