Fact Check: २०१९ मधल्या प्रयागराज कुंभ मध्ये सहभागी झालेल्या आदित्यनाथ यांचे छायाचित्र आताचे सांगून होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात समोर आले कि युपी सीएम योगीआदित्यनाथ यांना घेऊन व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. व्हायरल छायाचित्र २०१९ प्रयागराज कुंभ चे आहे, जेव्हा योगी यांनी धार्मिक स्नान केले होते

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे एक छायाचित्र व्हायरल होत असतानाचे दिसते. या छायाचित्रात योगी हे साधूंसोबत नदी मध्ये आंघोळ करताना दिसतात. सोशल मीडिया यूजर्स दावा करत आहे कि हे छायाचित्र युपी सीएम चे आता हरिद्वार मध्ये आयोजित कुंभ मेळाव्याचे आहे. आणि तिथे गेल्यानंतरच ते कोरोना संक्रमित झाले. विश्वास न्यूज च्या तपासात सीएम योगी यांच्याबद्दल चा दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल छायाचित्र २०१९ च्या प्रयागराज कुंभ चे आहे, जिथे योगी ने धार्मिक स्नान केले होते.

सोशल मीडिया यूजर्स आता योगी आदित्यनाथ यांचे जुने छायाचित्र शेअर करून ते आताचे असल्याचा दावा करत आहे. २०१९ मध्ये प्रयागराज मध्ये कुंभ चे आयोजन झाले होते, तेव्हा कोरोनाव्हायरस संक्रमण नव्हते.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर शशी कांत ने १५ एप्रिल २०२१ ने व्हायरल छायाचित्र शेअर करून लिहले: ‘#योगीआदित्यनाथ हुए #कोरोना पोज़िटिव, ये कौनसी #जमात में जाकर आये थे! #पूछताहै_भारत 😂।’
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघा.

या शिवाय मोहम्मद इरशाद मलिक आणि Akeel Khan नावाच्या फेसबुक यूजर्स ने देखील योगी आदित्यनाथ चे व्हायरल छायाचित्र शेअर करून याच दाव्यासह पोस्ट शेअर केली.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज सर्च टूल च्या मदतीने शोधले. आम्हाला इंटरनेट वर योगी आदित्यनाथ यांचे असेच मिळते जुळते छायाचित्र बर्याचक्सह ठिकाणी मिळाले. आम्हाला हे छायाचित्र sakshi.com या वेबसाईट वर मिळाले. या वेबसाईट वर फोटो गॅलरी मध्ये हे छायाचित्र होते. त्यात दिलेल्या कॅप्शन प्रमाणे. युपी सीएम योगी आदित्यनाथ आपल्या कॅबिनेट सहयोगिनीसोबत प्रयागराज कुंभ मध्ये गेले असताना त्यांनी तिथे संगम मध्ये आंघोळ केली. फोटो गॅलरी मध्ये १५ छायाचित्र होते, ज्यात व्हायरल होत असलेले छायाचित्र हे १३व्या क्रमांकावर होते. या फोटो गॅलरी ला तुम्ही इथे बघू शकता.

साक्षी डॉट कॉम वेबसाईट वर मिळालेल्या माहितीप्रमाणे आम्ही ह्या व्हायरल छायाचित्राचा इंटरनेट वर तपास केला. आम्हाला ३० जानेवारी २०१९ रोजी एनडीटीवी च्या वेबसाईट वर प्रकाशित एका रिपोर्ट मध्ये देखील हे छायाचित्र मिळाले. या रिपोर्ट मध्ये सांगितले गेले होते कि योगी आदित्यनाथ आपल्या मंत्र्यांसोबत प्रयागराज कुंभ मध्ये स्नान करताना. या रिपोर्ट ला देखील तुम्ही इथे बघू शकता.

विश्वास न्यूज ला आता पर्यंत हे कळले होते कि हे छायाचित्र २०१९ चे आहे आता एप्रिल २०२१ च्या हरिद्वार कुंभ चे नाही. कोरोनाव्हायरस संक्रमणाचा पहिला रुग्ण डिसेंबर २०१९ मध्ये आढळला होता. आता हरिद्वार कुंभ मध्ये देखील बरेच केसेस समोर आले होते, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतीकात्मक कुंभ मानवण्याची अपील केली होती.

विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात योगी आदित्यनाथ यांचे मीडिया एडवाइजर मुत्युंजय कुमार यांच्या सोबत हा दावा शेअर केला. त्यांनी सांगितले कि हे छायाचित्र २०१९ प्रयागराज मध्ये आयोजित केलेल्या कुंभ चे आहे. काही लोकं हे छायाचित्र आता व्हायरल करत आहे.

व्हायरल दावा शेअर करणारे फेसबुक यूजर शशि कांत यांची प्रोफाइल आम्ही स्कॅन केली. त्यात आम्हाला समजले कि यूजर श्रीगंगानगर चे रहिवासी आहेत

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात समोर आले कि युपी सीएम योगीआदित्यनाथ यांना घेऊन व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. व्हायरल छायाचित्र २०१९ प्रयागराज कुंभ चे आहे, जेव्हा योगी यांनी धार्मिक स्नान केले होते

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट