Fact Check: सीएम योगी आदित्यनाथ ह्यांनी जाट समुदायाबद्दल नाही केले ट्विट, एडिटेड स्क्रीनशॉट होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात सीएम योगी आदित्यनाथ ह्यांच्या नावाने व्हायरल झालेला स्क्रीनशॉट फेक आहे, ज्याला एडिट करून व्हायरल करण्यात येत आहे. सीएम योगी आदित्यनाथ ने असे काही ट्विट केले नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर परत एकदा एक स्क्रीनशॉट शेअर करून दावा करण्यात येत आहे कि हा ट्विट योगी आदित्यनाथ ह्यांनी करून जाट समुदायाला धमकावले आहे. असे सांगण्यात येत आहे कि त्यांनी ट्विट करून म्हंटले आहे कि 10 मार्च मा कैराना मुजफ्फरनगर, बागपत आणि मथुराच्या जाटांच्या गर्मी चा इलाज करून देईल. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात व्हायरल स्क्रीनशॉट खोटा असल्याचे समजले. ह्याला एडिट करून दुष्प्रचार करण्याच्या हेतूने व्हायरल करण्यात येत आहे. सीएम योगी आदित्यनाथ ने असे ट्विट केले नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Rohit Khokher (Choudhary) ने व्हायरल स्क्रीनशॉट शेअर करून लिहले: हमारी गर्मी का इलाज हो बाबा तेरे पे। जाट है हम, जयंत चौधरी जिंदाबाद वोट जागी लोकदल की।

फेसबुक यूजर Sushil Panwar ने देखील अशी पोस्ट शेअर केली आणि असाच दावा फेसबुक वर शेअर केला. सोशल मीडिया वर लोकं असाच दावा शेअर करत आहे. ह्या पोस्टचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही योगी अधित्यनाथ च्या सोशल मीडिया अकाउंट्स चा तपास केला. पण आम्हाला व्हायरल दाव्यासारखा दावा कुठेच मिळाला नाही. ह्यानंतर आम्ही पोस्ट व्यवस्थित पहिले तेव्हा लक्षात आले कि व्हायरल स्क्रीनशॉट मधील भाषेत बऱ्याच चुका आहेत. सोबतच आम्हाला त्यात भाषेच्या बऱ्याच चुका दिसल्या, ज्यात टेक्स्ट बोल्ड आणि मोठ्या अक्षरात आहे, ट्विटर वर असा फॉन्ट नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

अधिक माहिती करीत आम्ही राष्ट्रीय प्रवक्ता विजय सोनकर शास्त्री ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल दावा खोटा आहे. सीएम योगी ने असे कुठलेच ट्विट केले नाही. त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी खोट्या दाव्यासह हा ट्विट शेअर करण्यात येत आहे. त्यांनी केलेले वक्तव्य हे अपराध्यांबद्दल होते. त्यांनी जाट किंवा कुठल्या समुदायाबद्दल काही म्हंटले नाही. सीएम योगी अपराध्यांना सजा देण्यासाठी निडरता ने काम करत आहे.

कैराना येथील समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार चौधरी नाहिद हसन हे 15 जानेवारी रोजी नामांकनासाठी शपथपत्र दाखल करण्यासाठी शामली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले तेव्हा पोलिसांनी त्यांना गँगस्टर कायद्यांतर्गत अटक केली. यावर नाहिद हसन यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले असून योगींप्रमाणे ते खोट्या केसमुळे रडणार नाहीत, असे म्हटले आहे.

सीएम योगी आदित्यनाथ यांनी 30 जानेवारी रोजी पिलखुआ, हापूर येथे आयोजित रॅलीला संबोधित करताना नाहिद हसनच्या या तीक्ष्ण टीकेला प्रत्युत्तर दिले. “उन्होंने रैली में कहा कि ये गर्मी जो अभी कैराना और मुजफ्फरनगर में कुछ जगह दिखाई दे रही है न, ये सब शांत हो जाएगी। मैं मई और जून की गर्मी में भी शिमला बना देता हूं। इससे पहले उन्होंने ट्वीट करते हुए कहा था कि कैराना से तमंचावादी पार्टी का प्रत्याशी धमकी दे रहा है, यानी गर्मी अभी शांत नहीं हुई है! 10 मार्च के बाद गर्मी शांत हो जाएगी।”

तपासाच्या अंत मध्ये आम्ही दावा शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर Rohit Khokher (Choudhary) चा अकाउंट तपासला. सकॅनिंग मध्ये आम्हाला कळले कि त्यांना 280 लोकं फॉलो करतात. यूजर उत्तर प्रदेश च्या छपरौली शहर चे रहिवासी आहे. Rohit Khokher (Choudhary) मार्च 2012 पासून फेसबुक वर सक्रिय आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात सीएम योगी आदित्यनाथ ह्यांच्या नावाने व्हायरल झालेला स्क्रीनशॉट फेक आहे, ज्याला एडिट करून व्हायरल करण्यात येत आहे. सीएम योगी आदित्यनाथ ने असे काही ट्विट केले नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट