Fact-check: सावरकरांच्या नावावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिप मध्ये खरंच ते नाही

विश्वास न्यूज च्या तपासात, सावरकरांचा दुर्मिळ खरा व्हिडिओ असा दावा करत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये सावरकर नाहीत. हा व्हिडिओ विनायक दामोदर सावरकर, यांच्यावर सरकारने बनवलेल्या एका माहितीपटाचा भाग आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूजला एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत असल्याचा दिसला. यात असा दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ स्वातंत्र्यवीर सावरकरांचा खरा व्हिडिओ आहे आणि तो एका ब्रिटिश पत्रकाराने तेव्हा अंदमान च्या कारागृहात शूट केला आहे. पुढे यात असे म्हंटले आहे कि हा दुर्मिळ व्हिडिओ, बीबीसी ने आता ब्रॉडकास्ट केला आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे समोर आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Chandrashekhar Chandorkar यांनी हा १ मि ३६ सेकंदाची व्हिडिओ क्लिप फेसबुक वर १ जून रोजी शेअर केली आणि लिहले:
स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमान कारावासात असताना एका ब्रिटिश पत्रकाराने चित्रित केलेला हा दुर्लभ व्हिडीओ बीबीसीने प्रसारित केला आहे.
यात त्या छोट्या कोठडीत व कोलू चालवताना सावरकर दिसत आहेत..

हि पोस्ट आणि याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी हि व्हिडिओ क्लिप निरखून बघितली, आम्हाला त्यात ‘भूगोल’ असा लोगो दिसला, बीबीसी चा नाही.

आम्हाला बीबीसी च्या कुठल्याच सोशल साईट्स वर देखील हा व्हिडिओ दिसला नाही.

थोडा कीवर्ड सर्च केल्यावर आणि किफ्रेम्स वर गूगल इमेज सर्च वापरल्यावर, विश्वास न्यूज ला हा व्हिडिओ मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मशन अँड ब्रॉडकास्टींग च्या युट्युब चॅनेल वर अपलोड केल्याचा दिसला. हा ४० मि ५८ सेकंदाचा व्हिडिओ १४ ऑगस्ट २०१४ रोजी अपलोड करण्यात आला होता. याचे शीर्षक होते, “Life of Shri Vinayak Damodar Savarkar

याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते, “Shri Vinayak Damodar Savarkar was a fearless freedom fighter, social reformer, writer, dramatist, poet, historian, political leader and philosopher. Savarkar’s thoughts touch upon virtually every aspect of nation-building and are relevant even today. The film depicts various important events in his life.

अनुवाद: श्री विनायक दामोदर सावरकर हे एक निर्भय स्वातंत्र्यसैनिक होते, ते एक समाजसुधारक, लेखक, नाटककार, कवी, इतिहासकारक, नेते आणि तत्वज्ञानी देखील होते. सावरकरांचे विचार या देशाला घडवण्यासाठी मदतीचे ठरत आहेत. याच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण या चित्रपटाद्वारे बघा.
या चित्रपटातील २५ मिनीटानंतर, व्हायरल क्लिप दिसते.

मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मशन अँड ब्रॉडकास्टींग च्या फिल्म्स डिव्हिजन प्रमाणे, आम्हाला कळले कि हा माहितीपट, प्रेम वैद्य यांनी बनवला, आणि फिल्म्स डिव्हिजन ने या माहितीपटाच्या उत्पादन केले. हा माहितीपट १९८३ साली बनवण्यात आला.

अधिक माहिती साठी विश्वास न्यूज ने अक्षय जोग यांना संपर्क केला, ते सावरकर अभ्यासक आणि लेखक आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर: आक्षेप आणि वास्तव’ याचे ते लेखक आहे. त्यांनी आम्हाला सांगितले, “व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सरकारद्वारे बनवण्यात आलेल्या माहितीपटाच्या एक भाग आहे. हा माहितीपट प्रेम वैद्य यांनी बनवला होता जेव्हा इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या”.

विश्वास न्यूज ने आता ज्या फेसबुक यूजर ने हा व्हिडिओ शेअर केला, चंद्रशेखर चांदोरकर यांचे सोशल बॅकग्राऊंड चेक केले. आम्हाला कळले कि चांदोरकर हे नाशिक चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, सावरकरांचा दुर्मिळ खरा व्हिडिओ असा दावा करत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये सावरकर नाहीत. हा व्हिडिओ विनायक दामोदर सावरकर, यांच्यावर सरकारने बनवलेल्या एका माहितीपटाचा भाग आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट