सीडीसी ने कोरोनाव्हायरस पासून बचाव साठी चेहऱ्याच्या केसांवरून कुठल्याच प्रकारचे गाईडलाईन जारी केले नाही. व्हायरल ग्राफिक जुने आहे त्याचा कोविड-19 सोबत काहीच संबंध नाही.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक चेहऱ्यावरचे केसं आणि रेस्पिरेटोरे चे एक ग्राफिक व्हायरल होत आहे. यात दावा करण्यात येत आहे कि सीडीसी ने म्हंटले कि कोरोनाव्हायरस पासून बचावासाठी लोकांनी चेहऱ्यावरचे केस शेव करायला हवे. विश्वास न्यूज च्या .तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले. व्हायरल ग्राफिक दोन वर्ष जुने आहे, याचा कोरोनाव्हायरस सोबत काही संबंध नाही.
काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला आपल्या फॅक्ट चेकिंग चॅट-बोट 9599299372 वर हा दावा फॅक्ट चेक करता आमच्या यूजर्स ने पाठवला. चेहऱ्याचे केस आणि रेस्पिरेटोर वर आधारित या ग्राफिक सोबत दावा केला जात आहे कि अमेरिका सेन्टर फॉर डिसीज कण्ट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) ने म्हंटले कि कोरोनाव्हायरस पासून बचावा करता चेहऱ्यावरचे केस शेव करायला हवे.
या पोस्ट ला फेसबुक वर पण शेअर करण्यात येत आहे. त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल ग्राफिक गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर करून इंटरनेट वर शोधले. आम्हाला हे ग्राफिक सेन्टर फॉर डिजीज कंट्रोल्स एंड प्रिवेंशऩ (CDC) च्या वेबसाईट वर नोव्हेंबर २०१७ च्या एका ब्लॉग पोस्ट वर मिळाले. हि पोस्ट नेशनल इंस्टीट्यूट फॉर ऑक्यूपेशनल सेफ्टी एंड हेल्थ (NIOSH) कडून रेस्पिरेटोर घालण्यासंबंधित माहितीवर आधारित होती.
हे ग्राफिक कोरोनाव्हायरस समोर यायच्या दोन वर्षापेक्षा अधिक वेळी शेअर केला गेला होता.
सीडीसी ने ब्लॉग पोस्ट च्या वर एक चेतावनी देखील लिहली होती: २०१७ ची हि ब्लॉग पोस्ट आणि इन्फोग्राफिक अश्या कर्मचाऱ्यांसाठी आहे चे काम करताना रेस्पिरेटर्स चा उपयोग करतात. कोरोनाव्हायरस (कोविड-19) बाबतीत अधिक नवीन माहिती करीत सीडीसी च्या कोविड-19 वेबसाईट वर जा.
NIOSH ने फेब्रुवारी २०२० मध्ये यावरून एक ट्विट देखील केले होते. या ट्विट मध्ये लिहले होते, “@CDCgov सध्यातरी #COVID19 मध्ये साधारण जाणते ला रेस्पिरेटोर वापरण्याचा सल्ला देत नाही. २०१७ चे हे ग्राफिक अश्या कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांना हवेत असलेल्या हानिकारक गोष्टींपासून स्वतःचा बचाव करायचा असतो. अश्यात चेहऱ्यावरच्या केसांमुळे टाईट सील लीक होण्याची शक्यता असते.
विश्वास न्यूज ने या संबंधित अपोलो हॉस्पिटल चे पल्मोनोलॉजिस्ट डॉक्टर निखिल मोदी यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि, “कोविड-19 संक्रमित व्यक्तीच्या खोकलण्याने किंवा शिंकण्याने जे ड्रॉप्लेट्स निघतात त्याने कोरोनाव्हायरस चे संक्रमण पसरते. चेहऱ्याच्या केसांनी हे ठरत नाही कि कोण यांनी संक्रमित होईल आणि कोण नाही. सगळ्यांना सुरक्षित राहणे आणि चांगल्या हायजिन चे पालन करण्याची गरज आहे.
या पोस्ट ला फेसबुक वर Joel Vincent Brown नावाच्या यूजर ने शेअर केले. यूजर च्या प्रोफाइल ला स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि यूजर व्हर्जिनिया चे रहिवासी आहे.
निष्कर्ष: सीडीसी ने कोरोनाव्हायरस पासून बचाव साठी चेहऱ्याच्या केसांवरून कुठल्याच प्रकारचे गाईडलाईन जारी केले नाही. व्हायरल ग्राफिक जुने आहे त्याचा कोविड-19 सोबत काहीच संबंध नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923