X
X

Fact Check: व्हायरल व्हिडिओ PUBG व्यसनी मुलाचा नाही, व्हायरल दावा खोटा आहे

PUBG व्यसनी मुलाचा असल्याचा दावा करून इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केलेला व्हिडिओ सोबतचा दावा खोटा आहे. व्हिडीओमधला मुलगा malingering त्रस्त होता.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका मुलाचा व्हिडिओ प्रसारित होत असल्याचे विश्वास न्यूजच्या समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा एका स्ट्रेचर वर रिकाम्या नजरेने हातवारे करताना दिसत आहे, असा दावा केला जात आहे की PUBG गेमच्या व्यसनामुळे मुलाची स्थिती अशी आहे. विश्वास न्यूजने केलेल्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर ‘পঙ্কজ পাঠক’ 10 एप्रिल रोजी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि बंगालीमध्ये लिहिले: PUBg ক খেলা এটা শিশু কি হল চাওঁক। .. আজিয়েই শিশুক মোবাইল দিয়া বন্ধ কক , নহেলে আপুনিও পাঁচকুভা দিন জানাবলৈ পাব ।

भाषांतर: PUBG खेळणाऱ्या मुलाचे काय झाले ते पहा. … आजच मुलांना मोबाईल देणे बंद करा, नाहीतर भविष्यात असे दिवस पहावे लागतील

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने तपासाच्या सुरुवातीला इन्व्हिड टूल चा वापर केला. त्यात आम्ही व्हिडिओ अपलोड करून विविध स्क्रीनग्रॅब घेतले आणि त्यानंतर त्यावर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला.

विश्वास न्यूज ला ETVBharat वर April 8, 2022 रोजी प्रकाशित एक बातमी सापडली. आर्टिकल तेलगू मध्ये होते, त्याचे शीर्षक होते: Addicted to ‘Free Fire’ .. the analogy is the same disturbance .. firing a gun in the gall …

हे आर्टिकल इथे वाचा.

त्यानंतर आम्हाला टाइम्स ऑफ इंडिया वर प्रकाशित एक आर्टिकल सापडले.

ह्या आर्टिकल चे शीर्षक होते: Video of boy not ‘PUBG addiction’, say doctors
हे आर्टिकल April 8, 2022 रोजी प्रकाशित करण्यात आले होते.

आर्टिकल मध्ये सांगण्यात आले होते कि: जरी अनेकांनी दावा केला की हे PUBG च्या व्यसनामुळे होते, परंतु डॉक्टरांनी हे नाकारले की हे अपायकारक प्रकरण आहे ज्यामध्ये रुग्णाने जाणूनबुजून अशा पद्धतीने वागण्याचे नाटक केले असावे.

या बातमीत तिरुनेलवेली एमसीएच डीन, डॉ एम रविचंद्रन यांच्याकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले होते, जिथे मुलाला दाखल करण्यात आले होते.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार पी सुधाकर यांच्याशी संपर्क साधला. हा प्रकार आठवडाभरापूर्वी घडल्याची माहिती त्यांनी दिली. “मुलाला सुरुवातीला तिरुनेलवेली एमसीएचमध्ये दाखल करण्यात आले होते, पालकांनी निदानामुळे नाखूष झाल्यानंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले होते की हे PUBG व्यसनाचे प्रकरण नाही तर ते अपायकारक किंवा उन्मादक आक्षेपाची प्रतिक्रिया आहे.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूजने फेसबुक वापरकर्त्याची सामाजिक पार्श्वभूमी तपासली, পংকজ পাঠক (Acharya Pankaj Pathak) संजीवनी हर्ब्स, गुवाहाटी येथे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

निष्कर्ष: PUBG व्यसनी मुलाचा असल्याचा दावा करून इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केलेला व्हिडिओ सोबतचा दावा खोटा आहे. व्हिडीओमधला मुलगा malingering त्रस्त होता.

  • Claim Review : PUBG खेळणाऱ्या मुलाचे काय झाले ते पहा. … आजच मुलांना मोबाईल देणे बंद करा, नाहीतर भविष्यात असे दिवस पहावे लागतील
  • Claimed By : পংকজ পাঠক (Acharya Pankaj Pathak)
  • Fact Check : Misleading
Misleading
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later