विश्वास न्यूज च्या तपासात भगवंत मान यांचे व्हायरल छायाचित्र मॉर्फ असल्याचे कळले.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर आम आदमी पार्टी चे खासदार भगवंत मान यांचे एक मॉर्फ छायाचित्र व्हायरल होत आहे. यूजर्स दावा करत आहेत कि मागच्या वर्षी जेव्हा लोकडाऊन नंतर दारू चे दुकान उघडले तेव्हा तिथे भगवंत मान हे दारू पिताना दिसले.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. त्यात हि पोस्ट खोटी असल्याचे कळले. पहिले देखील या छायाचित्राला लोकांनी वेग-वेगळ्या दाव्यांसह व्हायरल केले आहे. त्याचा तपास देखील विश्वास न्यूज ने आधी केला होता.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर गगन कौर ने १७ मार्च रोजी भगवंत मान यांचे एडिटेड छायाचित्र अपलोड केले आणि पंजाबी मध्ये लिहले, जुन्या लोकडाऊन च्या आठवणी ताज्या झाल्या जेव्हा पहिल्या दिवशी ठेके उघडले होते.
या फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल छायाचित्राचा तपास रिव्हर्स इमेज सर्च टूल च्या मदतीने सुरु केला. आम्हाला ओरिजिनल छायाचित्र एका फेसबुक अकाउंट वर मिळाले. फेसबुक यूजर सुखवीर बारा ने हे छायाचित्र २७ मे २०२० रोजी पोस्ट केले होते. छायाचित्रात आम्हाला कुठेच दारूचे दुकान दिसले नाही. ओरिजिनल छायाचित्र तुम्ही इथे बघू शकता. या छायाचित्रात भगवंत मान हे मटक्यातून पाणी पिताना दिसतात.
हेच छायाचित्र आम्हाला आम आदमी पार्टी युथ नावाने देखील असलेल्या फेसबुक पेज वर मिळाले. याला ९ मे २०१९ रोजी पोस्ट केले गेले होते.
विश्वास न्यूज ने दोन्ही छायाचित्राचे तुलनात्मक अध्ययन केले. त्यात स्पष्ट दिसते कि भगवंत मान यांच्या ओरिजिनल छायाचित्रात दारूच्या बाटल्या वेगळ्याने लावण्यात आले आहे.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने आम आदमी पार्टी ला संपर्क केला. आम आदमी पार्टी, पंजाब चे मीडिया मॅनेजर हर्षित पाई यांनी आम्हाला सांगितले कि भगवंत मान यांचे व्हायरल इमेज खोटे आहे. हे पहिले देखील व्हायरल झाले आहे.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही फेसबुक यूजर चा तपास केला. आम्हाला कळले कि फेसबुक यूजर गगन कौर च्या फॅन पेज ला एक लाख पक्ष अधिक लोकं फॉलो करतात. हा पेज २१ जुलै २०१७ रोजी बनवला गेला होता.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात भगवंत मान यांचे व्हायरल छायाचित्र मॉर्फ असल्याचे कळले.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923