X
X

Fact Check: बेस्ट नि इलेक्ट्रिक कार सर्विस मुंबई मध्ये नाही सुरु केली, व्हायरल दावा खोटा आहे

विश्वास न्यूज च्या तपासात बेस्ट ने मुंबई मध्ये इलेक्ट्रिक टॅक्सी सुरु करत असल्याचा दावा खोटा असल्याचे समोर आले. व्हायरल दावा खोटा आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होताना दिसली. या चित्रात लाल रंगाच्या कार वर बेस्ट चा लोगो दिसत होता आणि त्या कार जवळ एक माणूस ड्राइवर च्या वेशात उभा असलेला दिसत होता. ह्या पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि लोकांच्या सुविधे साठी बेस्ट ने इलेक्ट्रिक कार सर्विस सुरु केली आहे. पण विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले, स्वतः बेस्ट च्या पीआरओ ने असे सांगितले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Bansilal Garud ने व्हाट्सअँप फॉरवर्ड सारखे दिसणारे एक पोस्ट आपल्या प्रोफाइल वर शेअर केले. Bansilal Garud ह्यांनी मराठीत लिहले: बि एस टि ने आजपासून नविन ईलेक्ट्राँनिक टँक्सी चालू केली आहे.

हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

इतर सोशल मीडिया प्रोफाईल्स वर देखील हे चित्र अश्याच दाव्यासह व्हायरल होत आहे. त्यातील एक खाली बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने आपला तपास सध्या गूगल रिव्हर्स इमेज पासून सुरु केले. जर का बेस्ट नि असे काही उपक्रम सुरु केले असते तर त्याबद्दल नक्कीच कोणत्या मीडिया पोर्टल वर बातमी असती. पण आम्हाला कुठेच अशी बातमी सापडली नाही.

आम्ही विविध सोशल मीडिया वेबसाईट वर देखील ह्याबद्दल कुठे काही मिळते का बघितले. आम्हाला ट्विटर वर BEST Bus Transport, @myBESTBus नावाचा ट्विटर हॅन्डल सापडला. ह्यावर बेस्ट ने मराठी मध्ये एक प्रेस नोट शेअर केली होती.

ज्याचे कॅप्शन होते: Clarification : Regarding viral photo in circulation of an electric cab showing it as BEST vehicle #fakenews #bestupdates

प्रेस नोट मध्ये मराठीत लिहले होते: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका लाल रंगाच्या मोटार कार वर बेस्ट उपक्रमाचा लोगो तसेच बेस्ट इलेक्ट्रिक टॅक्सी असा उल्लेख आणि त्यासोबत चालकाचा गणवेश परिधान केलेला एक व्यक्ती असा फोटो व्हायरल केला जात आहे.
बेस्ट उपक्रमाने खरोखरच अशा प्रकारची टॅक्सी सेवा सुरू केली आहे का? किंवा भविष्यकाळात सुरू करण्याच्या विचार आहे का? अशा प्रकारचे विविध गैरसमज या फोटो आणि मजकुरामुळे निर्माण झालेले आहेत. सदर छायाचित्राबाबत लोकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. अशा प्रकारची कोणतीही टॅक्सी सेवा बेस्ट उपक्रमाद्वारे सुरू करण्यात आलेली नसून नजिकच्या काळात तशा प्रकारची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे मुंबईकर जनता, बेस्ट प्रवासी त्याचप्रमाणे पत्रकार बंधू भगिनींनी अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या कोणत्याही छायाचित्र किंवा मजकुरावर विश्वास ठेऊ नये.

विश्वास न्यूज ने त्यानंतर बेस्ट चे पिआरओ मनोज वराडे ह्यांना संपर्क केला, त्यांनी देखील आम्हाला सांगितले कि बेस्ट ने अशी कुठलीच इलेक्ट्रिक कार ची सेवा सुरु केली नाही. देशातील कुठल्याच शहरात अशी सुविधा नाही आणि तसेच मुंबई मध्ये देखील नाही. आम्ही ह्या चित्राचे मागचे सत्य शोधात आहे. तसेच आम्ही लौकर सायबर गुन्हा देखील दाखल करू असे, पीआरओ म्हणाले.

विश्वास न्यूज ने व्हायरल दावा शेअर करणाऱ्या यूजर चे सोशल बॅकग्राऊंड चेक केले. त्यात कळले कि Bansilal Garud, मनमाड, मुंबई चे रहिवासी आहेत. त्यांचे फेसबुक वर 4990 मित्र आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात बेस्ट ने मुंबई मध्ये इलेक्ट्रिक टॅक्सी सुरु करत असल्याचा दावा खोटा असल्याचे समोर आले. व्हायरल दावा खोटा आहे.

  • Claim Review : बि एस टि ने आजपासून नविन ईलेक्ट्राँनिक टँक्सी चालू केली आहे.
  • Claimed By : Bansilal Garud
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later