Fact Check: बँकॉक मध्ये झालेल्या प्रदर्शनाचे चित्र श्रीलंका मध्ये कोविड मुळे झालेल्या मृत्यू सांगून होत आहे व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल चित्रासोबत केलेला दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. थायलंड मध्ये झालेल्या प्रदर्शनात बॅग्स चा वापर करून कोविड मुळे झालेल्या मृत्यू दर्शवण्यात आल्या, ज्या श्रीलंका चे सांगून व्हायरल होत आहेत.
- By: Pallavi Mishra
- Published: Aug 26, 2021 at 12:37 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक चित्र व्हायरल होताना दिसत आहे, ज्यात प्लास्टिक मध्ये बांधलेले शव दिसतात. व्हायरल पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि ह्या श्रीलंका मध्ये कोविड मुळे झालेले मृत्यू सांगितले होते. विश्वास न्यूज च्या तपासात हा व्हायरल दावा खोटा असल्याचे समोर आले. थायलंड मध्ये झालेले एक विरोध प्रदर्शनाच्या वेळी खोटे शव वापरण्यात आले होते, ह्या पोत्यांमध्ये कोविड मुळे मृत्यू झालेल्या लोकांचे शव आहे असा दावा करण्यात येत आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर The Wes – වෙස් ने हे चित्र शेअर करून सिंघला भाषा मध्ये कॅप्शन लिहले, ज्याचा मराठी अनुवाद आहे: तुम्हाला काय वाटतं ह्या पॅकड कोंबड्या नाही, हे ते लोकं आहेत ज्यांची कोविड मुळे मृत्यू झाली.
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून केला.आम्हाला काही मीडिया रिपोर्ट्स मिळाल्या ज्यात ह्या चित्राचा वापर करण्यात आला होता. 19 जुलै 2021 रोजी worldofbuzz.com मधल्या बातमी मध्ये ह्या चित्राचा वापर केला गेला होता. त्या बातमी प्रमाणे, थायलंड मध्ये 18 जुलै रोजी देशातील महामारी करता लोकांनी पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा चा विरोध केला. त्यात त्यांनी आपली गाड्या रस्त्यावर आणल्या. बातमी प्रमाणे चित्र बँकॉक चे आहे.
आम्हाला ह्या घटनेचा व्हिडिओ एका ट्विट मध्ये मिळाला. ट्विट मध्ये दिलेल्या व्हिडिओ सोबत लिहले होते: प्रदर्शन करणारे आज डेमोक्रेसी मॉन्यूमेंट येथे पोहोचले. सरकार ने कोविड मध्ये चांगले काम न केल्याने लोकांनी विरोध करायच्या ठिकाणी, खोट्या शवांचा ढिगारा रचला. कोविड चा धोका असताना देखील लोकं जमा झालेत.
आम्ही ह्या विषयावर थाई इन्क्वायरर चे रिपोर्टर जेम्स विल्सन ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले, “हे छायाचित्र जुलै 18 चे बँकॉक मधले आहे. प्रदर्शन करणाऱ्यांनी मोक बॉडी बॅग्स द्वारे देशात झालेल्या मृत्यूंना दर्शवले.”
आता आम्ही फेसबुक वर छायाचित्र शेअर करणाऱ्या यूजर ලියුම – The letter च्या प्रोफाइल चा तपास केला. प्रोफाइल स्कॅन केल्यावर कळले कि ह्या पेज चे 311,954 फॉलोवर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल चित्रासोबत केलेला दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. थायलंड मध्ये झालेल्या प्रदर्शनात बॅग्स चा वापर करून कोविड मुळे झालेल्या मृत्यू दर्शवण्यात आल्या, ज्या श्रीलंका चे सांगून व्हायरल होत आहेत.
- Claim Review : Did you think it was packed chickens. No, these are the people who died due to Corona.
- Claimed By : The Wes
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.