Fact Check : हा व्हायरल ट्विट अण्णा हजारे यांचा नाही, फेक आहे

विश्वास न्यूज च्या तपासात अण्णा हजारे ह्यांच्या नावाने व्हायरल होत असलेला ट्विट खोटा असल्याचे समजले. त्यांनी हा ट्विट केलेला नाही.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): अण्णा हजारे एकदा परत सोशल मीडिया वर चर्चेचा विषय बनले आहे. ह्या वेळी त्यांच्या नावाने एक ट्विट व्हायरल होत आहे, ज्याला खरे मानून लोकं शेअर करत आहेत. ह्यात दावा केला जात आहे कि संजय राऊत ह्यांच्या भीती मुळे अण्णा हजारे सीएम उद्धव ठाकरे ह्यांना भेटू शकले नाही. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि अण्णा हजारे ह्यांच्या नावावर व्हायरल होत असलेला ट्विट खोटा आहे. ह्याचा अण्णांसोबत काही संबंध नाही. त्यांच्या टीम ने स्वतः ह्या ट्विट चे खंडन केले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर रियाजत खान ने 5 सप्टेंबर रोजी एका ट्विट चे स्क्रीनशॉट अपलोड करून लिहले: यह कितना कागजी शेर है बीजेपी के मीडिया का बनाया हुआ गीदड!

ह्या दाव्यासह एका ट्विट चा स्क्रीनशॉट देखील वापरल्या गेला आहे, ज्यात अण्णा हजारे ह्यांच्या चित्र समोर @Anna_Hazare_IND लिहले आहे.
कन्टेन्ट मध्ये हिंदीत लिहले आहे: जब मैं सीएम उद्धव ठाकरे के दफ्तर में धरने के लिए परमिशन लेने गया तो मुझे बाहर प्रतीक्षा करने को कहा गया..इस बीच ”संजय राउत” 4 पुलिस वालों साथ हाथ में डंडे लेकर 3 बार मेरे सामने से गुजरे तो हम वापस लौट गए। इस तरह हमको डंडों से डराना लोकतंत्र की हत्‍या है।

ह्या पोस्ट ला अन्य यूजर्स ने देखील शेअर केले आहे. व्हायरल पोस्ट चा कन्टेन्ट जसाच्या तास लिहला गेला आहे. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
अण्णा हजारे ह्यांच्या व्हायरल ट्विट च्या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही आधी गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापस केला. त्यात आम्हाला कळले कि अण्णा हजारे ह्यांनी ठाकरे सरकार ला आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे आणि म्हंटले कि महाराष्ट्र सरकार ने जर लोकायुक्त कानून नाही बनवला तर ते आंदोलन करतील. आम्हाला व्हायरल ट्विट संबंधी कुठलीच बातमी मिळाली नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने व्हायरल ट्विट चा स्रोत शोधण्यास सुरुवात केली. ट्विट मध्ये आम्हाला @Anna_Hazare_IND नावाचा ट्विटर हॅन्डल दिसला. सर्च केल्यावर आम्हाला एक सक्रिय अकाउंट सापडला ज्याला ऑगस्ट 2021 मध्ये बनवले गेले. फॅक्ट चेक होत पर्यंत त्यांचे दोन हजार पेक्षा जास्ती फॉलोवर्स होते. आम्हाला अण्णा हजारे ह्यांचे चित्र देखील ह्यात वापरल्या गेल्याचे दिसले. बऱ्याच ट्विट मधल्या भाषेने हे समजले कि हे फेक हॅन्डल आहे.
आम्हाला इथे व्हायरल ट्विट देखील मिळाला.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने अण्णा हजारे ह्यांच्या टीम ला इमेल द्वारे संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल ट्विट खोटा आहे. हा अकाउंट अण्णा हजारे ह्यांचा नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर का तपास केला. त्यात आम्हाला कळले कि फेसबुक यूजर रियाजत खान एका राजनेतिक दलासोबत जुडलेले आहे. त्यांच्या अकाउंट ला 2721 लोकं फॉलो करतात आणि त्यांचे 4.9 हजार फ्रेंड आहे आणि ते राजस्थान च्या चुरु चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात अण्णा हजारे ह्यांच्या नावाने व्हायरल होत असलेला ट्विट खोटा असल्याचे समजले. त्यांनी हा ट्विट केलेला नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट