Fact Check: बिहार मध्ये मतदानाच्या नावावर आसाम चे ६ वर्ष जुने छायाचित्र होत आहे व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समोर आले. हे छायाचित्र आसाम चे आहे, तसेच ६ वर्ष जुने आज. सोशल मीडिया वर काही लोकं त्याला बिहार चे सांगून व्हायरल करत आहेत.
- By: Ashish Maharishi
- Published: Nov 5, 2020 at 11:09 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक बारीक व्यक्ती वोट करतानाचे छायाचित्र व्हायरल होत असताना दिसत आहे. दावा केला जात आहे कि हे छायाचित्र बिहार निवडणुकांचे आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले कि हे छायाचित्र २०१४ चे आहे, ज्याचा संबंध आता बिहार निवडणुकांसोबत जोडून त्याला व्हायरल केले जात आहे. खरे छायाचित्र हे आसाम चे आहे. त्याचा बिहार निवडणुकांसोबत काहीच संबंध नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक वर ऋषभ त्रिवेदी यांनी, २९ ऑक्टोबर रोजी ‘India Against Hate & Violence’ नावाच्या फेसबुक ग्रुप वर एक छायाचित्र अपलोड केले आणि दावा केला, “बिहार में नीतीश राज के 15 साल के विकास की जीती जागती तस्वीर वोट डालते हुए.😢 ये इसी उम्मीद से आए होंगे पोलिंग बूथ काश कुछ तस्वीर बदले जो ये भुगत रहे इनके बच्चे न भुगते“
अर्थात: बिहार मध्ये नितीश राज च्या १५ वर्षांच्या विकास चे हे छायाचित्र वोट देताना. हे या आशेत बूथ वर पोहोचले कि जे यांनी सहन केला ते यांच्या मुलांनी नाही करावे.
फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल होत असलेले छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज टूल मध्ये अपलोड करून सर्च केले. सर्च च्या वेळी हे छायाचित्र आम्हाला,
janjwar.com या वेबसाईट वर एका लेखा सोबत मिळाले. या लेखात फक्त इतके सांगण्यात आले होते कि हे एक आदिवासी आहेत. हा लेख १९, नोव्हेंबर २०१९ रोजी प्रकाशित झाला याचा अर्थ हे छायाचित्र जुने आहे आणि याचा बिहार निवडणुकांसोबत काही संबंध नाही.
तपासादरम्यान आम्हाला खरे छायाचित्र ‘द हिंदू’ च्या संकेतस्थळावर मिळाले. १३ एप्रिल २०१४ रोजी अपलोड केलेल्या या बातमीत सांगितले गेले होते कि ह्या छायाचित्रात, आसाम च्या कारबी आंगलोंग जिल्ह्याच्या तिवा जनजाति चा एक व्यक्ती आहे. हि व्यक्ती मतदान करण्यास आली होती. हे छायाचित्र, रितुराज कंवर नावाच्या व्यक्तीने घेतले होते. हि संपूर्ण बातमी इथे वाचा.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने, रितुराज कंवर यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि ते कधीच बिहारला गेले नाही आणि हे त्यांनी काढलेले छायाचित्र आहे जे आता व्हायरल होत आहे.
शेवटी आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चे अकाउंट तपासले. ऋषभ त्रिवेदी यांच्या प्रोफाइल वर कुठल्याच प्रकारची माहिती नव्हती.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समोर आले. हे छायाचित्र आसाम चे आहे, तसेच ६ वर्ष जुने आज. सोशल मीडिया वर काही लोकं त्याला बिहार चे सांगून व्हायरल करत आहेत.
- Claim Review : बिहार मध्ये नितीश राज च्या १५ वर्षांच्या विकास चे हे छायाचित्र वोट देताना. हे या आशेत बूथ वर पोहोचले कि जे यांनी सहन केला ते यांच्या मुलांनी नाही करावे.
- Claimed By : ऋषभ त्रिवेदी
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.