विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि नीता अंबानी यांचे जे छायाचित्र आता व्हायरल होत आहे ते २०१७ चे खेल प्रोत्साहन पुरस्कार घेतानाचे आहे. व्हायरल करण्यात येणार दावा खोटा आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर नीता अंबानी यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सोबत अवॉर्ड घेतानाचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. छायाचित्रासोबत दावा करण्यात येत आहे कि नीता अंबानी यांना खेल रत्न अवॉर्ड देण्यात आला. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. रामनाथ कोविंद यांचे नीता अंबानी सोबत चे छायाचित्र २०१७ साल चे आहे, जेव्हा रिलायन्स फौंडेशन ला खेल प्रोत्साहन अवॉर्ड मिळाले होते, ज्याला नीता अंबानी यांनी रिसिव्ह केले होते. आता हे छायाचित्र खोट्या दाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Mohan Lal Yadav यांनी नीता अंबानी यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबतचे एक छायाचित्र अपलोड केले आणि लिहले, “नीता अंबानी कौन सा खेल खेलती है। नीता अंबानी को खेल रत्न पुरस्कार”
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
पोस्ट च्या तपासाच्या सुरुवातीला आम्ही व्हायरल होत असलेले छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे शोधले. सर्च च्या वेळी आम्हाला २९ ऑगस्ट २०१७ रोजी उपलोड केलेली एक बातमी मिळाली, ज्यात आम्हाला व्हायरल छायाचित्र दिसले. बातमीत दिल्याप्रमाणे, “रिलायन्स फौंडेशन ला मंगळवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय खेल पुरस्कार समारोहाच्या वेळी खेळाच्या क्षेत्रात बढावा देण्याच्या योगदानासाठी खेल प्रोत्साहन पुरस्काराने सम्मानित केले गेले. फौंडेशन च्या चेयरपर्सन नीता अंबानी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पुरस्कार प्रदान केला. हि संपूर्ण बातमी इथे वाचा.
विश्वास न्यूज सोबत बोलताना रिलायन्स फौंडेशन च्या पीआरओ ने सांगितले कि व्हायरल करण्यात येणारी पोस्ट खोटी आहे.
रिलायन्स फौंडेशन कडून २९ ऑगस्ट २०१७ रोजी केलेला एक ट्विट आम्हाला मिळाला, ज्यात आम्हाला व्हायरल छायाचित्र दिसले. या ट्विट मध्ये लिहले होते, रिलायन्स फौंडेशन ला प्रोत्साहन पुरस्कार मिळाला, तो स्वीकारताना नीता अंबानी.
अधिक माहिती साठी विश्वास न्यूज ने आमचे दैनिक जागरण चे सहयोगी स्पोर्ट्स एडिटर अभिषेक त्रिपाठी यांना संपर्क केला, त्यांनी आम्हाला व्हायरल होत असलेल्या पोस्ट बद्दल माहिती दिली. त्यांनी आम्हाला सांगितले कि राष्ट्रपती भवनात जेव्हा नीता अंबानी यांना खेल प्रोत्साहन पुरस्कार पुरस्कार मिळाला तेव्हा ते तिथे उपस्थित होते. हा पुरस्कार त्यांना खेळाच्या जगात प्रोत्साहन देण्यास मिळाला आहे. त्यांनी सांगितले कि हा प्रोत्साहन पर पुरस्कार त्यांना मिळतो जे खेळाच्या जगात प्रोत्साहन देतात, आणि त्यांनी हे देखील सांगितले कि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार त्या खेळाडूंना दिला जातो जे देश विदेशात नाव कमावतात.
खेल मंत्रालय च्या अधिकृत वेबसाईट आणि ट्विटर हॅन्डल वर आम्हाला २०२१ साल च्या खेल रत्न पुरस्कार जिंकणाऱ्या विषयी काही उपडेट नाही मिळाला.
निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि नीता अंबानी यांचे जे छायाचित्र आता व्हायरल होत आहे ते २०१७ चे खेल प्रोत्साहन पुरस्कार घेतानाचे आहे. व्हायरल करण्यात येणार दावा खोटा आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923