Fact-check: AIIMS च्या डॉ. उमा कुमार यांनी इम्म्युनिटीबाबत ही मुलाखत दिली नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासणी दरम्यान डॉ.उमा कुमार यांच्या नावाने व्हायरल झालेली मुलाखात खोटी असल्याचे आढळले. त्यांनी असे कोणतेही वक्तव्य केले नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज)
गेल्या काही दिवसांपासून फेसबुक तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर एम्स रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टर उमा कुमार यांची मुलाखत व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की या डॉक्टरांनी कोरोना विषाणूसंदर्भात एक मुलाखत दिली आणि त्यात त्यांनी रोगप्रतिकारशक्ती बाबत विविध मुद्दे मांडले. पण विश्वास न्यूज ने त्याचा तपास केले असता, हि व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे आढळले. डॉ. उमा यांनी अशी कोणतीही मुलाखत दिली नाही.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक पेज ‘उज्ज्वल इंस्‍टीयूट’ ने 1 जून रोजी एक बनावट मुलाखत अपलोड केली आहे, ज्यात असे नमूद केले आहे कि, एम्सच्या ज्येष्ठ डॉक्टर उमा कुमार यांनी मुलाखतीत असा दावा केला आहे की कोरोनाव्हायरस चे औषध आपल्या शरीरातच आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर देखील ही बनावट मुलाखत व्हायरल होत आहे.

तपास:

विश्वास न्यूजने सर्वप्रथम डॉ उमा कुमार, ज्यांचा उल्लेख व्हायरल मुलाखतीत झाला आहे यांच्याविषयी माहिती गोळा करायला सुरुवात केली. यासाठी आम्ही गुगल सर्चमध्ये डॉक्टर उमा कुमार टाइप करून त्यांचा शोध घेतला. त्यात आम्हाला असे कळले की डॉ. उमा कुमार एम्सच्या रूमेटोलॉजी विभागाच्या एचओडी आहेत.


यानंतर, आम्हाला आता हे जाणून घ्यायचे होते की उमा यांनी कोरोनाव्हायरस आणि रोगप्रतिकारशक्तीसंबंधी खरंच कुठली मुलाखत दिली आहे का? डॉ उमा यांनी ही मुलाखत दिली हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला गूगल सर्च मध्ये कुठलीही बातमी सापडली नाही.

तपासादरम्यान आम्ही डॉक्टर उमा कुमार यांचे सोशल मीडिया अकाउंट देखील तपासले. आम्हाला त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट सापडली. 31 मे रोजी डॉ. उमा कुमार यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर असे नमूद केले कि काही लोक त्यांची छायाचित्रे आणि व्यावसायिक माहितीचा वापर करून काही सामग्री सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.

आपण त्यांची संपूर्ण पोस्ट खाली पाहू शकता.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही डॉ उमा कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले, “मी व्हायरल पोस्ट मध्ये नमूद केलेल्या संदर्भात अशी कोणतीही मुलाखत दिली नाही.”
शेवटी, आम्ही बनावट पोस्टसाठी उज्ज्वल इन्स्टिट्यूटचे फेसबुक पेज तपासले. आम्हाला सोशल स्‍कैनिंगद्वारे असे समजले की केवळ 140 लोक या फेसबुक पेज ला फोल्लो करतात. हा पेज 9 फेब्रुवारी 2016 रोजी तयार करण्यात आला होता.

निष्कर्ष: निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासणी दरम्यान डॉ.उमा कुमार यांच्या नावाने व्हायरल झालेली मुलाखात खोटी असल्याचे आढळले. त्यांनी असे कोणतेही वक्तव्य केले नाही.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट