Fact Check: AIIMS ने कोरोनाव्हायरस लक्षणांवर व्हायरल स्टेटमेंट नाही जारी केले
एम्स च्या नावावर सांगण्यात आलेले कोरोनाव्हायरस आणि अन्य व्हायरस च्या लक्षणांची यादीचे एम्स सोबत काहीच संबंध नाही. व्हायरल पोस्ट खोटी आहे.
- By: Urvashi Kapoor
- Published: Dec 3, 2020 at 01:39 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जात आहे कि AIIMS दवाखान्याने कोरोनाव्हायरस आणि अन्य रेस्पिरेटरी आजार यांच्या लक्षणांवर एक स्टेटमेंट जारी केले आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट चा AIIMS सोबत काही संबंध नसल्याचे समजले. हि पोस्ट खोटी आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Rajkumar Bhati ने हि पोस्ट इंग्रजीत शेअर केली ज्याचा मराठी अनुवाद खालील प्रमाणे आहे:
फरक नीट लक्षात घ्या: १ सुखा खोकला+शिंका= एअर पोल्युशन २ खोकला+म्युकस+वाहते नाक=कॉमन कोल्ड ३ खोकला+म्युकस+शिंका+नाक वाहणे+अंग दुखी+विकनेस+हलका ताप= फ्लू ४ सुखा खोकला+शिंका+अंग दुखी+विकनेस+जास्त ताप+श्वास घेण्यात त्रास=कोरोनाव्हायरस. पॅथॉलॉजि डिपार्टमें , एम्स, दिल्ली. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा.
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाचा सुरुवात, एम्स ची वेबसाईट आणि सोशल मीडिया हॅन्डल्स वर हा स्टेटमेंट शोधण्यापासून सुरुवात केली, पण आम्हाला असे कुठलेच अधिकृत स्टेटमेंट तिथे मिळाले नाही. कोविड १९ साठी एम्स ने AIIMS COVID PORTAL च्या नावाने एक वेगळे पोर्टल बनवले आहे. आम्हाला त्या पोर्टल वर या स्टेटमेंट बाबत कुठलीच माहिती तिथे मिळाली नाही.
विश्वास न्यूज ने एम्स च्या माइक्रोबायोलॉजी डिपार्ट्मेंट चे डॉ बिअर मिर्धा यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि व्हायरल पोस्ट खोटी आहे. हा खूप जुना मेसेज आहे आणि त्याचा एम्स सोबत काहीच संबंध नाही.
कोविड १९ मुळे वेग वेगळे लोकं, वेग वेगळ्या प्रकारे प्रभावित होत आहे. सेन्टर फॉर डिजीज कंट्रोल्स एंड प्रिवेंशन (CDC) प्रमाणे, कोविड १९ च्या रुग्णात बऱ्याच प्रकार चे लक्षण दिसतात. यात साध्य लक्षणांपासून ते बरेच घातक लक्षणांचा समावेश आहे.
यात, ताप, खोकला, श्वास घेण्यात त्रास, थकवा, अंग दुखी, डोके दुखी, खाण्याचा स्वाद आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे, गळ्यात दुखणे, नाक बंद होणे किंवा नाक वाहने, उलटी येणे, पोट खराब होणे, या सारखे संभाव्य लक्षण आहे. जसे जसे कोविड १९ बद्दल अजून माहिती मिळेल, हि लिस्ट सीडीसी उपडते करत राहील.
फेसबुक वर हि पोस्ट Rajkumar Bhati नावाच्या यूजर ने शेअर केली आहे. यूजर चा प्रोफाइल स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि यूजर ग्रेटर नोएडा चा रहिवासी आहे.
Disclaimer: विश्वास न्यूजच्या कोरोनाव्हायरस (COVID-19) संबंधित फॅक्ट-चेक स्टोरी वाचताना किंवा शेअर करताना, आम्ही वापरलेला डेटा किंवा संशोधन डेटा बदलू शकतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाव्हायरस संबंधित डेटा (संक्रमित असलेले, बरे झालेले रुग्ण आणि मृत्युमुखी पडलेले रुग्ण यांची संख्या) सतत बदलत राहते. तसेच लस (व्हॅक्सिन) शोधण्याच्या दिशेने संशोधनाचे ठोस परिणाम यायचे आहेत आणि त्यामुळे, उपचार आणि प्रतिबंधासाठी उपलब्ध असलेला डेटा देखील बदलू शकतो. म्हणून जेव्हा तुम्ही फॅक्ट-चेक वाचाल तेव्हा त्याची तारीख पडताळणे आवश्यक आहे.
निष्कर्ष: एम्स च्या नावावर सांगण्यात आलेले कोरोनाव्हायरस आणि अन्य व्हायरस च्या लक्षणांची यादीचे एम्स सोबत काहीच संबंध नाही. व्हायरल पोस्ट खोटी आहे.
- Claim Review : AIIMS ने कोरोनाव्हायरस लक्षणांवर स्टेटमेंट जारी केले
- Claimed By : Rajkumar Bhati
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.