Fact Check: बिल गेट्स चा ट्विटर अकाउंट सस्पेंड झाला नाही, खोटा स्क्रिनशॉट होत आहे व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा निघाला. व्हायरल स्क्रीनशॉट एडिटेड आहे. बिल गेट्स चे ट्विटर अकाउंट सस्पेंड झाले नाही.
- By: Pragya Shukla
- Published: May 5, 2022 at 02:06 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक ट्विटर अकाउंट चा स्क्रीनशॉट शेअर करत आहे आणि दावा करत आहे कि ट्विटर विकत घेतल्या नंतर, एलोन मास्क ने पहिले काम केले ते म्हणजे बिल गेट्स चे अकॉउंट सस्पेंड करणे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा ठरला. व्हायरल स्क्रीनशॉट एडिटेड आहे. बिल गेट्स चा ट्विटर अकाउंट सस्पेंड केलेला नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Futminna campus gist ने व्हायरल स्क्रीनशॉट शेअर करून दावा केला: “Bill gates Twitter accounts has been suspended.”
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे क्लीक करून बघा. सोशल मीडिया वर अन्य यूजर्स अश्याच मिळत्या जुळत्या दाव्यासह शेअर करत आहे.
तपास:
व्हायरल दाव्यामागचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही आधी गूगल वर किवर्ड सर्च द्वारे शोध घेण्यास सुरुवात केली, पण आम्हाला कुठलीच अधिकृत मीडिया रिपोर्ट मिळाली नाही. जर का असे काही झाले असते तर, कुठेतरी मीडिया रिपोर्ट नक्कीच असती.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही बिल गेट्स चे ट्विटर अकाउंट शोधण्यास सुरु केले. ह्या वेळी आम्हाला कळले कि बिल गेट्स चे अकाउंट सस्पेंड झालेले नाही ते ऍक्टिव्ह आहे. त्या नंतर आम्ही https://web.archive.org/ च्या मदतीने बिल गेट्स च्या ट्विट चे आर्काइव्ह व्हर्जन चेक केले पण इथे देखील आम्हाला व्हायरल स्क्रीनशॉट संबंधी काही सापडले नाही.
आता पर्यंत च्या तपासात हे सिद्ध झाला होतं कि बिल गेट्स चे ट्विटर अकॉउंट सस्पेंड झाले नाही. व्हायरल स्क्रीनशॉट मध्ये काही तथ्य नाही, ह्याला एडिट करून बनवण्यात आले आहे. ट्विटर च्या नियमांप्रमाणे, जर कुठला अकाउंट सस्पेंड होतो तर त्याची प्रोफाइल फोटो, बायो आणि फॉलोवर्स देखील अकाउंट मधून निघून जातात. अकाउंट वर फक्त इतकेच लिहून येते कि ट्विटर च्या नियमांचे उल्लंघन केल्याने, हा असा अकाउंट सस्पेंड करण्यात आला आहे. जेव्हाकी व्हायरल स्क्रीनशॉट माजे असे काही दिसत नाही. व्हायरल स्क्रीनशॉट चा पॅटर्न, ट्विटर पेक्षा बराच वेगळा आहे. उदाहरणासाठी आम्ही डोनाल्ड ट्रम्प चा सस्पेंडेड अकाउंट चा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, तो खाली बघा.
अधिक माहिती साठी आम्ही बिल गेट्स च्या पीआर टीम ला मेल द्वारे संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल दावा खोटा आहे. ट्विटर द्वारे बिल गेट्स चा अकाउंट सस्पेंड करण्यात आला नाही.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही हा दावा फेसबुक वर शेअर करणाऱ्या यूजर Futminna campus gist च्या अकाउंट चा तपास केला. स्कॅनिंग मध्ये कळले कि हा पेज फेसबुक वर 24 मे 2020 पासून सक्रिय आहे आणि ह्याला सहा हजार पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा निघाला. व्हायरल स्क्रीनशॉट एडिटेड आहे. बिल गेट्स चे ट्विटर अकाउंट सस्पेंड झाले नाही.
- Claim Review : Bill gates Twitter accounts has been suspended.
- Claimed By : Futminna campus gist
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.