Fact Check: शामली मध्ये मुलांची पिटाई केल्याचा व्हिडिओ हिंदू-मुसलमान च्या खोट्या अँगल सोबत होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि व्हायरल व्हिडिओ मध्ये मार खात असलेले आणि मारणारे लोकं हे एकाच जातीचे आहे. ह्या व्हिडिओ मध्ये हिंदू-मुसलमान अँगल नाही आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ह्या व्हिडिओ मध्ये काही लोकं एका मुलीला क्रूरतेने मारताना दिसतात. काही लोकं एका युवकाचे हाथ पाय एका पलंगाला बांधताना दिसतात. तसेच एक महिला पण हातात काठी घेऊन युवकाला मारताना दिसते. आता हा व्हिडिओ हंदू मुसलमान चा अँगल देऊन लोकं शेअर करत आहेत. यूजर दावा करत आहेत कि दोन मुसलमान मुली हिंदू मुलांसोबत दिसल्या आणि त्यानंतर त्यांना ह्या प्रकारे मारण्यात आले. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि व्हायरल व्हिडिओ सोबत करण्यात येणारा दावा खोटा आहे. व्हिडिओ मध्ये मार खात असलेले मुलं आणि मारणारे लोकं एका बिरादरी चे आहे, ह्या व्हिडिओ मध्ये कॅम्युनल अँगल नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘B Tulasi’ ने ‘अंतरराष्ट्रीय हिन्दू संगठन ग्रुप में अपने सभी हिंदू भाइयों को जोड़ें’ ह्या नावाच्या पेज वर व्हिडिओ शेअर केला आणि लिहले:  ‘2 मुस्लिम लड़की हिंदू लड़कों के साथ देखी जाने के बाद क्या हाल करे गांव वाले उसके बाप ने क्या करा सब लोग देखो।’

हा पोस्ट आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
आपली तपास सुरु करत आम्ही हा व्हिडिओ इन्व्हिड टूल मध्ये अपलोड केला आणि काही किफ्रेम्स काढून घेतले, त्यावर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर करून शोधण्यास सुरु केले. सर्च मध्ये आम्हाला ह्या व्हिडिओ संबंधी न्यूज दैनिक जागरण च्या वेबसाईट वर मिळाली. आम्हाला बातमीत व्हायरल किफ्रेम मिळाली. बातमीत दिलेल्या माहिती प्रमाणे: इंटरनेट वर कैराना क्षेत्र मधले तितरवाड़ा गावचे काही लोकं एक महिला आणि दोन युवकांना लाठी नि मारत होते. ह्याचे दोन व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. पोलिसांनी या बाबतीत गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली प्रभारी निरीक्षक प्रेमवीर सिंह राणा यांचे म्हणणे आहे कि पोलिसांच्या तपासात कळले कि हा व्हिडिओ तितरवाड़ा गावचा आहे. हि घटना प्रेम प्रकरण संबंधी असावी असे देखील म्हंटल्या गेले आहे. पिटणारे युवक मुजफ्फरनगर जनपद चे रहिवासी आहे. पोलिसांनी या बाबत गुन्हा दाखल केला आणि आरोपींचा तपास सुरु केला. पुलिस अधीक्षक सुकीर्ति माधव म्हणाले कि पिटाई करणारे हे महिलेचे माहेरचे आहे.
हि पूर्ण बातमी इथे बघा.

आम्ही या संबंधी अजून तपास सुरु केला असता आम्हाला शामली पुलिस अधीक्षकाचा व्हिडिओ देखील मिळाला. व्हिडिओ मध्ये त्यांना हे म्हणताना ऐकले जाऊ शकते: ”सोशल मीडिया पर एक वीडियो वायरल हो रहा है वो हमारे संज्ञान में आया है। उस वीडियो की जांच करने के पश्चात् ये सुचना प्राप्त हुई की शामली के एक गांव में एक व्यक्ति जिसका नाम एहसान अली की शादी हुई थी और जिनसे उनकी शादी हुई थी वही वीडियो में दिख रही हैं। और उनके प्रेम सम्बन्ध उनकी शादी से पहले थे उसी के क्रम में एक व्यक्ति उनके ससुराल आया था और वह अपने मित्र के साथ आया था। ये बात जब उनके ससुराल वालो को पता चली तो उनके द्वारा उन व्यक्तियों को रोक लिया गया और लड़की के मायके को बताया गया। मायके और ससुराल के लोगों ने मिल कर इन लड़कों की पिटाई की। इस सम्बन्ध में पुलिस को कोई एप्लीकेशन नहीं दिया गया था। जो वीडियो वायरल हुआ है वह आज पुलिस के संज्ञान में आया है और इसकी तत्काल जांच करा कर पुलिस के द्वारा की मुकदमा दर्ज कराया गया है।’

व्हिडिओ चा हा ट्विट इथे बघा.

https://twitter.com/PoliceShamli/status/1422987622276689920

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने शामली च्या कैराना पोलीस स्टेशन चे इन्चार्ज परमवीर सिंह यांना संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला सांगितले, ‘या घटनेत कुठलाच हिंदू-मुसलमान अँगल नाही आहे, ज्या मुलांची पिटाई झाली आणि ज्यांनी केली ते सगळे मुसलमान आहे. त्यांनी घटने बद्दल सांगितले कि मुलीचे लग्न झाले होते पण तरीही तिचा प्रेमी तिला भेटायला यायचा, त्यानंतर तिच्या माहेरच्यांनी आणि सासरच्यांनी त्यांची पिटाई केली. ह्या बाबतीत गुन्हा दाखल करून चार लोकांना ताब्यात घेतले आहे.

खोटा दावा फेसबुक वर शेअर करणारी यूजर B Tulasi चे सोशल स्कँनिंग केल्यावर कळले कि यूजर ने आपले फेसबुक प्रोफाइल एप्रिल 2016 मध्ये बनवले. या आधी देखील या प्रोफाइल वर खोट्या बातम्या शेअर केल्या गेल्या आहेत.


निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि व्हायरल व्हिडिओ मध्ये मार खात असलेले आणि मारणारे लोकं हे एकाच जातीचे आहे. ह्या व्हिडिओ मध्ये हिंदू-मुसलमान अँगल नाही आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट