विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. प्रयागराज मध्ये सध्या अशी कुठलीच घटना घडली नाही आहे. हि पोस्ट आधी देखील बऱ्याच वेळा व्हायरल झाली आहे.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होताना विश्वास न्यूज च्या दृष्टीस पडली. ह्यात एका युवतीचे चित्र वापरून दावा करण्यात येत आहे कि प्रयागराज मध्ये शीषा साहू ह्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दोन बलात्कार्यांना ठार मारले. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला असता ती खोटी असल्याचे सिद्ध झाले. प्रयागराज च्या पोलिसांनी देखील हि पोस्ट खोटी असल्याचे सांगितले आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर शिव चरण मौर्या ने 23 ऑगस्ट रोजी एक पोस्ट केली आणि दावा केला, “इलाहाबाद की 16 वर्षीय युवती शीषा साहू ने अपनी इज्जत बचाने के लिए दो बलात्कारियों को मौत के घाट उतार दिया!”
ह्या पोस्ट सोबत एक मुलगी हातात तलवार घेऊन उभी असलेली दिसते. ह्याला खरे मानून बाकी यूजर्स देखील हि पोस्ट शेअर करत आहेत. फेसबुक पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास सुरु केला आणि पोस्ट मध्ये वापरण्यात आलेल्या चित्राचा सोर्स शोधण्यास सुरुवात केली. गूगल रिव्हर्स इमेज सर्च च्या सुरुवातीलाच आम्हाला ओरिजिनल इमेज साध्वी सरस्वती नावाच्या फेसबुक पेज वर मिळाली. ह्यावर बरेच चित्र होते ज्यात साध्वी ला तलवारबाजी करताना बघितले जाऊ शकते.
त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट प्रमाणे, ह्या मध्य प्रदेश च्या छिंदवाडा च्या रहिवासी आहेत आणि त्यांच्या पेज ला जवळपास सात हजार फॉलोवर्स आहेत.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास गूगल वर कीवर्ड सर्च च्या द्वारे केला. आम्हाला प्रयागराज पोलीस चा एक ट्विट मिळाला. ह्याला 19 ऑगस्ट 2020 रोजी केले गेले होते आणि व्हायरल दाव्याचे खंडन करण्यात आले होते. पोलिसांनी स्पष्ट लिहले आहे कि सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेले चित्र पूर्णपणे असत्य आणि दिशाभूल करणारे आहे.
विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात दैनिक जागरण, प्रयागराज चे क्राइम रिपोर्टर राजेन्द्र यादव ह्यांना संपर्क केला. त्यांनी व्हायरल पोस्ट एक अफवा असल्याचे सांगितले, जी पहिले पण बऱ्याच वेळा व्हायरल झाली आहे ह्यात काही तथ्य नाही. प्रयागराज एसपी आशुतोष मिश्र ने देखील व्हायरल पोस्ट चं खंडन केले आहे.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही मागच्या वर्षी म्हणजेच ऑगस्ट 2020 मध्ये प्रयागराज जिल्ह्याच्या करछना थाना क्षेत्राच्या टकटैया गावात रस्त्यावर जनावर बांधायच्या व्हिव्हिडंट एका कुटुंबाने दोन सक्ख्याभावांची हत्या केली, अशी बातमी मिळाली, पोलिसांनी अरोप्यांना ताब्यात घेतले आहे. बातमीत कुठेच विनयभंगाचा अँगल नव्हता. जागरण डॉट कॉम वर 8 ऑगस्ट 2020 रोजीची बातमी तुम्ही इथे क्लीक करून वाचू शकता.
तपासाच्या शेवटी विश्वास न्यूज ने खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. आम्हाला कळले कि फेसबुक यूजर शिव चरण मौर्या युपी च्या वाराणसी चे रहिवासी आहे. त्यांचे 400 पेक्षा जास्ती फ्रेंड्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. प्रयागराज मध्ये सध्या अशी कुठलीच घटना घडली नाही आहे. हि पोस्ट आधी देखील बऱ्याच वेळा व्हायरल झाली आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923