Fact Check: २०१८ च्या कॅण्डल मार्च चे छायाचित्र आता होत आहे खोट्या दाव्यासह व्हायरल
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट खोटी ठरली. गुलनाज ला न्याय मिळ्वण्याच्यानावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र २ वर्षं जुने आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Nov 19, 2020 at 05:59 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): बिहार च्या गुलनाज हत्याकांड नंतर सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे. या छायाचित्रात तेजस्वी यादव कॅण्डल मार्च काढताना दिसतात. या छायाचित्रावरून यूजर्स दावा करत आहे कि, गुलनाज ला न्याय मिळवून देण्याकरता, तेजस्वी यादव यांनी रस्त्यावर उतरून कॅण्डल मार्च काढले.
विश्वास न्यूज ने व्हायरल दाव्याचा तपास केला, तपासादरम्यान हा दावा खोटा असल्याचे समजले. तेजस्वी यादव चे जुने छायाचित्र आता गुलनाज ला न्याय मिळवण्यासाठी काढण्यात आलेल्या कॅण्डल मार्च च्या नावाने व्हायरल होत आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर युवाराजद बड़हरिया ने १६ नोव्हेंबर एक फोटो अपलोड करून लिहले, “बिहार की बेटी गुलनाज़ के इंसाफ के लिए Tejashwi Yadav कैंडल मार्च के साथ सड़क पर उतर गए हैं। देखते हैं अपराधी कब तक फांसी पर लटकते हैं।“
अर्थात: बिहार ची मुलगी गुलनाज ला न्याय मिळावा यासाठी तेजस्वी यादव, कॅण्डल मार्च घेऊन रस्त्यावर उतरले. आता बघूया अपराध्यांना कधी फासी वर लटकावतात.
फेसबुक सोबतच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स देखील हे छायाचित्र याच दाव्यासह व्हायरल होत आहे.
या फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्राला निरखून बघितले, त्यात एका पण व्यक्तीने मास्क लावला नव्हता. कोरोनाव्हायरस महामारी दरम्यान हे शक्य नाही. या नंतर आम्ही हे छायाचित्र, गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड करून इंटरनेट वर शोधले. हे छायाचित्र आम्हाला बऱ्याच वेग-वेगळ्या ठिकाणी सापडले.
ABP Live च्या वेबसाईट वर आम्हाला या संबंधित एक न्यूज मिळाली. यात सांगितले गेले होते कि पटना मध्ये एक मोठे कारोबरी गुंजन खेमका यांच्या हत्येच्या विरोधात व्यावसायिकांनी कॅण्डल मार्च काढले, त्यात तेजस्वी यादव हे देखील सहभागी झाले. पटना च्या जेपी गोलंबर ते डाकबंगला चौकापर्यंत शांतीपूर्ण कॅण्डल मार्च काढला गेला. या कॅण्डल मार्च मध्ये मोठ्या संख्येत व्यावसायिक सहभागी झालेत. हि बातमी २४ डिसेंबर २०१८ रोजी प्रकाशित झाली होती. हि संपूर्ण बातमी इथे वाचा.
सर्च च्या वेळी आम्हाला तेजस्वी यादव च्या ट्विटर हॅन्डल वर काही जुने छायाचित्र देखील मिळाले. डिसेंबर २०१८ रोजी केलेल्या या ट्विट मध्ये लिहले गेले होते, “‘व्यवसायी गुंजन खेमका की हत्या और बिहार में बढ़ते अपराध के विरोध में आज शाम पटना में विभिन्न सामाजिक, व्यावसायिक और औधोगिक संगठनों द्वारा आयोजित कैंडल मार्च में भाग लेकर शांतिपूर्ण विरोध प्रदर्शन किया। कैंडल मार्च पटना के जेपी गोलंबर से डाकबंगला चौराहे तक निकाला गया।”
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही जागरण डॉट कॉम चे प्रभारी अमित आलोक यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी व्हायरल छायाचित्रावरून सांगितले कि हे २०१८ चे आहे, जेव्हा पटना चे मोठे व्यावसायिक गुंजन खेमका यांच्या हत्येच्या विरोधात व्यावसायिकांनी कॅण्डल मार्च काढले होते. यात तेजस्वी यादव देखील सहभागी झाले होते. हे व्हायरल छायाचित्र तेव्हाचे आहे.
शेवटी आम्ही व्हायरल पोस्ट शेअर करणारे फेसबुक यूजर, युवाराजद बड़हरिया यांचे अकाउंट तपासले, त्यात आम्हाला कळले कि हा पेज सिवान वरून चालवला जातो.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट खोटी ठरली. गुलनाज ला न्याय मिळ्वण्याच्यानावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र २ वर्षं जुने आहे.
निष्कर्ष: निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, व्हायरल पोस्ट खोटी ठरली. गुलनाज ला न्याय मिळ्वण्याच्यानावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र २ वर्षं जुने आहे.
- Claim Review : बिहार ची मुलगी गुलनाज ला न्याय मिळावा यासाठी तेजस्वी यादव, कॅण्डल मार्च घेऊन रस्त्यावर उतरले. आता बघूया अपराध्यांना कधी फासी वर लटकावतात.
- Claimed By : युवाराजद बड़हरिया
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.