Fact Check: 2015 चा राज ठाकरेंच्या पत्नीला कुत्रा चावल्याची घटना जुनी आहे, आताची नाही
विश्वास न्यूज च्या तपासात हे कळले कि 2015 च्या घटनेचा व्हिडिओ आता शेअर करण्यात येत आहे. हि पोस्ट दिशाभूल करणारी आहे.
- By: Ankita Deshkar
- Published: May 13, 2022 at 02:05 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूजला एक पोस्ट व्हायरल होत असलेली विश्वास न्यूज च्या लक्षात आले, जिथे एक व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नीला नुकतेच त्यांच्याच पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याचे सांगणाऱ्या आजतक वृत्ताच्या वृत्ताची क्लिपिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. वृत्ता प्रमाणे शर्मिला ह्यांना 65 टाके देखील लागले. आणि हि पोस्ट नुकतेच त्यांच्या
लाऊडस्पिकरच्या वक्तव्य संदर्भात व्हायरल करण्यात येत आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समजले. हि घटना 2015 ची आहे,. आताची नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Mohammad Ali Jauher Siddique ने हि पोस्ट शेअर केली आणि हिंदी मध्ये लिहले: बड़ी बुरी खबर, राज ठाकरे की पत्नी शर्मिला को खुद के पालतू कुत्ते ने बहुत हि बुरी तरीके से चेहरे पर काटा। 65 टांके लगाने पड़े, सर्जरी भी करानी पड़ सकती है। इस दुख की घरी मे हम सब उनके साथ है और अल्लाह से दुवा करते है की उनके दर्द को कम करे और जल्द से जल्द सेहतमंद बनाये। 🤲अमीन, सुम्मा अमीन🤲 नोट- इस घटना का राज ठाकरे के आजन वाले ब्यान और मस्जिद के सामने हनुमान चालीसा पढ़ने से कोई सम्बंध नहीं है। और ना हि किसी का बद दुवा लगा है। ये सिर्फ एक दुर्घटना है। कुत्ता तो कुत्ता हि होता है जब आदमी किसी का सगा नहीं हो सकता तो कुत्ता सगा कैसे हो सकता है ?? कोई भी भाई इस खबर को ले कर किसी भी तरह का फालतू पोस्ट ना करे। शर्मीला ठाकरे की जगह अगर राज ठाकरे भी होते तो भी इस दुख की घरी मे हमलोग उनके गम मे शरीक होते। सभी भाइयो से दुवा करने की गुजारिश कर रहा हु।
अनुवाद: मोठी वाईट बातमी, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांच्या चेहऱ्याला त्यांच्याच पाळीव कुत्र्याने चावा घेतला. 65 टाके लागले, शस्त्रक्रियाही करावी लागेल. या दु:खाच्या प्रसंगी आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांचे दुःख कमी व्हावे आणि त्यांना लवकरात लवकर निरोगी व्हावे यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करतो. Amin, Summa Amin🤲 नोट- या घटनेचा राज ठाकरेंच्या आजच्या विधानाशी आणि मशिदीसमोर हनुमान चालीसा पठणाचा काहीही संबंध नाही. आणि कोणाचाही वाईट संबंध नाही. हा फक्त एक अपघात आहे. कुत्रा हा कुत्रा असतो जेव्हा माणूस कोणाच्याही सोबत असू शकत नाही, तेव्हा कुत्रा कोणाच्या जवळ कसा असू शकतो? या बातमीबाबत कोणत्याही भावाने कोणत्याही प्रकारची अनावश्यक पोस्ट करू नये. शर्मिला ठाकरेंच्या जागी राज ठाकरे असते तरी आपण या दु:खाच्या घरात त्यांचे दु:ख शेअर केले असते. सर्व बांधवांशी संपर्क साधावा ही विनंती.
हि पोस्ट आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
बाकी यूजर्स देखील हा व्हिडिओ संदर्भासह व्हायरल करत आहे.
तपास:
विश्वास न्यूज ने सध्या किवर्ड सर्च सोबत ह्या दाव्याचा तपास सुरु केला, आम्हाला ह्या घटनेच्या बऱ्याच मीडिया रिपोर्ट्स मिळाल्या.
इंडिया टुडे च्या एका रिपोर्ट चे शीर्षक होते: Raj Thackeray’s wife gets 65 stitches after pet dog bites her
रिपोर्ट मध्ये असे देखील लिहले होते, कि शर्मिला ह्यांची एक सर्जरी झाली आणि त्या मुंबई च्या हिंदुजा हॉस्पिटल मध्ये बऱ्या होत आहेत.
हि रिपोर्ट ऑगस्ट 19, 2015 ची होती.
आम्हाला झी न्यूज ची एक रिपोर्ट मिळाली, ज्याचे शीर्षक होते: Why did ‘Bond’ bite Raj Thackeray’s wife Sharmila?
हि रिपोर्ट Aug 20, 2015 प्रकाशित झाली होती आणि त्यात लिहले होते कि शर्मिला ह्यांच्या वर त्यांच्या कुत्र्याने तेव्हा हल्ला केला जेव्हा चुकून त्यांनी कुत्र्यावर पाय ठेवला.
आता हे स्पष्ट झाले होते कि हि घटना जुनी आहे, ऑगस्ट 2015 ची.
विश्वास न्यूज ला डिसेंबर 26, 2018 ची एक बातमी सापडली, ज्याचे शीर्षक होते: Raj Thackeray’s pet dog Bond, who had bitten his wife on the face in August 2015, dies
राज ठाकरेंच्या त्या कुत्राचे निधन 2018 साली झाले.
ह्या संबंधी आम्हाला एक व्हिडिओ देखील सापडला.
तो इथे बघा.
आता पर्यंतच्या पुराव्यांनी हे स्पष्ट झाले होते कि हि घटना जुनी आहे आताची नाही.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही सरचिटणीस-महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शालिनी ठाकरे ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले के हि घटना २०१५ साली झाली. शर्मिला ह्यांनी कुत्र्यावर पाय ठेवले ज्यामुळे त्याने चावले. त्यानंतर त्यांची एक छोटी सर्जरी देखील झाली. त्यांनी हे देखील सांगितले कि त्या कुत्र्याचे नंतर निधन झाले. ह्या व्हिडिओला आताच्या लाऊडस्पिकर विवादासोबत जोडून शेअर करणे खूप चुकीचे आहे.
शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने फेसबुक यूजर चे सोशल बॅकग्राऊंड चेक केले, Mohammad Ali Jauher Siddique ला दहा हजार लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात हे कळले कि 2015 च्या घटनेचा व्हिडिओ आता शेअर करण्यात येत आहे. हि पोस्ट दिशाभूल करणारी आहे.
- Claim Review : राज ठाकरेंच्या पत्नीला नुकतेच त्यांच्या कुत्र्याने चावले
- Claimed By : Mohammad Ali Jauher Siddique
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.