विश्वास न्यूज च्या तपासात राष्ट्रपती यांचे व्हायरल होत असलेले कोलाज खोटे असल्याचे समोर आले. राष्ट्रपती यांच्या बद्दल दुष्प्रचार करण्यासाठी वेग वेगळ्या कार्यक्रमाचे चित्र चुकीच्या मजकुरासह व्हायरल होत आहे.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर परत एकदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या तीन चित्रांचा कोलाज दुष्प्रचाराच्या हेतूने शेअर करण्यात येत आहे. कोलाज मध्ये त्यांच्या सोबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह आणि युपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिसतात. विश्वास न्यूज ने एकदा आधी देखील या चित्रांचा तपास केला होता. तेव्हा आम्हाला कळले होते कि लोकांनी हे चित्र आपत्तीजनक संदर्भासह शेअर करून खोट्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर सज्जाद अंसारी ने 9 ऑगस्ट रोजी I M WITH RAVISH KUMAR नावाच्या एका ग्रुप मध्ये हे चित्र पोस्ट करून लिहले: ‘हमारे राष्ट्रपति! महामहिम!’
ह्या पोस्ट मध्ये दिलेल्या गोष्टी अश्याच इथे प्रस्तुत केल्या आहेत. हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि दिल्ली च्या राजघाटावर जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री हे दोघे महात्मा गांधी यांना श्रद्धांजली समर्पित करण्यास गेले होते. त्या दरम्यान राष्ट्रपती यांना सगळ्याच नेत्याने हाथ जोडून अभिवादन केले होते. त्या कार्यक्रमाचे वेगळ्या अँगल चे चित्र खूप वेळा चुकीच्या संदर्भाने व्हायरल केले जाते.
त्याच प्रमाणे राष्ट्रपती आणि होम मिनिस्टर यांचे छायाचित्र तेव्हाचे आहे जेव्हा 20 जुलै 2017 रोजी रामनाथ कोविंद यांचे राष्ट्रपती म्हणून छान झाले. त्या वेळी अमित शाह हे भाजप चे अध्यक्ष रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन करत होते. हे चित्र आता परत चुकीच्या संदर्भाने व्हायरल होत आहे.
याच प्रकारे तिसरे छायाचित्र राष्ट्रपती आणि युपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आहे. हे छायाचित्र जून 2017 मधले आहे जेव्हा एनडीए च्या राष्ट्रपती पदासाठी उम्मेदवार म्हणून, रामनाथ कोविंद यांचे अभिवादन योगी आदित्यनाथ यांनी केले.
विश्वास न्यूज चा जुना तपास इथे वाचा.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही फेक पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. आम्हाला सोशल स्कँनिंग मध्ये कळले कि फेसबुक यूजर सज्जाद अंसारी लखनऊ चे रहिवासी आहे आणि त्यांच्या अकाउंट वर व्हायरल कन्टेन्ट जास्ती असतो.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात राष्ट्रपती यांचे व्हायरल होत असलेले कोलाज खोटे असल्याचे समोर आले. राष्ट्रपती यांच्या बद्दल दुष्प्रचार करण्यासाठी वेग वेगळ्या कार्यक्रमाचे चित्र चुकीच्या मजकुरासह व्हायरल होत आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923