महाराष्ट्र राज्यातील ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे ७५ हजार पेक्षा कमी असेल तर त्याच्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांना संपूर्ण दवाखान्यातील खर्च व कुठली पण मोठी सर्जरी फ्री मध्ये होणार असे एकनाथ शिंदे ह्यांनी घोषणा केली असा दावा करणारी पोस्ट दिशाभूल करणारी आहे. अशी घोषणा करण्यात आलेली नाही.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला एक पोस्ट फेसबुक वर व्हायरल होत असल्याचे दिसले. पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न ७५ हजारापेक्षा कमी आहे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला दवाखान्यातील सर्व सेवा मोफत देण्याचे जाहीर केले आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे लक्षात आले. अजून पर्यंत असा कुठलाही निर्णय एकनाथ शिंदे ह्यांनी महाराष्ट्रात घेतला नाही.
काय होत आहे व्हायरल?
Facebook user Payal Sharad Gund ह्यांनी व्हायरल चित्र पोस्ट केले आणि लिहले: भाजपा आणि शिवसेना शिंदे गट बनलेला युतीचे सरकार… महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षावर नक्कीच उतरणार
ह्या व्हायरल चित्राच्या मजकुरात लिहले होते: महाराष्ट्र राज्यातील ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे ७५ हजार पेक्षा कमी असेल तर त्याच्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांना संपूर्ण दवाखान्यातील खर्च व कुठली पण मोठी सर्जरी फ्री मध्ये होणार.
हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूजने साध्या कीवर्ड सर्च ने तपास सुरू केला. ते मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी केलेले काही मोठे बदल, त्यांचे न्यूज रिपोर्ट्स आम्ही तपासले.
आम्हाला एक आर्टिकल सापडले त्याचे शीर्षक होते: Eknath Shinde restores Emergency pension scheme scrapped by Thackeray govt
आम्हाला फायनान्शिअल एक्सप्रेस मध्ये देखील एक बातमी मिळाली ज्याचे शीर्षक होते: Eknath Shinde cabinet approves renaming of Aurangabad, Osmanabad cities
ह्या वर्षी मे मध्ये, पालक मंत्री असताना मातोश्री गंगुबाई संभाजी दवाखान्याचे उदघाटन केले.
आम्हाला द फ्री प्रेस जर्नल मध्ये एक बातमी सापडली.
आम्हाला कुठेही व्हायरल पोस्ट मधील योजना लागू केल्याची बातमी सापडली नाही.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांचे मीडिया कोऑर्डिनटोर, विराज मुळे ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. त्या दिशेने सरकार पावले घेत आहे पण अजून पर्यंत एकनाथ शिंदे ह्यांनी ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न ७५ हजार आणि त्यापेक्षा कमी आहे त्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबांना दवाखान्यात मोफत सेवा आणि तसेच शस्त्रक्रिया देण्याचे अजून घोषित करण्यात आलेले नाही.
तपासाच्या शेवटच्या टप्प्प्यात, विश्वास न्यूज ने फेसबुक यूजर Payal Sharad Garud ह्यांचे सोशल बॅकग्राऊंड चेक केले. त्या भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्त्या आहेत आणि बोरिवली मध्ये राहतात.
निष्कर्ष: महाराष्ट्र राज्यातील ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे ७५ हजार पेक्षा कमी असेल तर त्याच्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांना संपूर्ण दवाखान्यातील खर्च व कुठली पण मोठी सर्जरी फ्री मध्ये होणार असे एकनाथ शिंदे ह्यांनी घोषणा केली असा दावा करणारी पोस्ट दिशाभूल करणारी आहे. अशी घोषणा करण्यात आलेली नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923