X
X

Fact Check: पश्चिम बंगाल चे राज्यपाल जगदीप धनखड चे खोटे चित्र वायरल

विश्वास न्यूज च्या तपासणीत असे दिसून आले कि पश्चिम बंगाल चे राज्यपाल जगदीप धनखड यांच्या नावावर वायरल झालेला पोस्ट खोटा आहे. जुन्या छायाचित्राला मॉर्फ करून त्या चित्रावर राज्यपालनचा चेहरा चिपकवण्यात आला आहे.

  • By: Ashish Maharishi
  • Published: May 12, 2020 at 01:32 PM
  • Updated: May 12, 2020 at 01:58 PM

विश्वास न्यूज, नवी दिल्ली. पश्चिम बंगाल चे राज्यपाल जगदीप धनखड यांचे एक खोटे छायाचित्र सोशल मीडिया वर वायरल होत असल्याचे दिसून आले. काही लोकांनी हे छायाचित्र शेअर केले आणि त्यात जगदीप धनखड असल्याचा दावा केला. विश्वास न्युज च्या तपासादरम्यान हे छायाचित्र मॉर्फ्ड असल्याचे दिसून आले. राज्यपालांवर नेम साधण्याहेतू मूळ छायाचित्रावर त्यांचा चेहरा चिपकवून त्याला वायरल केले गेले.

काय होतंय वायरल?

ट्विटर हॅन्डल @SekhHasanujjam1 ने २ मे रोजी एक मॉर्फ्ड छायाचित्र ट्विट केले आणि त्यासोबत हा मजकूर लिहला: ”@jdhankhar1, another proof which clearly depicts that you are a faithful stooge of BJP RSS..This is the reason you always speaks against WB Govt.. (Pic collected)”

तपास:

विश्वास न्युज ने सगळ्यात आधी वायरल झालेले छायाचित्र ‘गूगल रिवर्स इमेज’ मध्ये अपलोड करून सर्च केले. आम्हाला सुरुवातीलाच खरे छायाचित्र विविध ठिकाणी प्राप्त झाले. यानंतर आम्ही ‘टाइमलाईन टूल’ वापरून सगळ्यात जुने छायाचित्र शोधण्यास सुरुवात केली.


शेवटी आम्हाला खरे छायाचित्र ‘न्यूजवीक’ नावाच्या वेबसाईट वर सापडले. यात असे नमूद केले आहे, कि हे छायाचित्र ३ नोव्हेंबर २०१४ रोजी चे असून, राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे सरसंघचालक मोहन भागवत आग्र्याला एका कॅम्प ला संबोधित करायला आले असतानाचे आहे.

विश्वास न्यूज च्या तपासणी दरम्यान हे खरे चित्र सापडले. संघाचे हे जुने छायाचित्र काही लोक आता वायरल करीत आहेत. असे असताना आम्ही संघाचे दिल्ली प्रांत प्रचार प्रमुख राजीव तुला यांच्या सोबत संपर्क साधला. त्यांचे म्हणणे होते कि हे कृत्य कोणीतरी राज्यपालांबद्दल खोटे पसरवण्यासाठी केले असावे. पश्चिम बंगाल चे सरकार तसेच त्याचे समर्थक अशे कृत्य आपले अपयश लपवण्यास देखील करतात असे त्यांचे म्हणणे होते.

आता सत्य समोर आल्या नंतर ज्या ट्विटर हॅन्डल नि ते छायाचित्र पसरवले आम्ही त्याची देखील तपासणी केली. सोशल सकॅनिंग मध्ये आम्हाला असे कळले कि Sekh Hasanujjaman हे पश्चिम बंगाल च्या हावडा चे रहिवासी आहेत. त्यांनी ट्विटर फेब्रुवारी २०२० रोजी जॉईन केले.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासणीत असे दिसून आले कि पश्चिम बंगाल चे राज्यपाल जगदीप धनखड यांच्या नावावर वायरल झालेला पोस्ट खोटा आहे. जुन्या छायाचित्राला मॉर्फ करून त्या चित्रावर राज्यपालनचा चेहरा चिपकवण्यात आला आहे.

  • Claim Review : another proof which clearly depicts that you are a faithful stooge of BJP RSS..This is the reason you always speaks against WB Govt.
  • Claimed By : Sekh Hasanujjaman
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later