X
X

Fact Check: मुंबई पोलिसांनी मेडिकल स्टोर, दूध आणि किराणाच्या दुकानांची उघडण्याची आणि बंद करण्याची कोणतीही वेळ ठरवलेली नाही.

विश्वास न्यूजला आपल्या तपासणीत आढळले आहे की हा दावा खोटा आहे. मुंबई पोलिसांनी मेडिकल स्टोर, दूध आणि किराणाच्या दुकानांची उघडण्याची आणि बंद करण्याची कोणतीही वेळ ठरवलेली नाही.

विश्वास न्यूज, नवी दिल्ली. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये आहे. सध्या लोकांना विनाकारण घराबाहेर निघण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत लॉकडाउनबाबत एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यात नमूद आहे की मुंबई पोलिसांनी मेडिकल स्टोर, दूध आणि किराणा दुकानांना फक्त सकाळी उघडे राहण्याची परवानगी दिली आहे. याच मेसेजमध्ये वर्तमानपत्र पण सकाळी 7 पूर्वी वितरीत करण्याबाबत लिहिले आहे. विश्वास न्यूजने केलेल्या तपासणीत हे खोटे असल्याचे आढळले आहे. मुंबई पोलिसांनी मेडिकल स्टोर, दूध आणि किराणाच्या दुकानांची उघडण्याची आणि बंद करण्याची कोणतीही वेळ ठरवलेली नाही.

काय होतंय व्हायरल?

व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे

Please Notedown..
Dates & timings for distributions of :
(1) MILK – From Morning 6 a.m to 8 a.m.(daily)
(2) NEWS PAPERS – Upto 7 a.m (daily)
(3) VEGETABLES, KIRANA & MEDICAL SHOPS : From Morning 8 a.m. to 11 a.m. ( on 24/26/28 & 30 March only)
By Order of Mumbai Police Commissioner
Good morning ”

ज्याचा मराठीत अनुवाद होतो: 

“कृपया लक्ष द्या ||वितरणाचे दिवस आणि वेळ: (1) *दूध* – सकाळी 6 ते 8 (रोज) (2) *वर्तमानपत्र* – सकाळी 7 पर्यंत (रोज) (3) *भाज्या, *किराणा & *मेडिकलची दुकाने*: सकाळी 8 ते 11 (24/26/28 आणि 30 मार्च रोजी) मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशाने *सुप्रभात “

या पोस्टची आर्काइव्ह लिंक इथे आहे.

तपासणी

या पोस्टची तपासणी करण्यासाठी आम्ही गूगल वर ही बातमी शोधण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला अशी कोणतीही बातमी सापडली नाही. सर्च केल्यावर मुंबई पोलिसांचा एक ट्वीट सापडला ज्यात लॉकडाउनच्या अवधीत काय उघडे असेल आणि काय बंद याबाबत माहिती होती. या माहितीनुसार आवश्यक वस्तूंची उलाढाल करणारी दुकाने उघडी राहतील पण त्यात किती अवधीसाठी उघडी राहतील हे नमूद नव्हते.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1242129489179504642?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1242129489179504642&ref_url=https%3A%2F%2Fwww.vishvasnews.com%2Fviral%2Ffact-check-mumbai-police-has-not-set-any-time-limit-for-the-opening-of-shops-selling-essential-commodities%2F

लॉकडाउनच्या अवधीत काय उघडे असेल आणि काय नाही याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एक ट्वीट पण सापडले. त्यांच्या ट्वीट प्रमाणे मेडिकल स्टोर, दूध आणि किराणा दुकाने उघडी राहतील. या ट्वीटमध्ये उघडे राहण्याच्या वेळेबाबत काहीही नमूद नव्हते.

या व्हायरल मेसेजबाबत आम्हाला मुंबई पोलीस अधिक्षक यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वर एक ट्वीट सापडला ज्यात नमूद होते, “Namaste, I’m the Commissioner of @MumbaiPolice & this list has definitely not been made on my directions! The last thing we want to get infected with & pass on during such crisis is rumours. Pls verify every msg regarding emergency services before you forward #StaySafeFromRumours.” याचा मराठीत अनुवाद होतो, “नमस्ते, मी मुंबई पोलीस अधिक्षक आहे. ही यादी निश्चितपणे माझ्या निर्देशावर निर्माण केलेली नाही! अशा संकटाच्या वेळी आपण अशा खोट्या बातम्या पसरवू नये. अत्यावश्यक सेवांबाबत कोणताही मेसेज फॉर्वर्ड करण्यापूर्वी कृपया त्याची सत्यता पडताळून पहावी. #अफवांपासूनसावधान”

खात्री करून घेण्यासाठी आम्ही मुंबई पोलीस प्रवक्ता डीसीपी प्रणय अशोक यांच्याशी संवाद साधला. त्यांनी पुष्टी केली की हा व्हायरल मेसेज खोटा आहे. त्यांनी म्हटले, “जसे मुंबई पोलीस अधिक्षकांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे, हा मेसेज खोटा आहे. आवश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी वेळेची कोणतीही मुदत नाही.”

व्हायरल मेसेजमध्ये वर्तमानपत्रांच्या वितरणावर वेळेचे बंधन असल्याचे नमूद आहे. आम्ही गुगल वर सर्च केले तर आम्हाला मिरर नाओचा एक युट्युब व्हिडियो सापडला ज्यात असे म्हटले गेले आहे की वितरक संघांनी कोरोना व्हायरसचा धोका टळेपर्यंत वर्तमानपत्र वितरित न करण्याचे ठरवले आहे.

वर्तमानपत्र वितरित न करण्याबाबत एक बातमी आम्हाला bestmediainfo.com वर पण सापडली.

या मेसेजला व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटर वर व्हायरल केले जात आहे. फेसबुक वर संजय चौधरी नावाच्या युझरने हा मेसेज शेयर केला आहे. प्रोफाइलप्रमाणे ते मुंबईत राहतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूजला आपल्या तपासणीत आढळले आहे की हा दावा खोटा आहे. मुंबई पोलिसांनी मेडिकल स्टोर, दूध आणि किराणाच्या दुकानांची उघडण्याची आणि बंद करण्याची कोणतीही वेळ ठरवलेली नाही.

  • Claim Review : *MILK* - From Morning 6 a.m to 8 a.m.(daily)
  • Claimed By : Sanjay Chaudhary
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later