Fact Check: २०१३ चे छायाचित्र आता करत आहे लोकांची दिशाभूल

हे छायाचित्र २०१३ साली काढलेले असून त्याचा सद्य परिस्थितीशी काहीही संबंध नाही. भारतीय जनता पार्टीने, २०१४ च्या निवडणुकांनंतर आपले सरकार स्थापन केले. हे छायाचित्र  कुठल्याही प्रकारे संघ किंवा भाजप सोबत संबंधित नसल्याचे दिसून आले.

विश्वास न्यूज, नवी दिल्ली. काश्मीर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अत्याचार करत आहे, असे सुचवणारे एक छायाचित्र आणि मजकूर ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. विश्वास न्यूजने तपासणी केली असता पोस्ट मध्ये असलेले छायाचित्र आणि मजकूर दिशाभूल करणारे असल्याचे आढळले.

काय होतय व्हायरल?

दावाः विश्वास न्यूजला असे दिसले की, @Kash_miri_Girl या ट्विटर हॅन्डलने एक छायाचित्र खालील मजकूरासह शेअर केले.  “RSS is not only danger for Muslims they are danger all humanity and development for work and relationship……RiazNaikoo_Our_Hero”

या पोस्टवर आतापर्यंत 26 रीट्वीट आणि 21 लाईक्स आल्या आहेत.

तपास:

विश्वास न्यूज ला असे वाटले कि हे छायाचित्र अलीकडचे नाही, म्हणून आम्ही यावर तपास सुरु केला.
गूगल सर्च इंजिनमध्ये, “रिव्हर्स इमेज सर्च” केल्यावर विश्वास न्यूजला हे छायाचित्र “आऊटलूक” च्या या लिंक वर सापडले: www.outlookindia.com.

अजून पुढे तपास केला असता हे छायाचित्र अससोसिएटेड प्रेस (एपि) च्या वेबसाईट वर सापडले www.apimages.com/ या छायाचित्राचे कॅप्शन म्हणजेच मथळा खालील प्रमाणे आहे: Indian policemen beat a Kashmiri government employee during a protest in Srinagar, India, Wednesday, April 10, 2013. Police used force to stop government employees during a protest called by the worker’s union demanding regularization of contractual jobs and a hike in salary. (AP Photo/Mukhtar Khan)

(भारतीय पोलीस एका काश्मिरी सरकारी कर्मचाऱ्याला एका मोर्च्यादरम्यान, श्रीनगर येथे, बुधवार, एप्रिल १०, २०१३ रोजी मारहाण करताना. कंत्राटी नौकऱ्यांना नियमित करणे तसेच पगार वाढविण्याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली तेव्हा पोलिसांना बळाचा वापर करावा लागला)
हे छायाचित्र, एपी चे छायाचित्रकार मुख्तार खान यांनी काढले होते. खात्री पटावी म्हणून विश्वास न्यूज ने, पुलित्झर प्राईझ विजेते, मुख्तार खान यांच्यासोबत संवाद साधला. त्यांनी देखील हे छायाचित्र २०१३ साली काढल्याचे स्पष्ट केले.


त्या ट्विटर हॅन्डल बद्दल पुढील तपास केले असता असे दिसून आले कि, @Kashmiri_Girl_  ने ट्विटर फेब्रुवारी २०२० रोजी जॉईन केले. तिचे आता पर्यंत २,५११ फोल्लोवर्स आहे तर ती १,२४२ लोकांना फॉलो करते.

निष्कर्ष: हे छायाचित्र २०१३ साली काढलेले असून त्याचा सद्य परिस्थितीशी काहीही संबंध नाही. भारतीय जनता पार्टीने, २०१४ च्या निवडणुकांनंतर आपले सरकार स्थापन केले. हे छायाचित्र  कुठल्याही प्रकारे संघ किंवा भाजप सोबत संबंधित नसल्याचे दिसून आले.

Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट