विश्वास न्यूजने तपास केला असता हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळून आले. व्हायरल चित्र 2018 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे परंतु अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या लग्नाचा दावा खोटा आहे. लोक खोटा दावा करून फोटो शेअर करत आहेत.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). भजन गायक अनूप जलोटा यांच्या नावाची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये त्यांना गायिका आणि अभिनेत्री जसलीन मथारूसोबत पाहिले जाऊ शकते. आता काही सोशल मीडिया वापरकर्ते अनुप जलोटा यांनी चौथ्यांदा लग्न केल्याचा आणि जसलीन मथारू ही त्यांची पत्नी असल्याचा दावा करत पोस्ट शेअर करत आहेत. अनेक वापरकर्ते हा दावा खरा असल्याचा समजून शेअर करत आहेत.
विश्वास न्यूजने तपास केला असता हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळून आले. व्हायरल चित्र 2018 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे परंतु अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या लग्नाचा दावा खोटा आहे. लोक खोटा दावा करून फोटो शेअर करत आहेत.
फेसबुक वापरकर्ता जग्गू वाराणसी (Jaggu Varanasi) यांनी 10 नोव्हेंबर 2024 रोजी पोस्ट शेअर केली आणि दावा केला आहे की, “अनुप जलोटा यांची चौथी पत्नी – आपल्याला कशाकडे प्रेरित करते? भजन करत जा भजन … खूप सामर्थ्य असते भजनात.”
या पोस्टवर विश्वास ठेवून इतर वापरकर्तेही या पोस्टला व्हायरल करत आहेत. त्याची संग्रहित लिंक इथे पहा.
आम्ही व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी गुगलवर सर्च केले. अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या लग्नाबद्दल आम्हाला कोणतीही बातमी मिळाली नाही.
तपासादरम्यान, आम्हाला या दोघांच्या बिग बॉस 12 मध्ये जाण्याशी संबंधित अनेक बातम्या आढळल्या. व्हायरल फोटोशी संबंधित बातम्या एनडीटीव्हीच्या वेबसाइटवर आढळून आल्या. हा अहवाल 17 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. दिलेल्या माहितीनुसार, अनूप जलोटा आणि जसलीन मथारू “बिग बॉस” 12 मध्ये सहभागी झाले होते आणि ही जोडी चर्चेत आली होती.
तपासादरम्यान आम्हाला दैनिक जागरणच्या वेबसाइटवर जसलीन मथारूच्या वक्तव्याशी संबंधित एक बातमी मिळाली. 10 डिसेंबर 2018 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जसलीन मथारू यांनी बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर खुलासा केला की, त्या अनुप जलोटाबरोबरच्या त्यांच्या नात्याबद्दल खोटे बोलल्या होत्या. जसलीनने सांगितले की, त्या अनुप जलोटांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. जसलीन यांनी पुढे खुलासा केला की, त्या त्यांच्या वयाच्या दुप्पट वयाच्या पुरुषाशी लग्न करणार नाहीत.
जसलीन मथारूसोबतच्या लग्नाबाबत अनूप जलोटा यांच्या वक्तव्याशी संबंधित बातमीही आम्हाला मिळाल्या. टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर एक बातमी पाहायला मिळाली. 12 ऑक्टोबर 2020 रोजी प्रकाशित झालेल्या बातमीत असे सांगण्यात आले होते की, अनुप जलोटा यांनी खुलासा केला आहे की, ते जसलीन मथारू यांच्याशी लग्न करू शकत नाहीत, कारण त्यांचे जसलीनवर प्रेम नाही. जसलीनच्या ड्रेसिंग स्टाईलचे तिच्या कुटुंबात कौतुक होत नाही, असेही ते म्हणाले.
यापूर्वीही जसलीन मथारू आणि अनुप जलोटा यांचे छायाचित्र शेअर करून असाच दावा करण्यात आला होता. त्यावेळी आम्ही या फोटोबद्दल अनुप जलोटा यांच्याशी संपर्क साधला होता. अनुप जलोटा यांनी आम्हाला सांगितले होते की, लोक खोटे दावे करत आहेत. त्यांच्या आणि जसलीनचा लग्नाचा दावा खोटा आहे. फॅक्ट चेक अहवाल येथे वाचा.
आम्ही मुंबईत बॉलीवूडविषयी बातमी देणाऱ्या दैनिक जागरणच्या ज्येष्ठ पत्रकार स्मिता श्रीवास्तव यांच्याशी आमचा संपर्क झाला. त्यांनी व्हायरल झालेला दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
शेवटी, आम्ही पोस्ट शेअर केलेल्या फेसबुक वापरकर्त्याचे प्रोफाइल स्कॅन केले. सोशल स्कॅनिंगमध्ये असे दिसून आले की, वापरकर्त्याला 7 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. वापरकर्त्याने स्वतःला वाराणसीचा रहिवासी असल्याचे सांगितले आहे.
नवी दिल्ली: भजन गायक अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या लग्नाची पोस्ट व्हायरल झाली आहे. लोक चुकीच्या दाव्यासह जुना फोटो शेअर करत आहेत. अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांनी लग्न केलेले नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923