X
X

Fact Check: पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने कपिल शर्मांच्या शोमध्ये नाही लावली हजेरी, व्हिडिओ एडिट केला आहे

विश्वास न्यूजने केलेल्या तपासात हा व्हायरल केला जात असलेला व्हिडिओ संपादित करण्यात आल्याचे आढळून आले आहे, हा व्हिडिओ दोन भिन्न व्हिडिओ एकत्र करून तयार करण्यात आला आहे. कपिल शर्मांचा हा व्हिडिओ 2018 मधील त्यांच्या शो च्या दरम्यानचा आहे, तर हानियाचा आमिरचा व्हिडिओ त्यावेळेचा आहे ज्यावेळी ती पाकिस्तानातील एका टीव्ही शो, ‘द फोरथ एम्पायर’मध्ये सामील झाली होती.

  • By: Umam Noor
  • Published: Aug 25, 2023 at 05:04 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर आणि कपिल शर्माचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा यांना एका महिलेच्या सौंदर्याची प्रशंसा करताना ऐकले जाऊ शकते. हा व्हायरल व्हिडिओ शेअर करत युजर्स दावा करत आहेत की, हानियाने नुकतीच कपिल शर्मांच्या शोमध्ये हजेरी लावली आहे.

विश्वास न्यूजला तपासात असे आढळून आले की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ एडिटेड असून, हा व्हिडिओ दोन भिन्न व्हिडिओ एकत्र करून तयार करण्यात आला आहे. कपिल शर्मांचा व्हिडीओ, 2018 मधील त्यांच्या शो च्या दरम्यानचा आहे, तर हानिया आमिरचा व्हिडिओ, ती जेव्हा पाकिस्तानचा टीव्ही शो ‘द फोर्थ एम्पायर’मध्ये सामील झाली होती, त्यावेळेचा आहे.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

व्हायरल पोस्ट शेअर करताना एका फेसबुक युजरने लिहिले की, “कपिल शर्मा शोमध्ये हानिया (Hania Amir in Kapil Sharma Show)”.

या पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.

तपास 

आमचा तपास सुरु केल्यानंतर, आम्ही सर्वप्रथम कपिल शर्मांच्या व्हिडिओचे कीफ्रेम काढले आणि गुगल लेन्सच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला. शोधात, आम्हाला हा व्हिडिओ 9 नोव्हेंबर 2021 रोजी ‘HARSH_official_s’ च्या फेसबुक पेजवर अपलोड केलेला आढळला. कपिल शर्मांचा हा व्हायरल व्हिडिओ 1 मिनिट 27 सेकंदाचा आहे, या व्हिडिओमध्ये ते प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेची स्तुती करताना दिसत आहेत. 

आम्ही सोनी टीव्हीचे व्हेरीफाइड यूट्यूब चॅनेल सेट इंडियावर पोहोचलो आणि कीवर्डच्या मदतीने व्हायरल व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली. तपासात आम्हाला ‘द कपिल शर्मा शो सीझन 2-Ep 1-The Madness Returns – 29 डिसेंबर, 2018’ नावाचा संपूर्ण एपिसोड आम्हाला मिळाला, ज्यामधून व्हायरल व्हिडिओची क्लिप काढली गेली आहे. 11 मिनिटे 11 सेकंदाच्या फ्रेममध्ये व्हायरल व्हिडिओचे काही अंश पाहिले जाऊ शकतात. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेसोबत केलेल्या संभाषणात, तिचे कौतुक करताना दिसत आहे. या कार्यक्रमाला रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.  

आमचा तपास पुढे नेत आम्ही व्हायरल व्हिडिओतून हानिया आमिरच्या फ्रेमचे कीग्रॅब काढले आणि त्यांचा गुगल लेन्सच्या माध्यमातून शोध घेतला. या शोधात आम्हाला एआरआय डिजिटल डॉट टीव्हीच्या इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या त्याच प्रसंगाचे काही फोटो सापडले. 12 मार्च रोजी अपलोड करण्यात आलेले हे फोटो, ‘#thefourthumpire’ या शो च्या दरम्यान घेण्यात आले होते.

पुढील तपासात आम्ही एआरवाय डिजिटलच्या सत्यापित यूट्यूब चॅनेलवर पोहोचलो आणि कीवर्डसह व्हायरल व्हिडिओचा शोध घेतला. या शोधामध्ये आम्हाला ’11 मार्च 2023 च्या thefourthumpire’ या शोचा संपूर्ण एपिसोड सापडला. त्याच व्हिडिओतून हानिया आमिरचे सर्व व्हिज्युअल काढले गेले आहेत आणि त्यांना एडिट करून कपिल शर्मांच्या शोमध्ये जोडले गेले आहेत.

व्हायरल पोस्टच्या संदर्भात पुष्टीसाठी आम्ही ज्येष्ठ एंटरटेनमेंट पत्रकार पराग छपेकर यांच्याशी संपर्क साधला आणि व्हायरल पोस्ट त्यांच्याशी शेअर केली. त्यांनी आम्हाला सांगितले की, कपिल शर्मा शो नुकताच संपला आहे, परंतु यापूर्वीही ही पाकिस्तानी अभिनेत्री त्यांच्या शोमध्ये कधीच दिसली नाही.

बनावट पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक युजरच्या सोशल स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळले की, हे पेज 4 ऑगस्ट 2023 रोजी तयार केले गेले होते आणि यात कपिल शर्मा शो शी संबंधित शॉर्ट व्हिडिओ आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने केलेल्या तपासात हा व्हायरल केला जात असलेला व्हिडिओ संपादित करण्यात आल्याचे आढळून आले आहे, हा व्हिडिओ दोन भिन्न व्हिडिओ एकत्र करून तयार करण्यात आला आहे. कपिल शर्मांचा हा व्हिडिओ 2018 मधील त्यांच्या शो च्या दरम्यानचा आहे, तर हानियाचा आमिरचा व्हिडिओ त्यावेळेचा आहे ज्यावेळी ती पाकिस्तानातील एका टीव्ही शो, ‘द फोरथ एम्पायर’मध्ये सामील झाली होती.

  • Claim Review : हानिया आमिर नुकतीच कपिल शर्मांच्या शोमध्ये दाखल झाली आहे.
  • Claimed By : FB Page: Fun Zone 
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later