X
X

Fact Check: 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने टाटा कंपनी नाही देत आहे 2,999 रुपये विनामूल्य, फिशिंग लिंक केली जात आहे सामायिक

  • By: Jyoti Kumari
  • Published: Jul 19, 2023 at 10:59 AM
  • Updated: Jul 19, 2023 at 01:25 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियावर विनामूल्य ऑफरच्या नावावर अशा अनेक बनावट पोस्ट व्हायरल होत असतात, ज्या आपली वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी आणि फसवणूक करण्यासाठी सामायिक केल्या जातात. अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने टाटा, भारतातील लोकांना 2,999 रुपये पूर्णपणे विनामूल्य देत आहे. या पोस्टमध्ये एक लिंक देखील देण्यात आली आहे.

विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा बनावट निघाला आहे. टाटा यांच्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट चुकीची आहे. वाचकांनी चुकूनही अशा लिंकवर क्लिक करू नये. अशा प्रकारच्या लिंक्स फसवणुकीसाठी बनवल्या जातात.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक पेज ‘कायली स्पार्क्स’ (संग्रहित आवृत्ती)ने 2 जुलै रोजी रतन टाटा यांच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे की, “150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ₹ 2,999 मोफत.”

या पोस्टमध्ये लिहिले आहे की: टाटांचा मोठा धमाका भारतातील लोकांसाठी 2,999 रुपये पूर्णपणे विनामुल्य. पैसे खात्यात वळवण्यासाठी एक लिंक देखील देण्यात आली आहे.

फेसबुकवर ‘न्यू इयर ऑफर’ नावाच्या पेज (आर्काइव्ह लिंक)वरही एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये टाटाला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 2999 रुपये विनामुल्य दिले जात आहेत.

अनेक वापरकर्त्यांनी दावा केला आहे की, जिओ, 7 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपल्या वापरकर्त्यांना 999 रुपये देत आहे. याच पोस्टमध्ये 1726 रुपयांचे बक्षीस देण्याचा दावा करण्यात आला आहे.  

तपास

आम्ही व्हायरल दाव्याचा तपास करण्यासाठी आम्ही व्हायरल पोस्ट काळजीपूर्वक पाहिली. त्यात दिलेल्या वेबसाइटचा यूआरएल (URL) पाहून ही माहिती समोर येत आहे की, ती टाटाच्या वेबसाइटची लिंक नाही, तर एखाद्या दुसऱ्या अविश्वसनीय वेबसाइटची लिंक आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर ‘cashfire33.com‘ हे पेज दिसेल.

तपासाच्या दरम्यान आम्ही टाटाच्या वेबसाईटवर भारतातील लोकांना 2,999 रुपये देण्याबाबत शोध घेतला. तिथे आम्हाला व्हायरल दाव्याशी संबंधित कोणतीही माहिती सापडली नाही. जर कंपनीने एवढी मोठी ऑफर दिली असती तर नक्कीच वेबसाइटवर त्याबद्दल काही माहिती उपलब्ध असती. आम्ही टाटा यांच्या सोशल मीडिया हँडलवरही सर्च केले. तिथे देखील व्हायरल दाव्याशी संबंधित कोणतीही पोस्ट सापडली नाही.

यापूर्वीही जिओ आणि टाटा यांच्या नावावर वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यांची वेळोवेळी विश्वास न्यूजने चौकशी केली होती. आपण येथे आमची फॅक्ट चेक कथा वाचू शकता.

आम्ही भारतीय सायबर आर्मीचे अध्यक्ष आणि भारतीय पोलिसांचे सायबर गुन्हे सल्लागार किशोर चौधरी यांच्याशी संपर्क साधला. आम्ही सर्व पोस्ट त्यांच्याबरोबर शेअर केल्या. त्यांनी सांगितले की, “लोक अशा लिंक घोटाळा करण्यासाठी पोस्ट आणि शेअर करतात. बऱ्याचदा, आपला डेटा चोरी करण्यासाठी देखील लिंक तयार केल्या जातात. अशा लिंकवर क्लिक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती मिळवणे आवश्यक आहे. या लिंक्स खोट्या आहेत, वास्तविक वेबसाइटच्या नाहीत.

शेवटी बनावट पोस्ट असलेल्या पेजची चौकशी करण्यात आली. माहिती मिळाली आहे की, 353 जण याला फॉलो करतात. 11 फेब्रुवारी 2023 रोजी फेसबुकवर हे पेज तयार करण्यात आले होते.

निष्कर्षः विश्वास न्यूजच्या तपासाच्या दरम्यान भारतातील लोकांना 2,999 रुपये मोफत देण्याचा टाटांचा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळून आले. कंपनीकडून अशी कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही.

Claim Review: टाटाद्वारे 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ₹ 2,999 विनामूल्य दिले जात आहे.
Claimed By: कायली स्पार्क्स
Fact Check: खोटा

  • Claim Review : टाटाद्वारे 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ₹ 2,999 विनामूल्य दिले जात आहे.
  • Claimed By : कायली स्पार्क्स
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later