मोबाईल टॉवर लावायच्या नावावर लोकांना ठगण्याचे मोठे नेटवर्क सुरु आहे. या बाबतीत जियो चे नाव घेण्यात येत आहे, स्वतः जियो ने याला चुकीचे सांगितले आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) ने टॉवर साठी एनओसी दिली नाही. या शिवाय टावर एंड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवाइडर्स एसोसिएशन (TAIPA) ने पण याला ग्राहकांसोबत धोकाधडीचा मामला सांगितले आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): लोकांना जियो च्या नावावर ठगण्याचा प्रकार समोर आला आहे. विश्वास न्यूज ला आपल्या फॅक्ट-चेकिंग वॉट्सऐप चैटबॉट (+91 95992 99372) वर हा दावा आमच्या यूजर ने पाठवला. या दाव्या सोबत एक अप्रूवल लेटर पण आम्हाला फॅक्ट चेक करता पाठवण्यात आले, यात दावा केला गेला आहे कि जियो कम्युनिकेशन टॉवर लावत आहे. या लेटर मध्ये उपभोक्त्या ला पैसे कमावण्यापासून तर नोकरी मिळवून देण्याचा दावा केला गेला आहे. या लेटर मध्ये उपभोक्त्या कडून एक फी ची रकम मागण्यात येत आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हे अप्रूवल लेटर खोटे ठरले. जियो कोणत्याहि प्रकार चे टॉवर लावण्यास फीस घेत नाही.
काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला आपल्या वॉट्सऐप चैटबॉट वर एका यूजर कडून एक एग्रीमेंट पेपर मिळाला. यात जियो टॉवर लावण्याचा दावा करण्यात येत आहे. हे लेटर सांगितल्याप्रमाणे, हिंदुस्तान टावर प्राइवेट लिमिटेड कंपनी कडून आल्याचे समजले आहे. त्यात दावा केला जात आहे कि हा अग्रीमेंट २० वर्षांसाठी असेल, ज्यात एक वेळा पेमेंट स्वरूपात ४० लाख रुपये मिळतील, या सोबतच २५ हजार रुपये भाडे महिन्याला मिळतील. तसेच १२ हजार रुपये महिन्याचे एका गार्ड चे देण्यात येतील. हे अग्रीमेंट खालील प्रमाणे आहे.
तपास:
सगळ्यात आधी विश्वास न्यूज ने हे अग्रीमेंट निरखून बघितले. या लेटर मध्ये, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, इसरो, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) पर्यंतच्या लोकांचा उल्लेख केला गेला आहे. त्या सोबतच कुठल्यातरी 4जी प्रोजेक्ट इंडिया के चीफ फाइनेंशियल ऑफिसर कडून हे अप्रुव्हड असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या नजरेतच हे पत्र नीट नसल्याचे कळते. तसेच 4जी प्रोजेक्ट इंडिया अशी कुठलीच अधिकृत गोष्ट अस्तित्वात नाही.
विश्वास न्यूज ने काही महत्वाच्या कीवर्डस च्या मदतीने इंटरनेट वर सर्च करण्यास सुरुवात केली. आम्हाला जाणून घ्यायचे होते कि टॉवर काऊन घेण्यास अशी कुठली योजना अस्तित्वात आहे का. आम्हाला टावर एंड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवाइडर्स एसोसिएशन (TAIPA) कडून एक सावध करण्या हेतू रिपोर्ट मिळाली. यात इंडस्ट्री बॉडी लोकांना जागरूक राहण्यास सांगत होती, तसेच सांगितले होते कि मोबाईल टॉवर च्या नावावर लोकांना ठगण्यात येत आहे. यात त्यांनी सांगितले कि हे कृत्य विशेषतः यूपी, पश्चिम बंगाल, तमिलनाडु आणि महाराष्ट्र मध्ये सक्रिय आहेत. यात लोकांना लाखो रुपयांचा मोह दाखवून त्यांना ठगण्यात येत आहे.
TAIPA कडून सांगण्यात येत आहे कि ट्राई ने मोबाईल टॉवर इंस्टॉलेशन साठी कुठलीच NOC दिली नाही आहे. लोकांना शेलह देण्यात येत आहे कि कोणी असा ऑफर दिल्यास लोकांनी सर्व्हिस प्रोव्हायडर ला सांगावे तसेच पोलिसात तक्रार करावे. या रिपोर्ट ला इथे क्लिक करून वाचा.
या लेटर ला जियो च्या नावावर वापरण्यात येत आहे. विश्वास न्यूज ने या लेटर ला ट्विट करून संबंधित अधिकाऱ्याकडून उत्तर मागितले. जियो केअर च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल ने उत्तर दिले, ज्यात त्यांनी सांगितले कि जियो टॉवर इंस्टॉलेशन चे पैसे घेत नाही. जियो ने अशे कुठल्याच व्यक्ती ला पैसे देण्यास सांगितले नाही.
निष्कर्ष: मोबाईल टॉवर लावायच्या नावावर लोकांना ठगण्याचे मोठे नेटवर्क सुरु आहे. या बाबतीत जियो चे नाव घेण्यात येत आहे, स्वतः जियो ने याला चुकीचे सांगितले आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) ने टॉवर साठी एनओसी दिली नाही. या शिवाय टावर एंड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवाइडर्स एसोसिएशन (TAIPA) ने पण याला ग्राहकांसोबत धोकाधडीचा मामला सांगितले आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923