विश्वास न्यूज च्या तपासात जियो च्या नावावर व्हायरल होत असलेल्या बेगांचा मुकेश अंबानी च्या जियो कंपनी सोबत काही संबंध नाही.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): दिल्ली मध्ये शेतकरी आंदोलन सुरु असताना सोशल मीडिया वर काही छायाचित्र व्हायरल होताना दिसतात. अश्याच एका छायाचित्रात पोत्यांवर जियो लिहलेले दिसते. यूजर्स दावा करत आहेत कि हे पोते मुकेश अंबानी यांच्या जियो कंपनी चे आहे. जियो शेतकऱ्यांकडून स्वस्तात धान्य खरेदी करत आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, या संबंधी आम्ही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा केली. त्यांनी हि पोस्ट खोटी असल्याचे सांगितले.
काय होत आहे व्हायरल?
जियो बॅग चे काही छायाचित्र सोशल मीडिया वर व्हायरल आहे. निळे, पांढरे आणि लाल रंगाच्या बॅग ह्या मुकेश अंबानी यांच्या कंपनीचे सांगून यूजर शेअर करत आहे.
फेसबुक यूजर Tinku Lotey ने २३ डिसेंबर रोजी एक पोस्ट अपलोड करून लिहले: ‘कानून बनने से पहले ही थैले भी बन गए थे और सभी तैयारियां पूरी हो गई थी। अभी भी लोग समझते है कि सेठ जी के आदेश पर चौकीदार काम नहीं करता।’
अर्थात: कानून बनवण्याआधी पोते पण बनले आणि सगळ्या पायऱ्या पण पूर्ण झाले, अजून पण लोकांना वाटतं कि शेठजींच्या आदेशावर चौकीदार काम नाही करत.
या पोस्ट ला खरे मानून बरेच यूजर शेअर करत आहे. पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
फेसबुक यूजर अनिकेत सिंह ने पण २४ डिसेंबर रोजी जियो बॅग चे छायाचित्र अपलोड करून दावा केला: ‘DEKH LO ANDHBHAKTO KRISHI KANOON K PAHLE HI JIO KI PACKING START HO CHUKI THI SAMBHAL JAO ABHI BHI WAKT HAI KISHANO KA SATH DO WARNA ANARTH HO JAYEGA…..’
याच प्रकारे Kaur Sister’s नावाच्या एका यूजर ने बॅग चे त्वहिन वेग वेगळे छायाचित्र शेअर केले आणि दावा केला: ‘कानून बाद में बने है और थैले पहले 🙄 ये तस्वीर बहुत कुछ कह रही है ।।। अब तो समझ जाओ।’
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी जियो आणि रेलिअन्स च्या वेबसाईट चा तपास केला हे माहिती करून घ्यायला कि रिलायन्स च्या नावाने कुठला फूड प्रॉडक्ट चा बिसनेस आहे का. वेबसाईट चा तपास केल्यावर आम्हाला असे काही मिळाले नाही. जियो आणि रिलायन्स ची वेबसाईट तुम्ही नेते बघू शकता. रिलायन्स जियो मार्ट च्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन ग्रोसरी शॉपिंग करू शकता.
विश्वास न्यूज ने सत्य जाणून घेण्यास रिलायन्स इंडस्ट्री आणि जियो कंपनी च्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला. रिलायन्स इंडस्ट्रीएस लिमिटेड मधील कॉर्पोरेट कूम्युनिकेशन चे वाईस प्रेसिडेंट तुषार पानीयं ने व्हायरल पोस्ट फेक असल्याचे सांगितले. तसचे रिलायन्स जियो चे फ्रैंको विलियम यांनी देखील विश्वास न्यूज ला व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सांगितले. हे लोकं आमच्या ब्रँड चा दुरुपयोग करत आहेत असे त्यांनी सांगितले.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि Tinku Lotey नावाच्या पेज चा पंजाब सोबत संबंध आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात जियो च्या नावावर व्हायरल होत असलेल्या बेगांचा मुकेश अंबानी च्या जियो कंपनी सोबत काही संबंध नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923