Fact Check: प्रधानमंत्री जन औषधी केंद्रावर उपलब्ध नाही आहे इंजेक्शन रेमडेसिविर, व्हायरल पोस्ट खोटी आहे
आमच्या तपासात स्पष्ट झाले कि रेमडेसिविर प्रधानमंत्री भारतीय जन औषधि केंद्रावर उपलब्ध नाही आहे. तसेच या इंजेक्शन ला सात फार्मास्युटिकल कंपन्या बनवतात, ज्यातील फक्तआ दोन ने किंमत कमी केली आहे. आता हे इंजेक्शन ८९९ ते ५००० रुपये पर्यंत उपलब्ध आहे.
- By: Amanpreet Kaur
- Published: Apr 22, 2021 at 03:42 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर होत आहे ज्यात दावा करण्यात येत आहे कि कोरोनाव्हायरस च्या उपचारात वापरण्यात येणारे रेमडेसिविर इंजेक्शन हे प्रधानमंत्री जन औषधि केंद्रावर उपलब्ध आहे. मेडिकल स्टोर्स वर हे ४००० रुपयांना विकल्या जात आहे पण तुम्ही याला ८९९ मध्ये खरेदी करू शकता असे या पोस्ट मध्ये सांगण्यात येत आहे. या साठी पेशंट ला आधार कार्ड, कॉवीड पॉसिटीव्ह रिपोर्ट, डॉक्टर चे प्रिस्क्रिप्शन आणि इंजेक्शन विकत घेणार्यांचे आधार कार्ड देखील दाखवावे लागतील असे त्या पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समजले.
रेमडेसिविर प्रधानमंत्री जन औषधि केंद्रावर उपलब्ध नाही आहे, आणि या पोस्ट मध्ये दावा करण्यात आलेल्या इंजेक्शन ची किंमत देखील दिशाभूल करणारी आहे. भारतात हे इंजेक्शन ७ फार्मास्युटिकल कंपन्या बनवत आहेत, ज्यातील फक्त एका कंपनी ने आपले भाव कमी करून ८९९ वर आणले आहे, जेव्हाकी डॉ रेड्डीज ने ५० टक्के भाव कमी केला आहे, हि बातमी होत पर्यंत, या इंजेक्शन ची किंमत बाकी कंपन्यांनी सांगितली नव्हती.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Shahin Patel ने हि पोस्ट शेअर करून इंग्लिश मध्ये कॅप्शन लिहले: Hello Friends Anyone requiring injection Remdesivir can get @ Rs 899/- as against Rs.4000/- charged by medical shops.
You can purchase it directly from Pradhan Mantri Bhartiya Jan Aushadhi Kendra
Pradhan mantri Jan Aushadhi Kendra is there in almost every city in India.
Documents required:
1) Patient’s Aadhar card
2) Covid positive report
3) ORIGINAL Doctors prescription
4) aadhar card of person taking medicine
Please share in all your groups to help others.
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट च्या तपासाच्या पहिल्याच टप्प्यात सगळ्यात आधी प्रधानमंत्री जन औषधि केंद्र च्या वेबसाईट ला तपासले. आम्हाला त्या लिस्ट मध्ये रेमडेसिविर चे नाव कुठेच मिळाले नाही. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधि केंद्रावर संपूर्ण देशात सगळे जेनेरिक औषध स्वस्तात उपलब्ध करवल्या जातात.
सरकार ने २००८ साली हि स्कीम सुरु केली होती पण, २०१५ साली या स्कीम ला परत लाँच केले गेले.
आम्ही प्रधानमंत्री भारतीय जनऔषधि केंद्र च्या नेशनल हेल्पलाईन नंबर वर संपर्क केला, तेव्हा आमचे बोलणे हे दीपक यांच्या सोबत झाले. त्यांनी सांगितले कि रेमडेसिविर इंजेक्शन हे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधि केंद्रांवर उपलब्ध नाही आहे. पोस्ट मध्ये करण्यात येणारा दावा खोटा आहे.
आम्ही इंटरनेट वर बऱ्याच मीडिया रिपोर्ट्स देखील पहिल्या ज्यात रेमडेसिविर वर नीति आयोग चे सदस्य डॉ. वीके पॉल यांचे वक्तव्य आहे. १३ एप्रिल रोजी प्रकाशित या रिपोर्ट प्रमाणे, डॉ पॉल ने स्पष्ट म्हंटले कि रेमडेसिविर इंजेक्शन चा वापर हे दवाखान्यात भरती झालेल्या त्याच पॉसिटीव्ह रुग्णांसाठी आहे ज्यांना ऑक्सिजन लागले आहे. केमिस्ट कडून हे औषध विकत घेतले जाऊ शकत नाही.
व्हायरल पोस्ट मध्ये रेमडेसिविर च्या किमतीला घेऊन पण दावा करण्यात आले आहे. दावा केला आहे कि हे इंजेक्शन ८९९ मध्ये मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे, मार्च मध्ये Zydus Cadila ने १०० मिलिग्रॅम इंजेक्शन ची किंमत २८०० रुपये इतकी ठेवली होती. ज्याला कमी करून आता ८९९ करण्यात आले होते. तसेच नुकतेच डॉ रेड्डीज ने किंमत ५० टक्क्याने कमी केली होती.
हि पोस्ट फेसबुक वर ज्याने शेअर केली, यूजर Shahin Patel चे आम्ही सोशल स्कॅनिंग केले. त्यात आम्हाला कळली कि यूजर महाराष्ट्राच्या मुंबई च्या रहिवासी आहेत.
निष्कर्ष: आमच्या तपासात स्पष्ट झाले कि रेमडेसिविर प्रधानमंत्री भारतीय जन औषधि केंद्रावर उपलब्ध नाही आहे. तसेच या इंजेक्शन ला सात फार्मास्युटिकल कंपन्या बनवतात, ज्यातील फक्तआ दोन ने किंमत कमी केली आहे. आता हे इंजेक्शन ८९९ ते ५००० रुपये पर्यंत उपलब्ध आहे.
- Claim Review : प्रधानमंत्री जन औषधी केंद्रावर उपलब्ध आहे इंजेक्शन रेमडेसिविर
- Claimed By : Shahin Patel
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.