X
X

Fact Check : दीपिका मंडल यांचे एडिटेड छायाचित्र आता नीता अंबानी च्या नावाने व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात नीता अंबानी यांच्या नावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र हे खोटे असल्याचे समजले. दीपिका मंडल यांचे छायाचित्र एडिट करून खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): फेसबुक वर पुन्हा एकदा एक खोटे छायाचित्र व्हायरल होताना दिसत आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीता अंबानी यांच्या समोर वाकून नमस्कार करताना पहिले जाऊ शकते. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि दीपिका मंडल या एक एनजीओ चालवतात. यांच्या छायाचित्रासोबत खोडतोड करून तिथे नीता अंबानी यांचे छायाचित्र चिपवण्यात आले आहे.  
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. या आधी देखील दीपिका मंडल  यांचे हेच छायाचित्र, बिसनेसमॅन गौतम अदानी यांच्या पत्नी च्या नावाने व्हायरल होत होते. याचा विश्वास न्यूज ने आधी देखील तपास केला होता. हा तपास तुम्ही इथे क्लीक करून वाचू शकता.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर कृष्णा मालवीय ने ९ एप्रिल रोजी एक छायाचित्र अपलोड करून लिहले: ‘शुभ रात्रि….जय कांग्रेस विजय कांग्रेस जय कांग्रेस…भड़कते रहना रात भर अंधभक्तों अपनी अंधभक्ति में इतिहास गवाह है राजाओं ने ईस्ट इंडिया कम्पनी के आगे हाथ जोड़े और वर्तमान में केंद्र सरकार अंबानी की लुगाई के आगे हाथ जोड़ते हुए…..
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल छायाचित्रामागचे सत्य जाणून घेण्यासाठी सगळ्यात आधी रिलायन्स च्या प्रवक्तांसोबत संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले कि आधी देखील बऱ्याच वेळा हे छायाचित्र व्हायरल झाले आहे. या छायाचित्रात नीता अंबानी नाहीत.

आम्हाला ओरिजिनल छायाचित्र नेमके कुठले हे जाणून घ्यायचे होते. या साठी आम्ही ऑनलाईन टूल ची मदत घेतली. गूगल रिव्हर्स इमेज टूल च्या मदतीने आम्हाला ओरिजिनल छायाचित्र एका वेबसाईट वर मिळाले. वीटीवी गुजराती नावाच्या वेबसाईट वर सांगितले गेले कि छायाचित्रात दिसत असलेल्या महिला या दीपिका मंडल आहेत. २०१५ साली झालेल्या एका इव्हेंट चे हे छायाचित्र आहे. याची संपूर्ण बातमी इथे वाचा.

तपास दरम्यान आम्हाला वनइंडिया च्या वेबसाईट वर संपूर्ण माहिती मिळाली. बातमीत सांगितल्या प्रमाणे, दीपिका मंडल या एक एनजीओ चालवतात. संपूर्ण बातमी इथे वाचा.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि यूजर कृष्णा मालवीय मध्य प्रदेश च्या भोपाळ मध्ये राहतात.


निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात नीता अंबानी यांच्या नावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र हे खोटे असल्याचे समजले. दीपिका मंडल यांचे छायाचित्र एडिट करून खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

  • Claim Review : नरेंद्र मोदी यांचे नीता अंबानी सोबत छायाचित्र
  • Claimed By : यूजर कृष्णा मालवीय
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later