Fact Check: राकेश टिकैत यांच्या चेहऱ्यावर काळं फासल्याचे छायाचित्र एडिटेड आहे
विश्वास न्यूज च्या तपासात हि पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समजले. व्हायरल हायचित्रं एडिटेड आहे. खऱ्या छायाचित्रात राकेश टिकैत यांच्या चेहऱ्यावर काळे फासले नाही आहे. पण, राकेश टिकैत यांच्यावर राजस्थान येथे हल्ला नक्की झाला होता, पण या छायाचित्राचे त्या घटनेसोबाबत काहीच संबंध नाही.
- By: Pallavi Mishra
- Published: Apr 8, 2021 at 11:49 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर भारतीय किसान यूनियन चे प्रवक्ता राकेश टिकैत यांचे छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात दिसत होते कि त्यांच्या चेहऱ्यावर काळं फसले होते. पोस्ट सोबत दावा करण्यात येत होता कि राजस्थान मध्ये राकेश टिकैत यांच्यावर हमला करण्यात येत आहे, त्यानंतर त्यांची परिस्थिती अशी झाली.
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समजले. व्हायरल छायाचित्र एडिटेड आहे. खऱ्या छायाचित्रात त्याच्या चेहऱ्यावर काळं नाही फासलं आहे. पण हा दावा खरा आहे कि त्यांच्यावर हल्ला झाला होता. राकेश टिकैत यांच्या ताफ्यावर राजस्थान च्या अलवार जिल्ह्यात ततारपूर चौकात २ एप्रिल रोजी हल्ला झाला होता, पण छायाचित्राचा त्या घटनेशी काहीच संबंध नाही.
काय होत आहे व्हायरल?
व्हायरल छायाचित्रात भारतीय किसान यूनियन चे प्रवक्ता, राकेश टिकैत यांच्या चेहऱ्यावर काळं फसल्याचे दिसत आहे. या पोस्ट सोबत लिहले आहे: “भारत बंद करवाने चले थे। राजस्थान के पपलाज में जनता ने बुरी तरह पीटा और मुंह पर कालिख पोत दी।”
व्हायरल पोस्ट ची आर्काइव्ह लिंक इथे बघा.
तपास:
आपल्या तपासाची सुरुवात आम्ही या छायाचित्राला गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये शोधून केली. आम्हाला हे छायाचित्र awazeuttarpradesh.com या वेबसाईट वर सापडली. हे छायाचित्र १९ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित एका बातमी सोबत वापरले गेले होते, पण या चित्रात त्यांच्या चेहऱ्यावर काळें फासले नाही आहे.
आम्हाला न्यूज एजेन्सी एएनआई च्या युट्युब चॅनेल वर देखील हा व्हिडिओ सापडला, ज्यात हे छायाचित्र वापरले गेले होते. यात देखील टिकैत यांचा चेहरा स्वच्छ दिसला. हा व्हिडिओ १९ जानेवारी २०२१ रोजी अपलोड केला होता. पोस्ट प्रमाणे हे छायाचित्र सिंघू बॉर्डर चे आहे.
या बाबतीत अधिक माहिती साठी आम्ही सिंघु बॉर्डर वर शेतकरी आंदोलन कव्हर करणारे आमचे जागरण चे रिपोर्टर सोनू राणा यांना संपर्क केला, त्यांनी म्हंटले, हे छायाचित्र एडिटेड आहे. खऱ्या छायाचित्रात राकेश टिकैत यांच्या चेहऱ्यावर काळं नाही फासले आहे. हे छायाचित्र सिंग बॉर्डर चे आहे, जेव्हा १९ जानेवारी २०२१ रोजी टिकैत ने सुप्रीम कोर्टाद्वारे गठीत कमिटी ला भेटण्यास नकार दिला होता.
आता आम्ही हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला कि त्यांच्यावर राजस्थान मध्ये हल्ला झाला होता कि नाही. आम्हाला jagran.com वॉर एक बातमी मिळाली ज्यात लिहले होते: “शुक्रवार (2 अप्रैल) को टिकैत ने अलवर जिले में पहले हरसौली और फिर बानसूर में किसान सभा को संबोधित किया था। हरसौली से बानसूर जाते समय ततारपुर चौराहे पर उनके काफिले पर पथराव करने के साथ ही लाठियों से गाड़ियों के शीशे तोड़े गए थे।”
hindi.news18.com च्या बातमी प्रमाणे, “किसान आंदोलन के अगुआ नेता राकेश टिकैत के काफिले पर शुक्रवार को राजस्थान में भीड़ ने हमला कर दिया. यह हमला तब हुआ, जब टिकैत अलवर के हरसौरा में सभा को संबोधित कर बानसूर जा रहे थे. इसी बीच ततारपुर में भीड़ ने टिकैत के काफिले पर पथराव शुरू कर दिया. पथराव में टिकैत की कार के शीशे टूट गये. इस दौरान असामाजिक तत्वों ने टिकैत पर स्याही भी फेंकी.”
हि पोस्ट फेसबुक यूजर Mukesh Patel यांनी शेअर केली जे इंदोर चे रहिवासी आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात हि पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे समजले. व्हायरल हायचित्रं एडिटेड आहे. खऱ्या छायाचित्रात राकेश टिकैत यांच्या चेहऱ्यावर काळे फासले नाही आहे. पण, राकेश टिकैत यांच्यावर राजस्थान येथे हल्ला नक्की झाला होता, पण या छायाचित्राचे त्या घटनेसोबाबत काहीच संबंध नाही.
- Claim Review : राकेश टिकैत यांच्या चेहऱ्यावर काळं फासले
- Claimed By : Mukesh Patel
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.