X
X

Fact Check: नीता अंबानी यांचे फेक ट्विट व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात नीता अंबानी यांच्या नावावर व्हायरल होत असलेली ट्विट खोटी असल्याचे समजले. त्यांचे कुठलेच ट्विटर हॅन्डल नाही.

  • By: Ashish Maharishi
  • Published: Mar 20, 2021 at 10:47 AM
  • Updated: Mar 20, 2021 at 10:52 AM

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एकदा परत नीता अंबानी चर्चेत आहेत. या वेळी देखील त्यांच्या नावाने एक खोटे ट्विट व्हायरल होत आहे. यात दावा करण्यात येत आहे कि त्या हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत. या आधी देखील बऱ्याचवेळा त्यांचे फेक ट्विट व्हायरल झाले आहेत.

विश्वास न्यूज ने व्हायरल ट्विट चा तपास केला. त्यात हा ट्विट खोटा असल्याचे समजले. या गोष्टीची पुष्टी स्वतः रिलायन्स चे प्रवक्ता यांनी केली. नीता अंबानी या ट्विटर वर नाहीत.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर राघव सिंह यांनी १२ मार्च रोजी नीता अंबानी यांचे एक खोटे ट्विट शेअर करून लिहले, नीता अंबानी म्हणाल्या जय श्री राम.

ट्विट वर नीता अंबानी यांच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे, आणि लिहले आहे: पढ़ लिख कर ‘खामोश’ हो तो कलम को तोड़ दो, अगर हिन्‍दुत्‍व के लिए एक ‘शब्‍द’ ना लिख सको, तो फिर, सोशल मीडिया छोड़ दो! ”जय श्री राम”।

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट च्या तपासाची सुरुवात त्यात सांगितलेल्या ट्विटर हॅन्डल @TheChitraLive पासून केली. ट्विटर वर आम्हाला या नावाचा एक पण ट्विटर अकाउंट मिळाला नाही. याचा अर्थ स्पष्ट होता कि हा ट्विट खोटा आहे.

नीता अंबानी चा फेक ट्विट व्हायरल करणाऱ्या यूजर ने आपल्या अकाउंट वर कुठलीच माहिती अपडेट केली नाही आहे. यामुळे सोशल स्कॅनिंग मध्ये आम्हाला कुठलीच माहिती मिळाली नाही.

नीता अंबानी यांच्या नावावर आधीदेखील खोटी पोस्ट व्हायरल झाली आहे. हा तपास तुम्ही इथे वाचू शकता.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात नीता अंबानी यांच्या नावावर व्हायरल होत असलेली ट्विट खोटी असल्याचे समजले. त्यांचे कुठलेच ट्विटर हॅन्डल नाही.

  • Claim Review : नीता अंबानी यांनी हिंदुत्वावर ट्विट केले.
  • Claimed By : फेसबुक यूजर राघव सिंह
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later