Fact Check: ट्रेन रद्द झल्याचे व्हायरल वृत्त एक वर्षं जुने आहे
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. ट्रेन रद्द होण्याची एक वर्ष जुनी बातमी आता काही लोकं व्हायरल करत आहेत.
- By: Ashish Maharishi
- Published: Mar 19, 2021 at 03:31 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): एकीकडे कोरोना चा उद्रेक वाढत असताना, काही लोकं खोट्या बातम्या पसरवण्यात मग्न असल्याचे दिसते. आता तर एक वर्ष जुनी बातमी लोकं आताची सांगून व्हायरल करत असल्याचे समोर आले.
सोशल मीडिया वर एबीपी न्यूज चा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ ला व्हायरल करत दावा करण्यात येत आहे कि ३१ मार्च पासून सगळ्या ट्रेन रद्द केल्या गेल्या आहेत.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि २२ मार्च २०२० रोजी ची बातमी आता लोकं जाणीवपूर्वक व्हायरल करत आहेत. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज मुदस्सर मलिक ऑफिशियल ने १५ मार्च २०२१ रोजी एक बातमी शेअर केली आणि दावा केला: ‘Indian Railways Cancels All Passenger Trains Till March 31 | ABP News’
या बातमी ला आता खरे समजून दुसरे यूजर्स देखील व्हायरल करत आहेत. हि बातमी फेसबुक शिवाय ट्विटर वर देखील व्हायरल होताना दिसते. विश्वास न्यूजला आपल्या फैक्ट चेकिंग वॉट्सऐप चैटबॉट (+91 95992 99372) वर देखील हा दावा फॅक्ट चेक करता मिळाला. एका यूजर ने व्हायरल होत असलेला व्हिडिओ आमच्या सोबत शेअर केला आणि सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
हि फेसबुक पोस्ट आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी ५:५८ मिनिटांचा व्हायरल व्हिडिओ नीट निरखून बघितला आणि ऐकला. व्हिडिओ पाहताच आमच्या लक्षात आले कि हा आत्ताचा नाही तर एक वर्ष जुना व्हिडिओ आहे.
या नंतर विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आलेले दावे गूगल सर्च मध्ये शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी आम्ही ‘Indian Railways Cancels All Passenger Trains Till March 31’ टाईप करून सर्च केले. आम्हाला एक पण बातमी अशी नाही सापडली जी सिद्ध करेल कि हि बातमी आताची आत्ताची आहे.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने युट्युब वर संबंधित बातम्या शोधण्यास सुरुवात केली. ओरिजिनल व्हिडिओ आम्हाला एबीपी न्यूज च्या युट्युब चॅनेल वर सापडला. २२ मार्च २०२० रोजी अपलोड केलेलय या बातमीला बघून हे सिद्ध झाले कि हि बातमी जुनी आहे जी काही लोकं आता व्हायरल करत आहेत.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही भारतीय रेल्वे च्या प्रवक्ताना संपर्क केला त्यांनी हि पोस्ट फेक असल्याचे सांगितले.
आता आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि मुदस्सर मलिक ऑफिशियल नावाच्या या पेज ला ७० हजार पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात. यूजर जम्मू काश्मीर चे रहिवासी आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. ट्रेन रद्द होण्याची एक वर्ष जुनी बातमी आता काही लोकं व्हायरल करत आहेत.
- Claim Review : ३१ मार्च पर्यंत सगळ्या ट्रेन रद्द
- Claimed By : मुदस्सर मलिक ऑफिशियल
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.