Fact Check : राजनाथ सिंह चा २०१५ चा जुना व्हिडिओ आता खोट्या दाव्यासह होत आहे व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले. राजनाथ सिंह चा २०१५ साल चा जुना व्हिडिओ आता खोट्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Mar 12, 2021 at 07:40 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांना शेतकऱ्यांच्या हिता साठी बोलताना बघितले जाऊ शकते. यूजर्स दावा करत आहेत कि राजनाथ सिंह चे कृषी बिल च्या विरोधात उत्तर आले आहे. ज्यामुळे केंद्र सरकार ला चांगलाच झटका लागला आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. आमच्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे समजले. राजनाथ सिंह चे २०१५ साल चे व्हिडिओ आता जाणूनबुजून खोट्या दाव्यासह व्हायरल केले जात आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर जैताराम गोदारा ने १ मार्च रोजी राजनाथ सिंह चा एक जुना व्हिडिओ अपलोड करून दावा केला: ‘राजनाथ सिंह उतरे कृषी बिलो के विरोध मे किसानो के सम्मान मे केन्द्र सरकार को तगङा झटका’
दुसरे यूजर देखील या दाव्याला खरे मानून शेअर करत आहेत. पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी राजनाथ सिंह चा १० मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण बघितला. या व्हिडिओ ला बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली कि राजनाथ सिंह हे शेतकरी नेता महेंद्र सिंह यांच्या जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
तपासाच्या पुढे टप्प्यात आम्ही युट्युब वर या कार्यक्रमाचा व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली. वेग-वेगळे कीवर्डस सर्च केल्यावर आम्हाला भाजप च्या अधिकृत युट्युब चॅनेल वर ओरिजिनल व्हिडिओ मिळाला. १८:४४ मिनिटांच्या या ओरिजिनल व्हिडिओ मध्ये ५:४६ मिनिटांनंतरच्या भागाला कापून आता व्हायरल केले जात आहे.
ओरिजिनल व्हिडिओ ला ६ ऑक्टोबर २०१५ रोजी उपलोड केले गेले होते. यात सांगितले गेले आहे कि दिल्ली मध्ये झालेल्या महेंद्र सिंह टिकैत च्या जन्मदिवस निमित्त झालेल्या एका कार्यक्रमात राजनाथ सिंह गेले होते, तिथे ते बोलत होते.
व्हायरल व्हिडिओ वरून विश्वास न्यूज ने भाजप प्रवक्ता राकेश त्रिपाठी यांना संपर्क केला, त्यांनी सांगितले कि पार्टी चे वरिष्ठ नेता राजनाथ सिंह यांचा हा जुना व्हिडिओ आहे, ज्याला आता मुद्दाम खोट्या दाव्यांसह व्हायरल करण्यात येत आहे.
आम्ही फेसबुक यूजर जैताराम गोदारा यांच्या अकाउंट चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि या यूजर ला १३०० पेक्षा जास्ती लोकं फोल्लो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले. राजनाथ सिंह चा २०१५ साल चा जुना व्हिडिओ आता खोट्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे.
- Claim Review : राजनाथ सिंह शेतकऱ्यांच्या समर्थानात बोलले
- Claimed By : जैताराम गोदारा
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.