Fact Check: पत्रकारांच्या विरोध प्रदर्शनाचे तीन वर्षं जुने छायाचित्र एडिट करून खोट्या दाव्यांसह आता होत आहे व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात छायाचित्र एडिटेड असल्याचे समजले. हे छायाचित्र तीन वर्ष जुने आहे. हे छायाचित्र एका विरोध प्रदर्शनाचे आहे ज्यात खऱ्या छायाचित्रात, “Shut camera” असे लिहले आहे.
- By: Pallavi Mishra
- Published: Mar 10, 2021 at 11:32 AM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात, मुलीनी तोंडावर पट्टी बांधलेली दिसते आणि तिच्या हातात एक बोर्ड आहे ज्यात लिहले आहे, “No More HATHRAS! NO VOTE TO BJP! #NoVoteToBJP”.
विश्वास न्यूज च्या तपासात हे छायाचित्र एडिटेड असल्याचे समजले. खरे छायाचित्र तीन वर्षं जुने आहे. हे छायाचित्र पत्रकारांच्या विरोध प्रदर्शनाचे आहे ज्यात छायाचित्रात दिसत असलेल्या बोर्ड वर “Shut Camera” असे लिहले आहे.
काय होत आहे व्हायरल?
हि पोस्ट Ry Sujan या फेसबुक यूजर ने शेअर केले आणि लिहले, “NO VOTE TO BJP clearly: NO Vote To BJP Loudly: NO VOTE TO BJP #No Vote To BJP”
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल छायाचित्राच्या तपासाची सुरुवात आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून केली. आम्हाला हे छायाचित्र फोटो एजेन्सी एलमी च्या वेबसाईट वर मिळाले. या छायाचित्रात व्हायरल छायाचित्रातील मुलगी दिसत असल्याचे समजले, तसेच मुलीच्या हातात दिसत असलेल्या या बोर्ड वर “Shut Camera” असे लिहले होते.
साईट वर छायाचित्रासोबत लिहले होते (अनुवादित): “कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत: ११ एप्रिल २०१८, एका महिलेने विरोध प्रदर्शन करत एक फलक पिकलेला आहे, जेव्हा हजारो पत्रकारांनी पंचायत नामांकन कव्हरेज च्या वेळी सत्ताधारी पार्टी च्या हामळ्यांचा विरोध केला. रॅली ची सुरुवात, मेयो रोड महात्मा गांधी यांच्या प्रतिमेपासून झाली आणि समापन कलकत्तेच्या दोरीनं क्रोसिंग वर झाली. हाताला काली पट्टी बांधून आणि काली ओढणी घेऊन शहरातील जर्नलिस्ट्स ने प्रदर्शन केले. याचाच अर्थ हे छायाचित्र ११ एप्रिल २०१८ चे बंगाल विरोध प्रदर्शनाचे आहे.
आम्हाला असेच मिळते जुळते छायाचित्र, nationalheraldindia.com वर १२ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित केले असल्याचे दिसते. या बातमीत वापरलेल्या छायाचित्रात देखील “Shut Camera” असे लिहले आहे.
अधिक माहिती साठी विश्वास न्यूज ने आपले सहयोगी दैनिक जागरण चे कलकत्ता ब्युरो चे प्रमुख जेके वाजपेयी यांना संपर्क केला. त्यांनी म्हंटले, “व्हायरल छायाचित्र एडिटेड आहे. खऱ्या छायाचित्रात बोर्ड वर शट कॅमेरा लिहले आहे कारण पत्रकांनी बंगाल मध्ये होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात प्रदर्शन केले होते. छायाचित्र आताचे नाही २०१८ च्या प्रदर्शनाचे आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल दावा शेअर करणारे यूजर Ry Sujan च्या प्रोफाइल ला स्कॅन केले. त्यात आम्हाला कळले कि यूजर बंगाल चे रहिवासी आहेत आणि त्यांचे २२१ फोल्लोवर्स आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात छायाचित्र एडिटेड असल्याचे समजले. हे छायाचित्र तीन वर्ष जुने आहे. हे छायाचित्र एका विरोध प्रदर्शनाचे आहे ज्यात खऱ्या छायाचित्रात, “Shut camera” असे लिहले आहे.
- Claim Review : NO VOTE TO BJP clearly: NO Vote To BJP Loudly: NO VOTE TO BJP
- Claimed By : RY Sujan
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.