X
X

Fact Check: पीएम मोदी यांचा जुना व्हिडिओ केला गेला एडिट, व्हायरल पोस्ट खोटी आहे

विश्वास न्यूज च्या तपासात नरेंद्र मोदी यांच्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एडिटेड असल्याचे समजले. जुन्या व्हिडिओ ला एडिट करून खोट्या दाव्यासह आता व्हायरल केले जात आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एका व्हिडिओ ला एडिट करून त्याला सोशल मीडिया वर व्हायरल करण्यात येत आहे. दावा केला जात आहे कि जेव्हा बोलताना व्हिडिओ मध्ये असलेल्या व्यक्ती ने पेट्रोल च्या वाढत्या किमतींबद्दल विचारले तेव्हा पीएम नि त्यांना बसायला सांगितले.

विश्वास न्यूज व्हायरल पोस्ट चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि पीएम मोदी यांचा एक जुना व्हिडिओ एडिट करून पेट्रोल ची गोष्ट त्यात जोडून व्हिडिओ ला व्हायरल करण्यात येत आहे. जेव्हाकी ओरिजिनल व्हिडिओ मे २०१८ चा आहे, जेव्हा पीएम मुद्रा लोन वरून लोकांसोबत संवाद साधत होते.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक, ट्विटर आणि व्हात्साप्प वर एक एडिटेड व्हिडिओ व्हायरल होताना दिसतो. विकास चौहान नावाच्या एका फेसबुक यूजर ने हा व्हिडिओ अपलोड करून लिहले.

मोदी जी :- हरिभाऊ… बोलो क्या कहते हैं…..
हरिभाऊ :- राम राम…
मोदी जी :- नमस्ते…. क्या कहते है..
हरिभाऊ :- कि पेट्रोल की कीमत बढ़ी…
मोदी जी :- बसा… बसा…. बसा…
बेचारा हरिभाऊ चुपचाप बैठ गया

व्हायरल पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओ द्वारे निघालेल्या काही कीवर्डस ला गूगल सर्च मध्ये टाईप केले. आम्हाला एबीपी माझा च्या युट्युब चॅनेल वर नावाच्या इसमाचा एक व्हिडिओ मिळाला. २९ मे २०१८ रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओ मध्ये सांगितले गेले आहे कि नरेंद्र मोदी यांच्यासोबत वार्तालाप केल्यानंतर नाशिक चे हरी भाऊ प्रतिक्रिया देताना. संपूर्ण व्हिडिओ इथे बघा.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही पीएमओ च्या अधिकृत युट्युब चॅनेल वर जाऊन तपास केला आणि संबंधित व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला २९ मे २०१८ रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला. हा तोच व्हिडिओ होता ज्याला एडिट करून आता व्हायरल केले जात होते.

ओरिजिनल व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे कि जेव्हा नाशिक चा एक सामान्य इसम नरेंद्र मोदी यांच्या समोर हाथ जोडून उभा झाला तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी त्यांना बसण्यास सांगितले. व्हिडिओ मध्ये कुठेच पेट्रोल बद्दल बोलल्या गेले नाही आहे. हा वार्तालाप मुद्रा योजने वर होता. पूर्ण व्हिडिओ इथे बघा.

विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात नाशिक चे भाजप अध्यक्ष गिरीश पालवे यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी व्हिडिओ बघून सांगितले कि तो एडिटेड आहे. असे काहीच झाले नव्हते.

आता आम्ही त्या यूजर चा तपास केला ज्याने ती खोटी पोस्ट केली होती. आम्हाला कळले कि फेसबुक यूजर विकास चौहान आजमगढ चे आहेत आणि सध्या मुंबईत राहतात. त्यांच्या अकाउंट ला पंधराशे पेक्षा अधिक लोक फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात नरेंद्र मोदी यांच्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एडिटेड असल्याचे समजले. जुन्या व्हिडिओ ला एडिट करून खोट्या दाव्यासह आता व्हायरल केले जात आहे.

  • Claim Review : पेट्रोलच्या वाढत्या किमतींबद्दल विचारले असता मोदींनी बसायला सांगितले.
  • Claimed By : Vikas Chauhan
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later