Fact Check: बिहार पुराचे जुने छायाचित्र आता उत्तराखंड चे सांगून होत आहे व्हायरल
उत्तराखंड पुराच्या नावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र, बिहार मध्ये २०१९ साली आलेल्या पुराचे आहे. व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे.
- By: Ankita Deshkar
- Published: Feb 11, 2021 at 02:22 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक छायाचित्र सोशल मीडिया वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. छायाचित्रात खालसा एड चे लोकं राहत कार्य करत असताना छायाचित्रात दिसतात. यूजर्स दावा करत आहेत कि हे छायाचित्र उत्तराखंड चे आहे जिथे खालसा एड चे कार्यकर्ते राहत कार्यात मदत करत आहेत. अलकनंदा नदी मध्ये अचानक आलेल्या पुरात उत्तराखंड मध्ये बरेच नुकसान झाले आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेले होत असलेले छायाचित्र हे बिहार मध्ये २०१९ साली आलेल्या पुराचे असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
उत्तराखंड मध्ये पूर आल्यापासून, एक छायाचित्र सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे ज्यात दावा केला जात आहे कि खालसा एड चे लोकं उत्तराखंड मध्ये राहत कार्यास आले आहे. या छायाचित्रात कार्यकर्ते ट्रक मध्ये राहत साहित्य वाटताना दिसतात. हि पोस्ट बरेच लोकं सोशल मीडिया वर शेअर करत आहेत.
Amandeep Singh @Amandee11748300 यांनी इंग्रजीत लिहले: UTTARAKHAND: Ground Zero Update @khalsaaid_india volunteer team is at ground zero where people are stranded and stuck due to glacier disaster.
Assessments are being done presently on ground zero in coordination with state disaster authority. #Khalsa_Aid
या यूजर ने छायाचित्र देखील शेअर केले.
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
हाच फोटो ट्विटर यूजर Jaswinder Kaur @aggusaini19 यांनी पंजाबी मध्ये मजकूर लिहून शेअर केला. यूजर नि लिहले: ਉਤਰਾਖੰਡ ਚ ਆਤੰਕਵਾਦੀ ਪੁੱਜ ਗਏ …..ਅਸੀ ਮਾੜੇ ਲੋਕ ਆ ਜਨਾਬ ਤੇ ਕੰਮ ਵੀ ਮਾੜੇ ਵਕਤ ਚ ਈ ਆਈ ਦਾ … #PrayForUttarakhand #FarmersProtests
अर्थात: उत्तराखंड मध्ये आतंकवादी आले आहेत. ते चांगले नाहीत तसेच त्यांचे काम देखील चांगले नाही.
हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने या पोस्ट चा तपास त्या पोस्ट मध्ये असलेल्या छायाचित्रापासून सुरु केला. आम्ही हे छायाचित्र नीट निरखून पहिले असता, झूम केल्यावर असे दिसले कि त्या बॅनर वर वर्ष, ‘२०१९’ लिहले होते.
नंतर विश्वास न्यूज ने या छायाचित्रावर गूगल रिव्हर्स इमेज सर्च या टूल चा वापर केला. ते केले असता आम्हाला हे छायाचित्र PTC Punjabi या वेबसाईट वरच्या एका लेखात वापरले असल्याचे समजले.
हा संपूर्ण लेख तुम्ही इथे वाचू शकता.
याच लेखात आम्हाला एक खालसा एड चा ट्विट वापरला गेल्याचे दिसले. या ट्विट मध्ये आम्हाला व्हायरल छायाचित्र दिसले. विश्वास न्यूज ला दिसले कि हे छायाचित्र खालसा एड नि आपल्या ट्विटर हॅन्डल वर ऑक्टोबर ४, २०१९ रोजी शेअर केले आहे.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज दैनिक जागरण चे बिहार चे सहयोगी, अमित आलोक यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले हि बिहार मध्ये २०१९ साली पूर आला होता, तेव्हाचे हे छायाचित्र आहे.
हे छायाचित्र जरी बिहार चे असले, तरी उत्तराखंड मध्ये खालसा एड नि मदत कार्य सुरु केले आहे आणि त्याबद्दल त्यांनी ट्विटर वर आपल्या हॅन्डल वर देखील माहिती शेअर केली आहे.
शेवटी पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चे विश्वास न्यूज ने सोशल बॅकग्राऊंड चेक केले. Jaswinder Kaur @aggusaini19 यांनी आपल्या बायो मध्ये त्या मोहाली च्या रहिवासी असल्याचे सांगितले, तसेच त्यांनी ट्विटर नोव्हेंबर २०२० मध्ये जॉईन केले, त्यांना ३९३ लोक फोल्लो करतात.
निष्कर्ष: उत्तराखंड पुराच्या नावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र, बिहार मध्ये २०१९ साली आलेल्या पुराचे आहे. व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे.
- Claim Review : उत्तराखंड पुरात खालसा एड चे राहत कार्य
- Claimed By : Jaswinder Kaur
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.