X
X

Fact Check: दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे जुने छायाचित्र आताचे सांगून व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात अरविंद केजरीवाल यांचे छायाचित्र जुने असल्याचे समजले. हे छायाचित्र आत्ताचे नाही.

  • By: Pallavi Mishra
  • Published: Jan 7, 2021 at 04:07 PM
  • Updated: Jan 7, 2021 at 04:44 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नमाज अदा करताना बसलेले दिसतात. या पोस्ट सोबत दावा करण्यात आहे कि दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने नवीन वर्षाची सुरुवात जामा मस्जिद मध्ये नमाज वाचून केली. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि हे छायाचित्र २०१७ चे आहे.

काय होत आहे व्हायरल?
व्हायरल पोस्ट मध्ये दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नमाज अडा करताना बसल्यासारखे दिसतात. पोस्ट सोबत दावा केला जात आहे, “बड़ी खब़र: साल के पहले दिन जामा मस्जिद जाकर दिल्ली के मालिक जनाब श्री अरविंद केजरीवाल ने पढ़ी नमाज़ देश और दिल्ली के लिये पढ़ी दुआ।”
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
पोस्ट चा तपास आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून केला. आम्हाला हे छायाचित्र आप की पंजाब यूनिट च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर ७ जुलै २०१६ रोजी अपलोड केलेले सापडले. छायाचित्रात पंजाबी मध्ये लिहले होते, ‘ਆਪ ਸਭ ਨੂੰ ਈਦ ਦੀ ਬਹੁਤ ਬਹੁਤ ਮੁਬਾਰਕਬਾਦ।’ ज्याचा अर्थ होतो, “तुम्हाला सगळ्यांना ईद च्या शुभेच्छा”.

थोडे अजून शोधल्यावर आम्हाला हे छायाचित्र एका दुसऱ्या अँगल नि htsyndication.com वर मिळाले. डिस्क्रिप्शन प्रमाणे, हे छायाचित्र पंजाब च्या पटियाला चे आहे. ज्याला हिंदुस्थान टाइम्स चे फोटो जर्नलिस्ट भारत भूषण ने ४ जुलै २०१६ रोजी काढले होते.
व्हायरल आणि ह्या छायाचित्रातली समानता इथे बघू शकता.

या छायाचित्राची अधिक खात्री करून घेण्यासाठी आम्ही जागरण च्या पटियाला चे संवाददाता सुरेंदर सिंह यांना संपर्क केला. त्यांनी म्हंटले, “हे छायाचित्र २०१६ चे आहे, जेव्हा अरविंद केजरीवाल ने पटियाला मध्ये असलेल्या संगरुर मध्ये मालेरकोटला चा दौरा केला होता आणि रोजा पण ठेवला होता. हे छायाचित्र ते तोडण्या आधीचे आहे.”

आता आम्हाला जाणून घ्यायचे होते कि अरविंद केजरीवाल यांनी नवीन वर्षी काय केले. कोणत्या पण अधिकृत मीडिया वेबसाईट ला ते जामा मस्जिद ला गेल्याची बातमी मिळाली नाही. पण आम्हाला केजरीवाल यांच्या अधिकृत मीडिया वेबसाईट ला त्यांचा व्हिडिओ संदेश मिळाला ज्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि लोकांना कोरोनाव्हायरस पासून सावध राहायचा सल्ला दिला.

या पोस्ट ला बरेच लोक सोशल मीडिया वर खोट्या दाव्यांसह शेअर करत आहेत, त्यातच एक “भक्तो की टोली – नरेन्द्र मोदी” नावाचा फेसबुक पेज आहे ज्याला ४,०६८ लोकं फोल्लो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात अरविंद केजरीवाल यांचे छायाचित्र जुने असल्याचे समजले. हे छायाचित्र आत्ताचे नाही.

  • Claim Review : अरविंद केजरीवाल यांनी नवीन वर्षी नमाज वाचली.
  • Claimed By : भक्तो की टोली – नरेन्द्र मोदी
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later