X
X

Fact Check: पुण्याच्या प्लॅटफॉर्म तिकीट सोबत करण्यात आली खोडतोड, ‘अडानी रेल्वे’ वेगळे जोडले गेले

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी निघाली. पुणे रेल्वे स्टेशन च्या प्लॅटफॉर्म च्या जुन्या तिकिटाचे छायाचित्र आता खोड तोड करून काही लोकं खोट्या दाव्यांसह व्हायरल करत आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): दिल्ली मध्ये शेतकरी आंदोलन तर सुरूच आहे पण त्यासोबतच सोशल मीडिया वर बरेच छायाचित्र व्हायरल होताना दिसत आहेत. असेच एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात बिजनेसमैन गौतम अडानी यांच्या नावावर एक खोटी पोस्ट व्हायरल होत आहे. कधी छायाचित्रांच्या माध्यमानी भारतीय रेल्वे ला अडानी रेल्वे म्हंटले जाते तर कधी, अहमदाबाद एअरपोर्ट चे नाव बदलून हे छायाचित्र व्हायरल केले जातात. तसेच आता प्लॅटफॉर्म तिकीट पण एडिट करून व्हायरल केले जात आहे.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. आम्हाला कळले कि पुणे जंक्शन च्या प्लॅटफॉर्म तिकीट वर, वेगळ्याने वर, ‘अडानी रेल्वे, रेलवे अब हमारी निजी संपत्ति है’ असे लिहले गेले आहे. कोरोनाव्हायरस काळात, पुण्याच्या प्लॅटफॉर्म तिकीट ची रक्कम वाढवण्यात आली होती. त्याच प्लॅटफॉर्म तिकीट च्या वर आता अडानी लिहून खोट्या दाव्या सोबत व्हायरल केले जात आहे. या आधी पण ओरिजिनल प्लॅटफॉर्म तिकीट चुकीच्या दाव्यांसह व्हायरल केले गेले होते. हे तुम्ही इथे बघू शकता.

काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया वर एक प्लॅटफॉर्म तिकीट व्हायरल होत आहे. फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअँप वर हे तिकीट व्हायरल करून लोकं दावा करत आहेत कि भारतीय रेल्वे आता अडानी ची झाली आहे.

फेसबुक यूजर अशोक कुमार ने २७ डिसेंबर रोजी एक खोटे प्लॅटफॉर्म तिकीट अपलोड केले आणि लिहले: ‘हो गयी शुरुआत जनता को लुटने की।’

फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी गूगल सर्च मध्ये, ‘पुणे प्‍लेटफॉर्म टिकट 50 रुपए’ टाईप करून सर्च केले. सर्च च्या वेळी आम्हाला बऱ्याच न्यूज वेबसाईट वर हि बातमी सापडली ज्यात म्हंटले होते कि पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म तिकीट चे दर वाढवण्यात आले. नवभारत टाइम्स च्या बातमी प्रमाणे, पुणे रेल्वे स्टेशन च्या प्लॅटफॉर्म मध्ये प्रवेश चा शुल्क वाढवण्यात आला आहे. पूर्ण बातमी तुम्ही इथे वाचू शकता.

तपासादरम्यान आम्हाला रेल्वे चा एक ट्विट पण मिळाला. यात रेल्वे प्रवक्ता कडून म्हंटले गेले होते कि, पुणे जंक्शन द्वारे प्लॅटफॉर्म तिकीट चे मूल्य ₹50 ठेवण्याचा उद्देश्य अनावश्यक रूपाने स्टेशन वर येणाऱ्या लोकांना थांबवणे आहे, ज्यामुळे सोशल डिस्टेंसिंग चे पालन केले जाईल. पुणे प्लॅटफॉर्म तिकीट च्या दारांवर अश्याच प्रकारे कोरोनाव्हायरस च्या आधी पासून नियंत्रित केले गेले आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने पुणे डिवीजन चे जनसंपर्क अधिकारी, मनोज झवर यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि कोविड च्या कारणांमुळे पुणे रेल्वे स्टेशन वर प्लॅटफॉर्म तिकीट प्रतिबंधित आहे. पण गर्भवती महिला, बुजुर्ग आणि आजारी लोकं यांच्या शिवाय गरजू लोकं आणि त्यांच्या नातेवाईकांना प्लॅटफॉर्म तिकीट देण्यात येत आहे, तिकीट चे भाव यासाठी वाढवले गेले, जेणेकरून अनावश्यक गर्दी टाळता यावी. अडानी रेल्वे वाली गोष्ट पूर्णपणे खोटी आहे.

शेवटी आम्ही त्या फेसबुक अकॉउंट चा तपास केला ज्याने खोटी पोस्ट शेअर केली. सोशल स्कँनिंग मध्ये कळले कि फेसबुक यूजर अशोक कुमार दिल्ली चे रहिवासी आहे, त्यांनी आपले अकाउंट फेब्रुवारी २०१५ रोजी बनवले होते.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी निघाली. पुणे रेल्वे स्टेशन च्या प्लॅटफॉर्म च्या जुन्या तिकिटाचे छायाचित्र आता खोड तोड करून काही लोकं खोट्या दाव्यांसह व्हायरल करत आहे.

  • Claim Review : भारतीय रेल्वे आता अडानी ची झाली आहे
  • Claimed By : Ashok Kumar
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later