X
X

Fact Check: नीता अंबानी ट्विटर वर नाही, हा ट्विट खोटा आहे

विश्वास न्यूज च्या तपासात नीता अंबानी यांच्या नावावर व्हायरल ट्विट खोटा निघाला. नीता अंबानी सोशल मीडिया वर नाहीत. म्हणूनच हि पोस्ट खोटी असल्याचे लक्षात आले.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर नीता अंबानी यांची परत एकदा एक खोटी पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. नीता अंबानी यांच्या नावावर बनलेल्या एका खोट्या ट्विटर हॅन्डल वरून केलेल्या ट्विट ला लोकं खरा मानून शेअर करत आहेत.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला असता असे कळले कि अंबानी कुटुंबातील कुठलाच सदस्य सोशल मीडिया वर नाही, आणि म्हणून व्हायरल पोस्ट खोटे असल्याचे आम्हाला समजले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर सतीश चौधरी ने १८ डिसेंबर रोजी नीता अंबानी यांच्या नावाची खोटी ट्विट आपल्या अकाउंट वर पोस्ट केली. यात नीता अंबानी (@ThechitraLive) यांच्या कडून लिहले होते: अंबानी अडानी तो बिजनेसमैन है प्रॉब्‍लम है, लेकिन एक महिला जो क्‍या बिजनेस कर रही है जो विश्‍व की चौथी सबसे अमीर महिला बन गई चमचों…पूछता है भारत?

अर्थात: अंबानी अदानी त बिजनेसमैन आहे प्रॉब्लेम आहे, पण एक महिला बिसनेस करत आहे ती जगातील चौथी सगळ्यात श्रीमंत महिला बनली, भारत विचारात आहे?
या ट्विट ला खरे मानून दुसरे यूजर्स पण व्हायरल करत आहे. फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी नीता अंबानी यांच्या नावाने व्हायरल होत असलेला ट्विट वाचला. यात वापरली गेलेली भाषा आणि आणि चुकांवरून स्पष्ट होतं कि नीता अंबानी असे लिहू शकत नाही. या नंतर आम्ही नीता अंबानी यांनी कुठले वक्तव्य केले का याचा गूगल वर शोध घेतला. आम्हाला या बाबतीत एकहि रिपोर्ट सापडली नाही. याचा अर्थ स्पष्ट होता कि त्यांनी असे कुठलेच वक्तव्य केले नाही, जसे कि ट्विट मध्ये म्हंटले गेले आहे.

या नंतर विश्वास न्यूज ने नीता अंबानी यांच्या नावाने बनलेल्या ट्विटर हॅन्डल ThechitraLive याचे निरीक्षण केले. आम्हाला कळले कि हे ट्विटर हॅन्डल ऑक्टोबर २०२० मध्ये बनवले गेले आहे. याला ६५५२ लोकं फोल्लो करतात. या हॅन्डल वर नीता आणि मुकेश अंबानी यांच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे.

नीता अंबानी च्या व्हायरल ट्विट वरून आम्ही रिलायन्स कंपनीच्या कम्‍युनिकेशन ऑफिसर सोबत संपर्क केला. त्यांनी स्पष्ट केले कि अंबानी कुटुंबाचा कुठलाच सदस्य सोशल मीडिया वर नाही. हा ट्विट पूर्णपणे खोटा आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला, आम्हाला कळले कि फेसबुक यूजर सतीश चौधरी यांना दोन हजार पेक्षा जास्ती लोकं फोल्लो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात नीता अंबानी यांच्या नावावर व्हायरल ट्विट खोटा निघाला. नीता अंबानी सोशल मीडिया वर नाहीत. म्हणूनच हि पोस्ट खोटी असल्याचे लक्षात आले.

  • Claim Review : नीता अंबानी यांचे ट्विट
  • Claimed By : Satish Chaudhary
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later