X
X

Fact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले. ऑक्टोबर २०१४ चे एक छायाचित्र आता काही लोकं खोट्या दाव्यासह व्हायरल करत आहेत.

  • By: Ashish Maharishi
  • Published: Dec 16, 2020 at 12:46 PM
  • Updated: Sep 12, 2024 at 05:51 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक छायाचित्र व्हायरल होताना दिसत आहे. या छायाचित्रात त्यांच्या सोबत मुकेश अंबानी एका दवाखान्यात पहिले जाऊ शकतात. हे छायाचित्र काही लोकं आता शेतकरी आंदोलनासोबत जोडून व्हायरल करत आहेत. यूजर्स दावा करत आहेत कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही आहे पण, अंबानी यांच्या नातवाला भेटायला मात्र ते दवाखान्यात गेले.

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. त्यात आम्हाला असे कळले कि व्हायरल छायाचित्र हे २०१४ साल चे आहे. त्या वेळी नरेंद्र मोदी हे रिलायन्स फौंडेशन च्या एका दवाखान्याच्या उदघाटनाची मुंबई ला गेले होते.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर आरकेएस न्‍यूज ने १२ डिसेंबर रोजी एक छायाचित्र अपलोड केले आणि लिहले: ‘ठंड में बैठे किसानों के पास जाने की फुर्सत नहीं,अंबानी के पोते के जन्म की बधाई देने अस्पताल पहुँच गया।
अर्थात: थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांना भेटायला फुरसत नाही पण अंबानी यांना नातू झाल्या बद्दल ते दवाखान्यात अभिनंदन करायला पोहोचले.
या फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्र, गूगल रिव्हर्स इमेज मध्ये अपलोड करून सर्च केले. आम्हाला खरे छायाचित्र इंडिया इन्फो लाईन नावाच्या एका वेबसाईट वर मिळाले. २७ ऑक्टोबर २०१४ रोजी अपलोड केलेल्या एका बातमी सोबत आम्हाला हे छायाचित्र मिळाले.

बातमीत सांगितले गेले आहे कि श्री एच एन रिलायंस फाउंडेशन हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर च्या उदघाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचले होते. संपूर्ण बातमी इथे वाचा.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने रिलायन्स समूहाचे प्रवक्ता यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हे छायाचित्र ऑक्टोबर २०१४ चे आहे जेव्हा दवाखान्याचे उदघाटन झाले होते.
तपासाच्या शेवटी आम्ही त्या यूजर चे सोशल स्कॅनिंग केले ज्यांनी खोटी पोस्ट अपलोड केली होती. आम्हाला असे कळले कि फेसबुक पेज आरकेएस न्‍यूज ला ३३ हजार लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे कळले. ऑक्टोबर २०१४ चे एक छायाचित्र आता काही लोकं खोट्या दाव्यासह व्हायरल करत आहेत.

  • Claim Review : थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांना भेटायला फुरसत नाही पण अंबानी यांना नातू झाल्या बद्दल ते दवाखान्यात अभिनंदन करायला पोहोचले.
  • Claimed By : RKS News
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later