Fact Check : पश्चिम बंगाल मध्ये ओवैसी च्या पार्टी सोबत भाजप ने गटबांधान केल्याचे खोटे ट्विट व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात भाजप च्या नावावर व्हायरल होत असलेले ट्विट खोटे असल्याचे समजले. भाजप च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून असे कुठलेच ट्विट केलेले नाही.
- By: Ashish Maharishi
- Published: Nov 26, 2020 at 03:36 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): पश्चिम बंगाल च्या विधानसभा निवडणुकांना अजून वेळ असला तरी, सोशल मीडिया वर यासंबंधी अफवा आणि खोट्या बातम्या व्हायरल होताना दिसतायत. फेसबुक वर काही यूजर्स ने भाजप च्या नावावर खोटे ट्विट व्हायरल करत आहे, ज्यात दावा केला जात आहे कि पश्चिम बंगाल च्या आगामी विधान सभा निवडणुकांमध्ये भाजप AIMIM सोबत गटबांधान करत आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला. आमच्या तपासात हा ट्विट पूर्णपणे खोटा असल्याचे कळले. भाजप ने असे कुठलेच ट्विट आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून केले नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर अनिल शर्मा यांनी २१ नोव्हेंबर रोजी एक खोटे ट्विट पोस्ट करून लिहले, “जीतने के लिए किसी भी हद तक जाना पड़ेगा जरूर जाएंगे, पहले उन्हीं को लड़ाइयेगे फिर उन्हीं को आपस मे लाडवा देंगे, कोई रोजगार की तरफ ध्यान बिलकुल नहीं देगा.“
अर्थात: जिंकण्यासाठी कुठल्यापण पातळीवर जावेलागले तरी ते जातील, पहिले एकमेकांमध्ये लढतील मग लढवतील पण रोजगाराकडे कोणी लक्ष नाही देणार.
भाजप च्या नावाने केलेल्या ट्विट मध्ये लिहले होते: We have formed alliance with AIMIM in upcoming WB elections.
फेसबुक पोस्ट आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल पोस्ट चे सत्य जाणून घेण्यासाठी गूगल सर्च मध्ये ओवैसी आणि भाजप चे गटबांधन झाले का हे जाणून घेण्यासाठी त्या संबंधित बातम्या सर्च केल्या. आम्हाला असदुद्दीन ओवैसी ची पार्टी एआइएमआइएम नि भाजप सोबत कुठल्या प्रकारचे गठबंधनचे बातम्या सापडल्या नाही, जेव्हाकी आम्हाला अशी एक बातमी मिळाली ज्यात असदुद्दीन ओवैसी यांनी ममता बनेर्जी सोबत निवडणूक लढण्याचे प्रस्ताव मांडले होते.
जागरण डॉट कॉम वर १९ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेली एक बातमी सापडली, ज्यात सांगितले गेले होते कि, ओवैसी यांनी ममता सोबत निवडणूक पूर्व गठबंधन चा प्रस्ताव मांडला होता, त्यांच्या पार्टी ने विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप ला हरवण्यासाठी तृणमूल काँग्रेस ची मदत करण्याचे ठरवले होते. हि संपूर्ण बातमी इथे वाचा.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही भाजप च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल BJP4India ची सकॅनिंग सुरु केली. आम्हाला कळले कि व्हायरल झालेले ट्विट या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर नाही. पण आम्हाला २० नोव्हेंबर रोजी केलेल्या भाजप च्या ट्विटर हॅन्डल वर एक ट्विट मिळाला, ज्यात जेपी नड्डा यांनी ओवैसी च्या पार्टी ला समाज तोडणारे सांगितले आहे. हा ट्विट तुम्ही इथे बघू शकता.
विश्वास न्यूज ने या व्हायरल ट्विट संबंधी भाजप चे प्रवक्ता तेजिंदर सिंह बग्गा यांच्या सोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि व्हायरल ट्विट मध्ये काहीही तथ्य नाही आहे.
शेवटी आम्ही खोटे ट्विट करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात आहाला कळले कि यूजर अनिल शर्मा हे दिल्ली चे रहिवासी आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात भाजप च्या नावावर व्हायरल होत असलेले ट्विट खोटे असल्याचे समजले. भाजप च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून असे कुठलेच ट्विट केलेले नाही.
- Claim Review : जिंकण्यासाठी कुठल्यापण पातळीवर जावेलागले तरी ते जातील, पहिले एकमेकांमध्ये लढतील मग लढवतील पण रोजगाराकडे कोणी लक्ष नाही देणार.
- Claimed By : Anil Sharma
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.